परवा अचानक तुझं कपाट आवरताना एक बिल सापडलं आणि ते पाहताना मन पटकन भूतकाळात गेलं. विस्मृतीच्या कोशात गुरफटलेल्या सुरांनी आजूबाजूचं वातावरण भारून टाकायला सुरवात केली. एकेक सूर काळाच्या मर्यादा ओलांडून मला तुझ्यासोबत कुठे तरी दूर घेऊन गेला. ती इवलीशी पावले दुडूदुडू धावणारी आणि त्याच्या मागे पळताना तुझी होणारी धावपळ. ते मागे पुढे अंगण असलेले दोन खोल्यांचं घर, आणि एका कोपऱ्यात जाणाऱ्या-येणाऱ्याच स्वागत करायलाच जणू उभी असलेली सतार. सारं काही क्षणार्धात आठवलं. आज मन सुरात न्हाहून निघत होत. आठवणींत चिंब करत होत. सगळ्या आठवणींना हट्टाने मागे टाकून पुढे निघून जावं असा प्रयत्न करत होते खरं; पण ते काही जमेना. नुकत्याच संपलेल्या मैफिलीच्या भैरवीचे सूर जसे आसमंतात भरून राहतात आणि मैफिलीच्या स्वराविष्काराची आठवण करून देतात तसं या आठवणींचं झालं. अगदी कालपरवा घडल्यासारखं सगळं नकळत आठवू लागलं. आपल्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या वेळी एक मांजर आपल्या त्या जुन्या घरात अडकलं आणि स्वतःची सुटका करून घेण्याच्या न...
Posts
Showing posts from November, 2016