Credits

माझ्या लेखनाची प्रेरणा असलेल्या व्यक्तींना हा ब्लॉग समर्पित आहे.

एखादं पुस्तक, एखादा चित्रपट किंवा कोणतीही एखादी कलाकृती ही कोणाला तरी अर्पण असते. त्या व्यक्तींच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद लाभावेत म्हणून. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा ही तो एक मार्ग असतो. तसाच माझा हा ब्लॉग. माझ्या असंख्य जिवाभावाच्या स्नेहीना अर्पण...

जिनं मला सर्वात प्रथम शब्दांची ओळख करून दिली त्यामाझ्या आईला माझं प्रत्येक लेखन कायमच समर्पित राहील. 

ज्यांनी मला केवळ प्रेरणाच नाही तर शिकवणही दिली त्या माझ्या बाबांना माझं प्रत्येक लेखन समर्पित राहील. 

मधुकर गोखले सर ज्यांनी 'तू लिहीत राहा' असा  कायमचं पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिलं. त्यांचेही ऋण मी कधीच विसरू शकत नाही. 

योगेश नांदुरकर सर ज्यांनी मला लिहितं केलं.  साहित्य हे क्षेत्र करियरसाठी मी निवडू शकते हा आत्मविश्वास दिला आणि सहकार्य दिलं त्यांच ही ऋण कधीच विसरता येणार नाही. 

माझे जवळचे मित्र-मैत्रिणी मनीषा, दीपक, शैलेश, कविता, मंजुषा, आणि मन्मनचे माझे सहकारी तसेच  मंजिरी, पंकज, वनिता, वरदा या सर्वांचे आभार. त्यांनी कायमच माझ्या सोबत राहावं. माझ्या आयुष्यातले कितीतरी सुख दुःखाचे क्षण तुम्ही वाटून घेतले आहेत.    

सगळ्यात शेवटी अमोल माझा पती, मित्र आणि घरातला समीक्षक ज्यानं कायमचं माझ्या लेखनाला प्रोत्साहन दिलं आणि अजूनही देतो.

तुम्ही सगळे  नसतात तर कदाचित मी इतकंही लिहू शकले नसते वाचू शकले नसते. व्यक्त होऊ शकले नसते. कोऱ्या कागदावरच्या रेषांसारखे तुम्ही आहात. तुमच्या आधारे मी लिहीत जाते. 

तृप्ती

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज