बाग - कथुली
बाग “तुझ्या तुळशीच्या रोपाकडे बघ गं. काय झालंय ? तुळस नीट बहरेल की नाही शंकाय.” घरात येताच आईचं हे वाक्य कानावर पडलं तशी रमा धावतच तुळशीच्या रोपाकडे गेली. बघितलं तर रोप तसंच होतं. त्याला काही झालं नव्हतं. मग आई का असं म्हणतीय? रमा गोंधळली. हातपाय स्वच्छ धुवून ती पुन्हा कुंडीजवळ गेली. तिनं नीट निरखून पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तुळस वाढण्याऐवजी दुसरंच काहीतरी उगवलंय त्यात. हं ... हे तण आहे तर... असा विचार कर असतानाच तिला काही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला. बाबांच्या एका मित्राची बाग बघून आल्यानंतर ती बाबांच्या मागे लागली होती. आपण पण बाग करूया नं. तेव्हा बाबांनी तिला समजावलं होतं “बाग करणं इतकं सोपं नाही रमा ! एखाद्या माणसाइतकीच निगुतीनं त्याची काळजी घ्यावी लागते. नुसती कुंडी आणली, त्यात रोप लावलं, त्याला खत, पाणी, उन इतकं दिलं की बाग तयार होते असं नाही काही. त्याला खूप जपावं लागतं. त्यात तण होऊ नये म्हणून, पक्षी सुद्धा कधी कधी छोटा कोंब खाऊन टाकतात. त्यापासूनही जपायला लागतं. इतकं सगळं जमेल का तुला ?” तेव्हा तिनं उत्साहात होकार दिला होता. “ठीक आहे मग. तुला आता सु...










Comments
Post a Comment