Mitrancha Mitra tu la khas patra

मित्रांच्या प्रिय मित्रा 
फेसबुक यांस ,

तू  नुकतच १२ व्या वर्षात पदार्पण केलस म्हणून तुला सप्रेम शुभेच्छा !
माझ हे आगंतुका सारख पत्र पाहून तुला आश्चर्य  वाटेल पण त्याच कारण वर सांगितलेले  आहेच. असो , तर तू खुप जणांना आवडतोस. अनेक जण तुझ्याद्वारे इतरांशी बोलतात. एकमेकांच्या संपर्कात येतात . तुझ्या इथे अकौंट ओपन केल रे केलं कि संपर्काला सुरवातच होते. मग  विनोद, प्रश्नोत्तरे , टीका टिप्पणी चालू होते . ह्याच्या  फोटोला  कॉमेंट्स कर , तिला लाईक कर, त्याच्या प्रश्नाला उत्तर दे , त्याचे मित्र किती, माझे किती ? कोण ? आता कुठे आहे ? काय करत आहे ? इ इ.  हे पाहण्यात वेळ छान  निघून जातो .  
तरी मला  एक प्रश्न पडतो  तुझ नाव चाटिंग बुक / मिटींग बुक असे न ठेवता फेसबुक का  ठेवलं असावं ?  फेस म्हणजे चेहरा आणि  बुक म्हणजे पुस्तक . चेहऱ्यांच पुस्तक का पुस्तकी चेहरे ?? स्वतः  बद्दल ची  सर्व माहिती कुणीही न विचारता सांगणे आणि दुसऱ्याची हि जाणून घेणे हे सहज शक्य होते ते केवळ तुझ्यामुळे. त्यामुळे निरनिराळ्या चेहऱ्याची माणसे पाहता येतात.  काही माणसांचे चेहरे हे खरोखर एखाद्या पुस्तका प्रमाणे बोलके असतात तर काही आखीव रेखीव पण कोऱ्या पानांचे चेहरे घेऊन जगत असतात (चेहऱ्याचे बाह्य रूप नसून अंतर्मनाचा भाग महत्वाचा ). 
तरी देखील एक गोष्ट निर्विवादपणे  मान्य आहे कि , तू  माणसांना माणसांशी संवाद साधायला भाग पाडतोस . एकमेकांच्या गोष्टी शेअर करतोस . व्यवहारी जगातील धावपळीला कंटाळलेल्याना तू  मनाने एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतोस . संवादाची भूक निर्माण  करण्याचं तुझ कौशल्य  वाखाणण्याजोगे आहे .  संवादातून हळू हळू  सूसंवादकडे  वाटचाल चालू आहे हे देखील तुझ यश !!!! कधी  वेगवेगळे  फोटो आणि व्हिडीओ या मुळे थोड फार का होईना प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटल्याचा  आनंद  मिळतो . तुझ्या मुळे  जग फार जवळ आल्यासारखं वाटत . तुझ्या अफाट लोकप्रियतेच कारण हि तेच आहे. आज पर्यंत तंत्रज्ञाच्या प्रगतीने आपल्याला संवादाची अनेक माध्यमे उपलब्ध करून दिली पण तुझ्या इतका  प्रभाव कोणी टाकू शकला नाही. 
  
लाडक्या मित्रा  तुला शुभेच्छा अन धन्यवाद !!!

Comments