Shir Salamat To Pagadi Pachas !!!!

शीर सम्राट   !!!!


       पुण्यामध्ये नुकताच हेल्मेट सक्ती नावाच वादळ येऊ  घातले आहे . जुन्या इंग्लिश नाटक 'Hamlet ' मध्ये जगावं कि मरावं असा जो ज्वलंत प्रश्न गाजला  होता  त्याप्रमाणे  आता पुण्यात हेल्मेट घालाव कि न घालाव हा गाजत आहे. बहुतेक नुकत्याच गाजत असलेल्या ' नटसम्राट '  चा परिणाम असावा.  हि सक्ती जर खरोखरच यशस्वी झाली तर  ' शीर सम्राट ' नावच नवीनच नाटक पुण्यात निर्माण होऊ शकत. ज्याचा परिणाम पुण्यात सर्वत्र दिसून येईल. यामध्ये हेल्मेट न घालणारे सर्व लोक  एका बाजूला आणि  घालणारे  अगदीच तुरळक  नगण्य !  एक बाजूला असे २ गट पडतील.  मधला गट  असणे  पुण्याच्या लौकिकाला साजेसे नाही.  कारण आमची मत  ठाम असतात. 
          हे नाटक  कोणत्याही  थेटर मध्ये न  दिसता पदपथावर दिसेल . हेल्मेट न  घालणारे लोक हे रस्त्यावर  आंदोलनकार्य  करतील. त्यांच्या  मते  पुणेकरांना डोके सांभाळण्यासाठी दुसऱ्या कोणावर  अवलंबून राहण्याची  गरज  नाही. हेल्मेट च्या ताब्यात ते आपले जगप्रसिद्ध डोके सुपूर्त करणार नाहीत.  त्यांचे ते सांभाळतील. तुम्ही  फ़क़्त  रस्ते  नीट करा,  वन वे  बंद करा . सार्वजनिक वाहतूक चांगली करा. सिग्नल आणि मार्गदर्शक  पाट्या दिसतील अशा ठेवा . रस्त्यावरच्या पार्किंग ची सोय करा  अशा अनेक सूचना पुणेकर करतील. 
        पुणेरी पाट्या मध्ये बदल होतील.  हेल्मेट पार्किंग चा प्रश्नही निर्माण होईल. मंदिरा मध्ये हेल्मेट देखील ठेवण्याचे ठिकाण होईल काही लोकांना रोजगार मिळेल. कृपया येथे शिरस्त्राणे म्हणजेच हेल्मेट ठेवावे अशी पाटी दिसेल.  नंतर हेल्मेट चोरीला गेल्यास मंदिराचे कार्यकर्ते अथवा हॉल  चे कार्यकर्ते  जबाबदार  नाहीत हे सांगण्यात येईल .  
हेल्मेट चे दुष्परिणाम जाणवतील केस गळण्याचे प्रमाण वाढल्यावर हेअर तेलाचा खप वाढेल हेल्मेट बरोबर हेअरतेल मोफत द्यावे. पुणेरी मुलीना स्कार्फ मोफत द्यावा. हेल्मेट घालणाऱ्यान साठी  आयुर्वेदिक  शाम्पू  निर्माण होईल . असे  बरेच काही घडेल.  

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज