Selfi
एक सेल्फी हवाच , पण 'ति'च्या साठी !
पुण्यातील अभिजीत पाटील आणि नुपूर नानल या दोन फोटोग्राफर्स नी आपल्या फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून या साऱ्याची जाणीव करून दिली आहे. अभिजित पाटील यांनी "पुरुषी चष्मा " या शीर्षका खाली स्त्रीला उपभोग्य वस्तू या नजरेने पाहणाऱ्या पुरुषी नजरांचे अचूक चित्रण टिपले आहे . त्यांच्या मते पुरुषांना हि, "हा स्वतः च्या मनाचा आरसा म्हणजे सेल्फी पाहून मनातल्या मनात शरम वाटेल किंवा त्यांचा बेडर पणा कमी होईल. आणि स्त्रियाही स्वतःच्या असहाय्यतेच्या बेड्या सोडून मोकळेपणाने प्रश्न विचारतील. "
नुपूर नानल हिने देखील घरकाम करणाऱ्या मोलकरीण वर्गात मोडणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या स्त्रियांचं समाजातील स्थान , त्यांची बालवयात होणारी लग्न, घरी होणारा छळ, कुपोषण इ. गोष्टी त्यांच्या दैनंदिन समस्या आहेत त्याची जाणीव आपल्याला करून दिली आहे. जवळपास भारतातील ४० लाख स्त्रिया ह्या घरकामगार या वर्गात मोडतात त्यांच्या अंतरंगाचा, समस्यांचा सेल्फी तिने दाखवला आहे .
असाच आणखीनही एक प्रयत्न पुण्यातील रुची आरेकर आणि गायत्री पोलकेमवार या दोघींनी केला आहे. पुरुष प्रधान समाजात स्त्रीला लहानपणापासूनच दुय्यमत्व देण्याचा प्रघात आहे. ह्या चुकीच्या प्रघातामुळे आज स्त्रियांच्या मनात नकारात्मक भावना जास्त प्रमाणात जाणवतात. अगदी लहान वयातील म्हणजे शालेय मुलींमध्ये हि सतत भीती, अस्वस्थता, ताण, निराशा त्यांचे होणारे शोषण ह्याचे परिणाम जाणवतात. परंतू हेतुपूर्वक त्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते. तिला मानसिकरित्या सक्षम न बनवता दाबले जाते. ह्याच उत्तम चित्रण ह्या दोघींना abstract painting च्या प्रदर्शनाच्या माध्यमातून केल आहे. निरनिराळे आजार हे केवळ मानसिक ताणामुळेच निर्माण होतात आणि हे ताण समजून घेवून त्यावर चर्चा होवून त्याचं निराकरण व्हावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. समाजाला स्त्रियांच्या भावविश्वाची , मानसिक गुंत्यांची जाणीव व्हावी अशा दृष्टीने हा स्त्रीमनाचा सेल्फी त्यांनी साकारला आहे .
सध्या सगळीकडे आपण पाहतो कि स्मार्टफोन मुळे सेल्फी काढण्याच प्रमाण वाढलय. अगदी त्याच फ्याड आलाय अस म्हणल तरी चालेल. पण ह्या साऱ्या मध्ये सामजिक जाणिवेपासून आपण थोडे दूर चालले आहोत. केवळ मी आणि माझ कुटुंब अशा मनोप्रवृत्ती मधून समाजात घडणाऱ्या अपप्रवृत्ती कडे डोळेझाक केली जात आहे. आणि ह्याच उदाहरण म्हणजे निर्भया बलात्कार प्रकरण. सबंध भारत भर ह्या घटनेचे पडसाद उमटले तरी देखील नंतर अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आणि घडत आहेत हि खरोखरच शरमेची बाब आहे.
ह्या साऱ्याचा विचार करता केवळ कायदे आणि पोलिस यंत्रणा सक्षम करून फार काही बदल घडणार नाही. जर स्त्रियांची सुरक्षितता हा प्रश्न अजूनही बिकट होत असेल तर मात्र आता वेळ आली आहे ती समाजाच्या मानसिकतेत बदल घडण्याची, वैचारिक क्रांतीची. सार काही सरकारवर विसंबून राहण्याची वृत्ती बदलायला हवी आहे. आणि आनंदाची गोष्ट हि, कि आपल्या युवा पिढीला याची जाणीव होऊन त्यांनी त्यांच्या परीने पाऊले उचलली आहेत. गरज आहे ती आपल्या प्रतिसादाची.
पुण्यातील अभिजीत पाटील आणि नुपूर नानल या दोन फोटोग्राफर्स नी आपल्या फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून या साऱ्याची जाणीव करून दिली आहे. अभिजित पाटील यांनी "पुरुषी चष्मा " या शीर्षका खाली स्त्रीला उपभोग्य वस्तू या नजरेने पाहणाऱ्या पुरुषी नजरांचे अचूक चित्रण टिपले आहे . त्यांच्या मते पुरुषांना हि, "हा स्वतः च्या मनाचा आरसा म्हणजे सेल्फी पाहून मनातल्या मनात शरम वाटेल किंवा त्यांचा बेडर पणा कमी होईल. आणि स्त्रियाही स्वतःच्या असहाय्यतेच्या बेड्या सोडून मोकळेपणाने प्रश्न विचारतील. "
नुपूर नानल हिने देखील घरकाम करणाऱ्या मोलकरीण वर्गात मोडणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या स्त्रियांचं समाजातील स्थान , त्यांची बालवयात होणारी लग्न, घरी होणारा छळ, कुपोषण इ. गोष्टी त्यांच्या दैनंदिन समस्या आहेत त्याची जाणीव आपल्याला करून दिली आहे. जवळपास भारतातील ४० लाख स्त्रिया ह्या घरकामगार या वर्गात मोडतात त्यांच्या अंतरंगाचा, समस्यांचा सेल्फी तिने दाखवला आहे .
असाच आणखीनही एक प्रयत्न पुण्यातील रुची आरेकर आणि गायत्री पोलकेमवार या दोघींनी केला आहे. पुरुष प्रधान समाजात स्त्रीला लहानपणापासूनच दुय्यमत्व देण्याचा प्रघात आहे. ह्या चुकीच्या प्रघातामुळे आज स्त्रियांच्या मनात नकारात्मक भावना जास्त प्रमाणात जाणवतात. अगदी लहान वयातील म्हणजे शालेय मुलींमध्ये हि सतत भीती, अस्वस्थता, ताण, निराशा त्यांचे होणारे शोषण ह्याचे परिणाम जाणवतात. परंतू हेतुपूर्वक त्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते. तिला मानसिकरित्या सक्षम न बनवता दाबले जाते. ह्याच उत्तम चित्रण ह्या दोघींना abstract painting च्या प्रदर्शनाच्या माध्यमातून केल आहे. निरनिराळे आजार हे केवळ मानसिक ताणामुळेच निर्माण होतात आणि हे ताण समजून घेवून त्यावर चर्चा होवून त्याचं निराकरण व्हावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. समाजाला स्त्रियांच्या भावविश्वाची , मानसिक गुंत्यांची जाणीव व्हावी अशा दृष्टीने हा स्त्रीमनाचा सेल्फी त्यांनी साकारला आहे .
केवळ महिला दिन साजरे करून आणि कायदे करून फार काही साध्य होणार नाही त्यासाठी गरज आहे ती समाजातील नागरिकांनीही 'स्वतः चा सेल्फी', खास करून स्त्रियांकडे बघण्याचा एकदा तपासून पहावा. कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता आणि स्वतःचा पैसा आणि वेळ खर्च करून समाजात जाणीव निर्माण करण्यासाठी ह्या कलाकारांनी उचलेले पाउल जर असेच पुढे पडत राहावे अशी अपेक्षा असेल तर गरज आहे आपण त्यांना साथ देण्याची.
Comments
Post a Comment