Don't Worry Be Happy

Don't Worry Be Happy 


काल  अचानक  एक उत्तम नाटक पाहण्याचा योग जुळून आला . Don't Worry Be Happy
हे त्या नाटकाचे नाव. उमेश कामत आणि स्पृहा जोशी हि छोट्या पडद्यावर गाजलेली जोडी 
प्रत्यक्षात काम करताना बघायला मिळणार म्हणून आनंद झाला . नाटकाच्या नावावरून  हे एक गमतीदार  नाटक असेल अस वाटल होत . परंतू  ह्या नाटकाने आमचा सुंदर अपेक्षाभंग केला. सुंदर अशासाठी कि  अपेक्षाभंगाच वाईट वाटल नाही. कारण नाटक हे विनोदी  अंगाने असले तरी विषय हा नाजूक आणि म्हंटल तर गंभीर  आणि सत्य परिस्थिती वर आधारित  होता .  
हे नाटक पाहताना आपण नकळत गुंगून जातो. हसता हसता कधी आपल्या डोळ्याच्या कडा ओलावतात ते देखील समजत नाही.  पण यातील सत्यता आपण नाकारू शकत नाही.  करियर , लग्न आणि इतरांशी आणि आपल्या साथीदाराशी असलेले संबंध हे कसे बदलत जातात ते यातून फारच प्रभावीपणे मांडल आहे.  सोशल साईट चा आपल्या नात्यावर होणार कळत नकळत परिणाम पण यातून जाणवत रहतो.  संसार यशस्वी होण यासाठी केवळ प्रेमच पुर पडत नाही तर योग्य वेळी केली तडजोड आणि परिस्थितीचा स्विकार करण हे देखील किती महत्वाच आहे, हे यातून  स्पष्ट पणे  समोर येत . 
ज्यांच्या लग्नाला ४-५ वर्ष झाली आहेत त्यांनी हे नाटक बघावच पण  जे लग्नाळू आहेत त्यांनी देखील एकदा हे नाटक पाहायला काहीच हरकत नाही.  खरोखर केवळ तीनच पात्र  स्टेज वर असून कुठे हि बोअर  किंवा  खूपच ताणलाय अस वाटत नाही. या सर्व टीमला धन्यवाद द्यावेत कि त्यांनी हा विषय इतका सहज हाताळला आहे. 

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज