Kavita Manogat
कवितेशी मनोगत प्रिय कविते , तू माझ्या आयुष्यात असणं ह्यान माझं आयुष्य अर्थपूर्ण झालय खरं पण तू नसताना हि ते अर्थहीन अस नव्हतंच . तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मनाचा गाभारा बराच मोकळा होता. तू आल्यावर तो भरू लागला, त्यातले स्नेहाचे , आपुलकीचे दीप उजळू लागले आणि त्याने अनेक वाटा उजळल्या . हे हि खरं त्यामुळेच कि काय तू माझा प्राण बनलीस, श्वास बनलीस, ध्यास बनलीस, सशरीर आत्मा बनलीस. चकोराने पौर्णिमेच चांदण जस मनमुराद प्राशन करावं, तसं तुझ्या अनेक छटांचा आनंद मी मनमुराद लुटला. तुझ्या एकावर एक कोसळणाऱ्या सरी माझ्या दृष्टीने लाखमोलाच्या होत्या आणि अचानक . . . . . . . तू निघून गेलीस मग मला जाणवल, कि जस तुझ येण अचानक नव्हत तस तुझ जाण ही. त्या मागे कितीतरी जाणिवांचा , अनुभवांचा स्पर्श होता , एका चिरंतन तपश्चर्येची साथ होती. त्यामुळेच जरी तू माझ्यावर रूसलीस , तरी जाताना आपलं बी मात्र पेरून गेलीस. आज तू माझ्या जवळ नाहीस पण तू असतानाचे तुझे संदर्भ , तुझ अस्तित्...