कविता
कविता करावीशी वाटतानाच ती एकदम सुचेनाशी होते . शब्द अडखळतात , भावना ओथंबतात आणि मन भरून येते, हुंदका दाटून येतो पण शब्द काही सुचत नाहीत. शब्दांचे अर्थ दूरवर असतात कुठेतरी धुक्यात हरवलेले अस्पष्ट, अंधुक दिसणारे प्रकाशमान न होणारे पण जाणवणारे. हळूच डोकावणारे आणि लगेच लपणारे. हा शब्दांचा आणि माझा लपंडाव नेहमीचाच आहे. ते खट्याळ शब्द मग कधी तरी अचानक झाडावरून पानं अलगदपणे गळाव ना तसेच गळू लागतात आणि या कागदावर उतरतात.
उतरताना ते असतात वेगळे आणि उतरल्यावर तर त्याचं संपूर्ण स्वरूपच बदलले असत. भावनेत समरसून ते आपल अस्तित्वच बदलवून टाकतात. कधी त्यात मोहकता असते, कधी नाद तर कधी आनंद, वेदना तर कधी क्रांती अन शांती हि. कधी चैतन्य तर कधी उदासीनताही असते.
Comments
Post a Comment