GULMOHOR
गुलमोहोर !
काही दृश्य अशी मनोहर असतात कि ती पाहताच क्षणी आपण त्यांच्या प्रेमात पडतो . गुलमोहराच्या झाडच आणि माझ नात हे अस अगदी पहिल्यावहिल्या प्रेमासारख आहे. मी लहान असताना आमच्या समोरच्या इमारती च्या बाहेरील बाजूस कुणी तरी एक लहानस रोप आणून लावल. त्याला न कसला वास ना कसलं फुल ! मात्र दिवसेगणिक त्याच्या पानांमध्ये भर पडत होती असा लांबून मला तरी वाटायचं . हळूहळू ते झाड आणि मी आम्हा दोघात एक नात निर्माण झालं . नकळत त्या झाडच संरक्षण कराव असा मला वाटू लागलं. आणि अचानक एक दिवस त्या झाडाला कुंपण घातल गेलं . झालं ते झाड सुरक्षित झाल पण बंदिवान हि झालं. आता त्याला पाणी देखील मिळू लागलं. मग मात्र झाडाने माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने प्रगती केली . त्याला आता असंख्य फांद्या अन लालपिवळ्या रंगाची छोटी छोटी पाने येवू लागली .
हळूहळू ते झाड आता त्याच्या डौलदार रूपाने सगळ्यांची नजर स्वतः कडे वळवून घेऊ लागलं. झाड आता कुंपणातल्या बंदिस्त सुरक्षेला कंटाळल होत. नव्याने ओळख झालेल्या आकाशाकडे झेपावू पाहत होतं. त्याला आता चाहूल लागली होती आपल्यातल्या तरुणाईची यौवनाची . स्वतः मधला होणारा बदल त्याला आता जाणवत होता अन त्याने तो सुखावत होता. गर्द केशरी - पिवळी फुले दाटीवाटीने जमू लागली होती त्यांचे गुच्छ कोणाचेहि मन वेधून घेत होते. त्याला खऱ्या अर्थाने दाद दिली ती त्याच्या गुच्छा आड लपून राहणाऱ्या चिमण्या पाखरांनी. त्याची फुले पिकण्याच्या काळात हिरव्या पानात पोपटी रंगाचे पोपट आपल्या लालचुटुक चोचीने काही तरी शोधताना जाणवायचे . जणू त्या झाडाचा आनंद ते स्वतः नाचून व्यक्त करायचे.
असं फळाफुलांनी लगडलेले झाड पहिले कि निसर्ग हा किती निरनिराळ्या रूपांमध्ये दडलेला आहे ते जाणवायच. उगवतीच्या सूर्यात ते झाड पाहिलं ना कि जणू सूर्याने त्या झाडातले रंग घेतले अस वाटायचं इतके ते झाड त्याच्या प्रकाशाशी एकरूप व्हायचं. दुपारच्या रणरणत्या उन्हात त्याची सावली सुद्धा मोहक वाटे. पूर्ण गच्च सावली नाही आणि रणरण उन्ह नाही. त्याच्या सावलीला उभे राहण्याऱ्याला वाटेल सोनेरी रंगांच्या फुलांची उधळण होत आहे. उन पाऊस जस हवहवस वाटत तशीच त्याची सावली होती.
संध्याकाळच्या वेळी सांज वाऱ्याच्या सोबत त्याच्या नाजूक सुंदर फुलांनी जमिनीवर पखरण व्हायची. किती मनोहर दिसायचा तो सडा. झाडांची पानगळ सुंदर आहे कि त्यावरची पानेफुले सुंदर हे ठरवणे कठीण व्हायचे. आता झाड स्थिर झाल होते. त्याला कुणाच्या संरक्षण करण्याची गरज उरली न्हवती आता तेच इतर छोट्या छोट्या पक्षांना आपल्या फांद्यां मध्ये आश्रय देऊ लागल होते. त्याच्या मनमोहक रूपाने म्हणा त्याच्यामुळे मिळणाऱ्या सावलीमुळे म्हणा ते आता सर्वांनाच हवहवस वाटू लागल होत. आणि त्याच्या आजूबाजूला इतर तशीच झाड त्याला साथ देत उभी होती जणू काही तो रस्ता गुलमोहर पथच झाला होता. संध्याकाळी तो संपूर्ण रस्ता पानाफुलांनी भरून जाई. जणू काही घरी परत येणाऱ्याचा थकल्या भागल्या जीवाचं तो पायघड्या घालून स्वागत करत असायचा. असा हा गुलमोहर मला आता अगदी सवयीचा झाला होता. रिकामा वेळ मिळाला कि त्याच्या पानाफुलांकडे , पक्ष्यांकडे पाहत बसण्याचा छन्द लागला होता. त्याच्या सावलीला उभ राहण्याची आता सर्वांनाच सवय झाली होती. त्याच अस्तित्व आता आम्हाला गरजेच झाल होत.
ते उन्हाळ्याचे दिवस होते. खूप उन लागू नये म्हणून लोक त्याच्या सावलीला थांबले होते. अचानक पक्ष्याचा किलबिलाट चालू झाला. काय झाले म्हणून मी गच्चीत आले तर जोरात सोसाट्याचा वारा सुटला , ढग आले आणि अचानक गारांचा पडू लागल्या. त्या सर्वांमुळे झाडा खालच्या लोकांची आणि झाडावरच्या पक्षांची धावपळ झालि. वीजा कडकडू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरवात झाली. सगळी लोक मिळेल त्या भक्कम आडोशाला पळाले . मी खिडकीतून पाहू लागले झाड बिचार एकट मुकेपणाने ते पावसाच मारा झेलत होत. आपल्या पानांत पक्ष्यांना थारा देत होत आणि अचानक धडामधूम असा कानठळ्या बसविणारा आवाज झाला . सगळेजण घाबरले . लाईट गेले आणि जोरजोरात आवाज येऊ लागले . थोड्याच वेळात ढग पांगले आणि आम्ही सारेच बाहेर आवाज कसला झाला ते पाहायला आलो तर ते झाड मरून पडल होत त्याच्या फांद्यांनी सगळ्या विजेच्या तारा , टेलिफोन च्या तारा तुटल्या होत्या. मनुष्य हानी सुदेवाने झाली नाही पण सर्वांना आश्रय देणार ते सुंदर झाड मात्र कायमच गेल होत पुन्हा परत कधी हि न बहरण्यासाठी.
जेव्हा त्याच्या फांद्या साफ करण्यात आल्या तेव्हा त्या गर्दीत त्याने नुकतेच जन्मलेल्या पक्ष्याच्या पिलांना मात्र जीवदान दिल होत. त्याच कर्तव्य अखेरच्या क्षणीही त्याने पळाल होत.
निसर्गात देव असतो ह्या साठी दुसरा आणखी काय पुरावा हवा नाही का ?

Comments
Post a Comment