Posts

Showing posts from February, 2017
We    can talk election  ,   we   can walk  election ,  we   can   laugh  el ection कारण निवडणूक आणि जाहिरात यांचं अतूट नातं आहे   सगळं कसं शांत निवांत वाटतंय. गेले काही दिवस   निवडणुकीच्या वातावरणाची जी धामधूम चालली होती ती आता एकदम बंद झाली. बहुमताने अपेक्षित सरकार निवडून आलं. रणरणत्या उन्हात, नावनोंदणीचे, मतदान केंद्राचे अनेक  गोंधळ झाले असूनही ज्यांनी ज्यांनी मतदान  केलं त्यांना आपलं मत वाया गेलं नाही याचा आनंद झाला असेल. खरोखरच आपल्याकडच्या निवडणुका हा जसा चर्चेचा (गंभीर) विषय आहे तसाच तो करमणुकीचा विषयही झाला आहे. गल्लीतल्या मुलापासून दिल्लीतल्या साहेबापर्यंत सगळे कसे आळस झटकून कामाला लागतात. आता तर काय इलेक्ट्रिक मीडियामुळे फेसबुक, ट्विटर, ई-मेल, व्हाट्सअप या सगळ्यावर जोरदार प्रचार चालू होता. सिनेमातल्या वेगवेगळ्या गाण्यांच्या चालीवर प्रचार करण्याची जी कल्पना होती ती निव्वळ मनोरंजनात्मक होती.  सोशल मीडियावरच्या विनोदात देखील निवडणूका अग्रभागी होत्या. याबाबतीत आपण असं म्हणू शकतो,...