We  can talk election , we can walk electionwe can laugh election कारण निवडणूक आणि जाहिरात यांचं अतूट नातं आहे 

सगळं कसं शांत निवांत वाटतंय. गेले काही दिवस निवडणुकीच्या वातावरणाची जी धामधूम चालली होती ती आता एकदम बंद झाली. बहुमताने अपेक्षित सरकार निवडून आलं. रणरणत्या उन्हात, नावनोंदणीचे, मतदान केंद्राचे अनेक  गोंधळ झाले असूनही ज्यांनी ज्यांनी मतदान  केलं त्यांना आपलं मत वाया गेलं नाही याचा आनंद झाला असेल. खरोखरच आपल्याकडच्या निवडणुका हा जसा चर्चेचा (गंभीर) विषय आहे तसाच तो करमणुकीचा विषयही झाला आहे. गल्लीतल्या मुलापासून दिल्लीतल्या साहेबापर्यंत सगळे कसे आळस झटकून कामाला लागतात. आता तर काय इलेक्ट्रिक मीडियामुळे फेसबुक, ट्विटर, ई-मेल, व्हाट्सअप या सगळ्यावर जोरदार प्रचार चालू होता. सिनेमातल्या वेगवेगळ्या गाण्यांच्या चालीवर प्रचार करण्याची जी कल्पना होती ती निव्वळ मनोरंजनात्मक होती.  सोशल मीडियावरच्या विनोदात देखील निवडणूका अग्रभागी होत्या. याबाबतीत आपण असं म्हणू शकतो, We can talk election, we can walk election, we can laugh election. कारण निवडणूक आणि जाहिरात यांचं अतूट नातं आहे.  


मतदान केलेल्यांना मतदान केलं म्हणून तात्काळ आकर्षक बक्षीस, खरेदीवर सूट देण्यात आली आणि मतदारांना आकर्षित करण्यात आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काय काय धमाल असेल याची कल्पना करण्यात मन रमून गेलं. आम्ही ज्या ठिकाणी मतदान करायला गेलो तिथे एका छोट्या मुलीला मतदान करायचं होत. प्रत्यक्षात लहानमुलांना निवडणुकीशी फारसं देणंघेणं नसतं तरीही निवडणूक ह्या प्रकाराबद्दल बालसुलभ कुतूहल मात्र असतंच. मतदान करतानाचा ' बीप ' आवाज आणि बोटावरली शाई याच आकर्षण तिला होत. ती वडिलांकडे हट्टच धरून बसली मग वडिलांनी तिला जवळ उभ्या असलेल्या पोलीस मामांकडे नेलं आणि त्यांनी मग तिला समजावून सांगितलं. शेवटी तिला एक चॉकलेट मिळाल्यावर ती शांत बसली आणि तिच्या वडिलांना म्हणाली 'पपा मला वोटिंग न करताच गिफ्ट मिळालं ' तिच्या दृष्टीने  तो क्षण आनंदाचा जणू  निवडणूक  जिंकल्याचा होता. वोटिंग केल्यावर फ्री गिफ्ट  मिळणाऱ्या जाहिरातीचा केवढा प्रभाव त्या मुलीवर झाला होता ? याचे आश्चर्य वाटले.  

हा सारा प्रकार पाहून अचानक आठवली, एक लहान मुलांची जाहिरात  Sunfeast Yippee Noodles ची. ती जाहिरात बनवताना निवडणुका त्यातल्या गंमत जमती आणि आश्वासनातला फोलपणा लहान मुलांच्या बालसुलभ वृत्तीतून, वागण्यातून टिपला आहे.  जरा गंमत बाजूला ठेवून पाहिलं तर मतदान करणारी भावी पिढी या सगळ्या गोष्टीकडे नक्की कशा दृष्टीने पाहत असेल त्याचा प्रत्यय येतो आणि हसत हसता आपण नकळत अंतर्मुखही होतो. एरव्ही कंटाळवाण्या वाटणाऱ्या जाहिरातीचा उपयोग अशा पद्धतीने केला तर ती जाहिरात नक्कीच संस्मरणीय ठरते आणि विचारप्रवृत्त करते. येथे त्या जाहिरातीची लिंक दिली आहे. 

Sunfeast Yippee Noodles Vote for Yippee tvc

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज