History
इतिहास शाळेत बऱ्याच जणांना न आवडणारा विषय. पण मला मात्र इतिहास विषय बद्दल कुतूहल वाटायचे आणि त्याबद्दल बरेच प्रश्न हि पडायचे. पहिला प्रश्न हा कि ह्या इतिहासातल्या गोष्टी कोणी लिहिल्या ? कारण त्या सर्व गोष्टींना इसवीसन शके अमुक अमुक साली लिहित. हे इतक कोणी आणि का लिहित असेल ? बर ते सांभाळून का ठेवत असतील आणि कुठे ठेवत असतील ? लिहिणाऱ्या माणसाचं अक्षर छान असेल का ? तो कुठल्या पेनने लिहित असेल ? आमच्या पेपर वर पाणी पडल कि त्याची अक्षर पुसट होतात त्यांची कशी इतकी दीर्घकाळ चांगली राहतात ? शिवाय त्याने ते जाड पानांच्या वहीत लिहील असेल का ? तेव्हा बाईडिंग ची सोय नसताना ते सुरक्षित कस राहील ? आमची पुस्तक तर पुढच्या वर्षा पर्यंत हि टिकत नाहीत ह्यांचीच कशी टिकतात ? आणि लिहील तर लिहू दे ना ! पण आम्हाला का ते शिकवावं ? ह्यातून काय फायदा ? हे आणि असे किती तरी प्रश्न मला पडत. जसे जसे वरच्या इयत्ता मध्ये गेले तस तशी इतिहासाची गोडी लागली. एक सनावळ्या सोडल्या तर बाकी कशाचा त्रास ...