Pustak Mitra

पुस्तकाची  कैफियत 


किती दिवस झाले तुझी चाहूल नाही
हळुवार मायेचा स्पर्श  हरवलाच जणू काही
अजून किती वेळ  ओठ मुडपून राहायचं 
संवादाच्या विरहाने आत आत झुरायचं

आता कंटाळा आलाय या बंदिस्त जगण्याचा
आठवतो तो  दिवस तुझ्या हातात झुलण्याचा
कितीदा तू तेव्हा  मला प्रेमाने कुरवाळलस 
मला  गमवण्याच्या भीतीने तुझ  नाव लिहिलंस

तुझ्या उपेक्षेचं ओझं आता कुठवर पेलायचं
गत स्मृतीनेच आता माझ्या मनाला रमवायच
तुला आवडलेल्या ओळीं वरती हळुवार खुणा करताना
मी मनोमन आनंदलो होतो तो अर्थ जाणून घेताना

आपल्या मैत्रीच्या सुरांच कसं एकच गाणं बनायचं
तुझ्या संदर्भ खुणेलाही (बुकमार्क ) मी उरी जपायचं
आठवतात का ते दिवस, तु मला कुशीत घेऊन निजताना
वाचता वाचता मिटल्या  डोळ्यांनी पुढली  पाने भिजताना

कधी चहा पिता पिता ,तर कधी जेवताना सोबत असायचो
तुझ्या पहिल्या वहिल्या प्रेमपत्राला हळूच मिठीत घ्यायचो
कधी जपलेल्या मोरपिसाला, तर कधी सुकलेल्या फुलांचा सुगन्ध मी दडवायचो
तू माझा नि  मी तुझा या कल्पनेने च  सुखवायचो

कधी परतील ते दिवस, तू माझा असतानाचे
माझ्या नशिबी ते सुखही नाही पिकले आपसूक  गळायचे
पिकले आपसूक  गळायचे









Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज