Posts

Showing posts from June, 2016
अवघा रंग एकाची झाला निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला शक्तीचे स्वर लेऊनि सावळ्या हा आला रंगांची दुनिया ही बदलते क्षणोक्षणी रंग चढाओढीच्या दुनियेत होतो असंगाशी संग मनाचे मनाशी नाते साधण्या हा आला निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला चराचरात रूप तुझे हे विश्व त्वांचि निर्मिले विसरुनी तुज मूळ स्वरूपा मन पार्थिवताचं गुंगले अमूर्त तुझे रूप हे सुरांतुनी साकारण्यास आला निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला कधी कृष्ण रंग  भीतीचा , कधी  हरित रंग समृद्धीचा कधी केसरी रंग  क्रांतीचा , कधी लाल रंग  क्रोधाचा , कधी जांभळा ऐश्वर्याचा , कधी श्वेत वैराग्याचा हा रंगाचा अनुपम सोहळाच जनरूपी जमा झाला अखेर शांतीचा नवा रंग उधळीत  हा कान्हा आला त्याच्या सवे पाहता पाहता अवघा रंग एकचि  झाला अवघा रंग एकचि  झाला

Aziz be chi shokantika

अझिझ  बे ची शोकांतिका  ........ तुझ्यासाठी अश्रू ढाळून आता हृदय थकलं आहे अश्रू गोठले आहेत आणि मनही गोठलं  आहे ........... असे आयुष्यातील विफलतेचे सूर आपल्या तंबोऱ्यावर आळवणाऱ्या 'अझिझ बे' या मनस्वी कलाकाराची  ही एक शोकान्तिका . " अझिझ  बे ची शोकान्तिका " हा तुर्की भाषेतील प्रसिद्ध लेखिका आयफर टंक यांच्या ' अझिझ  बे इंसीडन्ट ' या कादंबरी चा अरुणा दुभाषी यांनी मराठीत केलेला उत्कृष्ट अनुवाद होय. तुर्की भाषेतील महत्वपूर्ण व सर्वाधिक विक्री होणारी कादंबरी म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. एका कलाकारावरच्या जीवनावर आधारित असल्याने ही अतिशय उत्कट, थेट मनाला स्पर्श करणारा आणि व्यामिश्र अनुभव वाचकाला देते. तुर्की या संस्कृतीचा तेथील सामाजिक परिस्थितीचा परिचय ही कादंबरी आपल्याला करून देते. अझिझ  बे या कलाकाराच्या एकाकीपणात ओढवलेल्या मृत्यूपासून या कादंबरीची सुरवात होते. या दुःखी शेवटाची कारणमीमांसा करताना, गतकाळातील आठवणींच्या कथनातून अझिझ चा जीवनपट वाचका पुढे उलगडत जातो. अझिझ चे अ...