अवघा रंग एकाची झाला
निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला
शक्तीचे स्वर लेऊनि सावळ्या हा आला
रंगांची दुनिया ही बदलते क्षणोक्षणी रंग
चढाओढीच्या दुनियेत होतो असंगाशी संग
मनाचे मनाशी नाते साधण्या हा आला
निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला
चराचरात रूप तुझे हे विश्व त्वांचि निर्मिले
विसरुनी तुज मूळ स्वरूपा मन पार्थिवताचं गुंगले
अमूर्त तुझे रूप हे सुरांतुनी साकारण्यास आला
निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला
कधी कृष्ण रंग भीतीचा , कधी हरित रंग समृद्धीचा
कधी केसरी रंग क्रांतीचा , कधी लाल रंग क्रोधाचा ,
कधी जांभळा ऐश्वर्याचा , कधी श्वेत वैराग्याचा
हा रंगाचा अनुपम सोहळाच जनरूपी जमा झाला
अखेर शांतीचा नवा रंग उधळीत हा कान्हा आला
त्याच्या सवे पाहता पाहता अवघा रंग एकचि झाला
अवघा रंग एकचि झाला

Comments
Post a Comment