Posts

Showing posts from 2015
ती ……………………… भाग ५  घरी आल्या नंतर मी घरातल्या सर्वाना सांगितलं कि आज ती मला भेटली होती आणि तिला मी ते पुस्तकही दिल. ती जाम खुश होती. सर्वाना बर वाटलं. मला आता उत्सुकता होती कि तिच्या घरी गेल्यावरची परिस्थिती काय असेल. फारच आतुरतेने मी दुसरया दिवसाची वाट बघत होते . अखेर तो दिवस उजाडला घाईघाईने सार काही आटोपून मी बस कडे गेले. नेमकी बस लागलीच होती नाईलाजाने मी बस मध्ये चढले वाटलं आज काही तिची माझी भेट होत नाही .  एवढ्यात दीदी म्हणून हाक कानावर पडली वळून पहिल  तर ती बसली होती . ती ने मला जवळ बोलावलं बसायला जागा दिली आता आम्ही दोघी अगदी शेजारी बसून गप्पा मारू लागलो.  ती उत्साहाने सांगू लागली घरी गेल्यावर ती ने ते पुस्तक घरच्यांना दाखवलं , त्यांना हि ते आवडल. तिच्या आईने मला तिच्या घरी चहाला आमंत्रण दिल होत.  मी म्हणलं आता लगेच शक्य नाही पण कधीतरी नक्की येईन हो मी. मग तिला विचारलं वाचलस का पुस्तक हो म्हणाली , माझ्या जवळ एक अजून दुसर  पुस्तक होत म्हणल," वाच ! बघु जमत का तुला ?" पुस्तकाच नाव तिने बरोबर वाचून दाखवलं. पण...
ती ……………भाग  ४  पुस्तक देण्या-घेण्याच्या गोष्टी नंतर चार-पाच दिवस आमच्या दोघींची काही भेट झाली नाही. एक अर्थी ते बरच झाल कारण माझ्याकडे लगेच जाऊन पुस्तक आणायला वेळच नव्हता. पण त्या काळात मी ते पुस्तक आणले आणि तिची वाट पाहू लागले. पण त्यानंतरही ती दोन-तीन दिवस काही भेटली नाही. मग माझ्या मनाला रुखरुख लागली. हि गेली कुठे ? तिला बर नाहीये कि काय ? असे प्रश्न मला सतावू लागले. पण तिच्या मैत्रिणी तर दिसत होत्या ! मग हीच कुठे गायब झाली ? बर तिच्या मैत्रीणीना माझी भाषा कळण जसं अवघड तसं त्यानाही माझ बोलण कळण अवघडच कि. शेवटी ठरवलं बघू तरी प्रयत्न करून. संध्याकाळी तिच्या मैत्रिणींशी संवाद साधला. आणि कळल कि ती दुसरीकडे कामाला गेली आहे. मग त्यांच्या बरोबर मी तिला निरोप दिला म्हणाव, दीदी आठवण काढत होत्या त्यांना भेटायला ये.  त्यानंतर जवळ पास दोन-तीन दिवसांनी ती दिसली. नेहमीप्रमाणे मला पाहताच बोलायला आली. मी अगदी उत्साहाने ते पुस्तक तिला दिले. तिने ते फार हळुवारपणे हातात घेतले. जणू काही ती फार अनमोल अशी गोष्ट होती तिच्यासाठी. आतमध्ये तिचे नाव देखील लि...
ती ………………. भाग ३  आता तर काय तिची अन माझी रोज भेट होत होती दर वेळेस ती माझ्याशी जणू आपला हक्कच आहे अशा थाटात बोलत होती . बोलण्याचे विषय दरवेळेस वेगळे वेगळे असायचे . आजुबाजूच्या नवनवीन तांत्रिक गोष्टी मध्ये तिला खूपच रस होत. सारख हे काय ते काय विचारात असे. मोबाईल , कॉम्पुटर या बाबत तिला आकर्षण होत. तिचा भाऊ कॉम्प्युटर  मध्ये हुशार आहे अस  तीच मत होत. तो खूप जिद्दीने शिकत होता.  तिने तिच्या भावाशी माझी ओळख करून  दिली . एकदा गप्पांच्या ओघात मी तिला सहज विचारलं , " काय ग तू तशी हुशार आहेस कि कामात, मग तुला पुढ शिकावस का नाही वाटल ?" यावर ती म्हणाली , " दीदी शिकाव अस खूप वाटत पण काय करणार ? आमची परीस्थीती हि अशी , कि मला नुसते शिकता  येणार नाही आणि काम करून शिकायला मला जमत नाही कारण इथली भाषा वेगळी मला मराठी समजत पण लिहिता येत नाही, माझी भाषा कन्नड. कोण मला निट समजावून सांगणार ? आणि आता माझ वय पण शाळेत जाऊन शिकण्याच नाही. मग काय करू ? समदी मानस अगदी माझ्या कामावरील  ठेकेदार देखील म्हणतात कि तू शिक हुशार आहेस,तू पुढे ज...

Ti 2

ती ……………. भाग २ नेहमीप्रमाणे दिवस कामात व्यस्त जात होते आता तिची आणि माझी जरा  गट्टी जमली होती. रोज संध्याकाळी आणि सकाळी तिची भेट होऊ लागली होती . बरेच वेळा माझ्या आधीच ती आलेली असायची. मी येताना दिसले कि आपण होऊन पुढे यायची . " नमस्ते दीदी ! काल बस मध्ये लई गर्दी होती ना? तुम्हाला जागाच भेटली नाही. " मी म्हणल , " हो ना ! काय करणार , चालायचच . " थोडा वेळ शांततेत गेला. मग तिचे ते टपोरे डोळे उत्साहाने बोलू लागले. काहीतरी तिच्या कन्नड  भाषेत ती बरोबरीच्या तिच्या मैत्रिणीला सांगू लागली . बहुदा ते आमच्या दोघी बद्दल बोलण असाव .  रोज आम्ही दोघी भेटलो कि आम्हाला एकमेकींशी बोलताना पाहून आजूबाजूचे इतर लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहत असत. तिच्या मैत्रीणीना नवल आणि कौतुक वाटे . त्यांचे चेहरे पाहून समजत असे. त्या जरा अलीकडे तिला बिचुकून असतात , अस आपल मला वाटे . कारण ती होतीच तशी त्या सगळ्यांपेक्षा वेगळी.  तिच्या चेहऱ्यावरून तिच्या बुद्धिमत्तेबद्दल अंदाज बांधता येत होत. खास  करून तिचे डोळे पाणीदार आणि मासोळी सारखे लांब होते. तिच्या व्यक्तीमत्वात ए...

SURYA DEVO NAMO NAMHA

सुर्य देवो नमो नमः  आज मला मावळतीचा सूर्य खूपच आवडला. किती मनोहर रंग दिसत होते आकाशात. निळा , केशरी, पिवळसर, काळपट सर्व रंग एकमेकांच्या सीमा सांभाळत आकाशात जमले होते. वाटल, अरे  आज काय रंगाची मैफिल आहे का काय ? सूर्याच ते अस्ताला जाण पाहताना वाटलं कि जणू एखाद खोडकर मुल दिवसभर आपल्या अंगणात खेळतंय,  अन आता आईची हाक येतीये म्हणून घरी जातंय.  सूर्याची रूपं तरी किती दिसावीत या उन्हाळ्यात ? सकाळचा लडिवाळपणा , हळूहळू जवळ येउन कुशीत शिरणारी त्याची किरणं मग ऐन दुपारी माथ्यावर आल्यावर तरणाबांड  अन सळसळत्या उत्साहाने संपूर्ण चराचरावर स्वतः च वर्चस्व गाजवणारी त्याची किरणं , संध्याकाळी दमून भागून सार काही अनुभवाने जाणून हळूहळू आपल साम्राज्य आवरू लागलेली त्याची किरणं. पण त्यात निराशा नाही तर पुन्हा नव्या  उत्साहाने, नव्या जोमाने प्रगट होण्याचा त्याचा निश्चय दिसतो. खरच हा निसर्गच आपल्याला सार काही शिकवतो नाही का ?  दिवस रात्र , वर्षानुवर्ष हा खेळ रोज चालू आहे. कसल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता हा सुर्य रोज आपल्यासाठी उगवतो अन मावळतो द...

GULMOHOR

Image
गुलमोहोर !        काही दृश्य अशी मनोहर असतात कि ती पाहताच क्षणी आपण त्यांच्या प्रेमात पडतो . गुलमोहराच्या झाडच आणि माझ नात हे अस अगदी पहिल्यावहिल्या प्रेमासारख आहे. मी लहान असताना आमच्या समोरच्या  इमारती च्या बाहेरील बाजूस कुणी तरी एक लहानस रोप आणून लावल. त्याला न कसला वास ना कसलं फुल !  मात्र दिवसेगणिक त्याच्या पानांमध्ये भर पडत  होती असा लांबून मला तरी  वाटायचं . हळूहळू  ते झाड आणि मी आम्हा दोघात एक नात निर्माण झालं . नकळत  त्या  झाडच संरक्षण कराव असा मला वाटू लागलं.  आणि अचानक एक दिवस त्या झाडाला कुंपण घातल गेलं . झालं ते झाड सुरक्षित झाल पण बंदिवान हि झालं. आता त्याला पाणी देखील मिळू लागलं. मग मात्र झाडाने माझ्या अपेक्षेपेक्षा  जास्त वेगाने प्रगती केली . त्याला आता असंख्य फांद्या अन लालपिवळ्या रंगाची छोटी छोटी पाने येवू लागली .            हळूहळू ते झाड आता त्याच्या डौलदार रूपाने सगळ्यांची  नजर स्वतः कडे वळवून घेऊ लागलं. झाड आता कुंपणातल्या ...