Jatan Karu Ya Sanskrutichya Paul Khuna
जतन करू या संस्कृतीच्या पाउल खुणा
वाई म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव. अगदी वाहवा ! काय हि ईश्वरी लीला ! अस म्हणावं इतकं छान. हे गाव दोन गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहे. एक म्हणजे निसर्ग सौंदर्य व दुसर म्हणजे तिथली प्राचीन देवालय .
इथे आल्यावर अंतर्बाह्य सौंदर्याचा अनुभव आल्यासारखं वाटत. मनात विचार येतो, बाहेरील नैसर्गिक सौंदर्याचा प्रभाव मंदिरातील वातावरणावर, भाविकतेवर पडला आहे कि मंदिरातील पवित्रतेचा , शांततेचा प्रभाव इथल्या निसर्गावर पडला आहे. हिरवेगार , निळशार यांसारखे शब्द आपण इथे अनभवू शकतो .
प्रमाणबद्धता, सुबकता, रेखीवता हे शब्द देखील मंदिराच्या, शिल्पाकृतीच्या कडे निरखून पाहताना अनुभवायला येतात. इतकी येथील मंदिरे सुंदर, रेखीव आहेत. पण खटकणारी गोष्ट मात्र अशी आहे की या मंदिराची तेथील शिल्पकृतींची देखभाल , जपणूक हवी तशी केली जात नाही.
खरतर मंदिर म्हंटल की आपल्याकडे त्याबाबत वेगळ्या नजरेने पहिले जाते. त्यात धार्मिकता व भावनिकता जोडली जाते. असे असतानाही ह्या मंदिरांची काही शिल्पे हि तुटलेली, भग्नावस्थेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे पाहून फार वाईट वाटते. मन उदास होते.
माणूस जात्याच सौंदर्याचा पूजक आहे. नाही तर हि इतकी सुंदर शिल्पे, विविध रूपे त्याने कशी साकारली असती ? आणि कशासाठी साकारली असती ? मग हा विचार त्याचं जतन करताना जातो कुठे ? जी शिल्पे किंवा कलाकृती तुम्ही निर्माण करता, त्यांना देवत्वाचे रूप देता ती शिल्पे अथवा कलाकृती चांगल्या रीतीने जतन करणे, वेळोवेळी त्यांची डागडुजी करणे, हे हि एक धार्मिक म्हणा व सामाजिक कर्तव्य नाही का ?
काही शिल्पांचे अवयव मधेच तुटलेले आहेत . काही शिल्पाकृती मध्येच अस्पष्ट झाल्या आहेत. पावसाचे पाणी हवा , उन ई . मुळे त्यावर शेवाळे साचले आहे. काहीचे टवके उडालेले आहेत. हे सारे पाहून वाईट वाटते. मन खंतावते वाटते कि , परमेश्वराचे अस्तित्व हे फ़क़्त गाभाऱ्यातल्या मूर्ती पुरतेच मर्यादित आहे कि काय ? इतरत्र कोठेच नाही का ?
कोणत्याही ठिकाणाची शिल्पकला / वास्तूकला असो हि त्या स्थानाची संस्कृती , मुल्ये सांगत असते . त्या काळातील कल्पना , चालीरीती, भावनिकता , धार्मिकता असल्याच्या त्या खुणा आहेत. तो भक्कम पुरावा आहे. हेच जर नष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर आपण कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाणार आहोत ? कुठला वैभवशाली इतिहास मिरवणार आहोत ?
हि शिल्पकला म्हणजे भाषे शिवाय हि स्वकीय आणि परकीय यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारे, महत्त्व सांगणारी 'कालातीत स्मृतीचिन्हे' आहेत. ह्याबाबत आपणा सर्वांमध्ये खरोखरच जागृती निर्माण होण्याची गरज आहे . आपला इतिहास , प्राचीन वैभव जपणे हे आपले कर्तव्य असून आपण सक्रिय सहभाग दर्शवला पाहिजे. यावर उपाय शोधला पाहिजे. कारण आपण नसू तेव्हा आपल्या भावी पिढीला हीच शिल्पे, मंदिरे, वस्तू आपला इतिहास, संस्कृती , परंपरा सांगणार आहेत. आजतागायत वर्षानुवर्षे हे काम ते करत आहेत. मग त्यांच्या साठी निदान एव्हढे तरी कारायला नको का ?

Comments
Post a Comment