Selfi
एक सेल्फी हवाच , पण 'ति'च्या साठी ! सध्या सगळीकडे आपण पाहतो कि स्मार्टफोन मुळे सेल्फी काढण्याच प्रमाण वाढलय. अगदी त्याच फ्याड आलाय अस म्हणल तरी चालेल. पण ह्या साऱ्या मध्ये सामजिक जाणिवेपासून आपण थोडे दूर चालले आहोत. केवळ मी आणि माझ कुटुंब अशा मनोप्रवृत्ती मधून समाजात घडणाऱ्या अपप्रवृत्ती कडे डोळेझाक केली जात आहे. आणि ह्याच उदाहरण म्हणजे निर्भया बलात्कार प्रकरण. सबंध भारत भर ह्या घटनेचे पडसाद उमटले तरी देखील नंतर अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आणि घडत आहेत हि खरोखरच शरमेची बाब आहे. ह्या साऱ्याचा विचार करता केवळ कायदे आणि पोलिस यंत्रणा सक्षम करून फार काही बदल घडणार नाही. जर स्त्रियांची सुरक्षितता हा प्रश्न अजूनही बिकट होत असेल तर मात्र आता वेळ आली आहे ती समाजाच्या मानसिकतेत बदल घडण्याची, वैचारिक क्रांतीची. सार काही सरकारवर विसंबून राहण्याची वृत्ती बदलायला हवी आहे. आणि आनंदाची गोष्ट हि, कि आपल्या युवा पिढीला याची जाणीव होऊन त्यांनी त्यांच्या परीने पाऊले उचलली आहेत. गरज आहे ती आपल्या प्रतिसादाची. पुण्यात...