Posts

Showing posts from January, 2017
जगण्याचे  पुस्तक   काही रंगीत,  काही कृष्ण धवल, काही सुका सुगंध जपलेली , काही सुंदर लेखन असलेली , काही शाईचे डाग असलेली , काही गिचमिड्या हस्ताक्षराने भरलेली , काही लाल रंगातल्या शेऱ्यानी भरलेली , तर काही पैकीच्या पैकी मार्क देणारी , पाने सहज चाळून पहिली असता  जीवनपट उलगडू लागतात ! अन पाहतापाहता डोळ्यांमधूनी  आठवणींच्या तिजोरीतले  अनमोल हिरे चमकू लागतात ! तरी देखील  जगण्याच्या पुस्तकातील  काही पाने कोरीच राहतात  अनुभवाच्या अमर्यादतेची  अन मनाच्या कोऱ्या पाटीची  सखोल जाणीव करून देतात 
कुपी  तसा तुझा माझा सहवास थोडाच  तरीही तुझं मिस्कील हसणं  तुझं निश्चयानं बोलणं  तुझं हळुवार बघणं  समजावून सांगणं  तुझं रुसणं रागावणं  सर कसं  एखाद्या सुगंधी स्मृतीच्या  कुपीत जपून ठेवल्यासारखं  मनाला ओढ लावणारं  हुरहूर लावणारं  परवा अगदी अनवधानानं  ती कुपी  उघडली गेली आणि त्यातून  असंख्य सुगंधी आठवणी दरवळल्या  तू थट्टा करणार  माझ्या हहळवेपणची प्रेमाची !  पण मी प्रेमवेडी राधा होऊन ती  कुपी जपली म्हणून तर आज केवळ  माझ्यासाठीच नव्हे तर तुलाही  पूर्वीच अस्तित्व सापडण्यासाठी  उपयोगी पडली  तेव्हाचे तुझे बोल  अजून माझ्या मनात रेंगाळतात  पप्रत्येक आठवणी जपशील  तर त्याच निर्माल्य होईल  तेव्हा मी म्हटलं  झाड जसं  प्रत्येक फुलाचं  उमलण , फुलणं , गळणं  बघतं  बाहेर येताच पुन्हा नव्याने बहरतं  तसच  तुझ्या माझ्या आठवणीचं नातं  सहवासाचा सुगंध दरवाळताच मनाला उभारी देणारं...
ताळमेळ  बरचसे रंगीबेरंगी तुकडे तुझ्या माझ्या भोवती पडलेले वाऱ्याच्या हलक्याश्या झोताशी झगडणारे आपल्या सहजीवनाचे अनेक रंग ल्यायलेले या तुकड्या तुकड्यांपासून एक चित्र तयार करण्याचा माझा प्रयत्न गेले काही वर्षांपासूनचा ते चित्र अपूर्ण राहिलेले कदाचित तुझ्या मधल्या अहं चा स्वीकार केलेले त्यातले रंग हि फिके पडलेले हं ! ते कपटे !!! रंग विटलेले, कोपरे दुमडलेले आणि धुळीचा हलकासा थर असणारे हे तुकडे मी आजही जपून ठेवलेत अगदी तेवढ्याच ओढीने मात्र तुला त्याचे काहीच नाही "काय हा कचरा ?" ही  एक तुझी प्रतिक्रिया माझ्या मनाला बोचणारी पण......... तुझ्या दृष्टीने योग्यच परवा मधूनच विचारलंस , "काय करतेस ग हे तुकडे जपून ?" मी म्हटलं " ताळमेळ " "कसला ?" प्रश्नाचं उत्तर माहित असताना ते माझ्याकडून  वदवण्याचा यशस्वी प्रयत्न धुळीने भरलेले कपटे आहेत सांगायला की , "पुलाखालून बरच पाणी वाहून गेलंय मनामधल्या संवेदनशीलतेवर निबरपणाचं पुटं चढलंय  " दुमडलेल्या कपटाचं म्हणशील तर ते सांगतायत " वेळोवेळी मनाला घातली गेलेली मुरड , संसार...
प्रियन काल खूप दिवसांनी  भेटलास   पुस्तकात जपून  ठेवलेल्या गुलाबाच्या  पाकळीतुन  आणि  इतक्या दिवसांच्या  विरहाची जाणीव पुन्हा दरवळू लागली मंदधुंद गंधातून    मनाच्या गाभाऱ्यात  दडपलेल्या स्मृतींचं   बीज तरारलं आणि  पाहता पाहता  त्याने मला पूर्णतः लपेटलं त्या गुंत्यातून स्वतःला सोडवता सोडवता मी कधी झाड होऊन गेले तुझ्या स्मृतींचं ते कळलंच नाही बहरलेल्या झाडाला इतकंच कळलं की तुझ्या शिवाय पूर्वीसारखा वसंत आता एकट्याने फुलत नाही