जगण्याचे  पुस्तक 
 काही रंगीत, 
काही कृष्ण धवल,
काही सुका सुगंध जपलेली ,
काही सुंदर लेखन असलेली ,
काही शाईचे डाग असलेली ,
काही गिचमिड्या हस्ताक्षराने भरलेली ,
काही लाल रंगातल्या शेऱ्यानी भरलेली ,
तर काही पैकीच्या पैकी मार्क देणारी ,
पाने सहज चाळून पहिली असता 
जीवनपट उलगडू लागतात !
अन पाहतापाहता डोळ्यांमधूनी 
आठवणींच्या तिजोरीतले 
अनमोल हिरे चमकू लागतात !
तरी देखील 
जगण्याच्या पुस्तकातील 
काही पाने कोरीच राहतात 
अनुभवाच्या अमर्यादतेची 
अन मनाच्या कोऱ्या पाटीची 
सखोल जाणीव करून देतात 

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज