ताळमेळ
बरचसे रंगीबेरंगी तुकडे
तुझ्या माझ्या भोवती पडलेले
वाऱ्याच्या हलक्याश्या
झोताशी झगडणारे
आपल्या सहजीवनाचे
अनेक रंग ल्यायलेले
या तुकड्या तुकड्यांपासून
एक चित्र तयार करण्याचा
माझा प्रयत्न गेले काही वर्षांपासूनचा
ते चित्र अपूर्ण राहिलेले
कदाचित तुझ्या मधल्या
अहं चा स्वीकार केलेले
त्यातले रंग हि फिके पडलेले
हं ! ते कपटे !!!
रंग विटलेले, कोपरे दुमडलेले
आणि धुळीचा हलकासा थर असणारे
हे तुकडे मी आजही जपून ठेवलेत
अगदी तेवढ्याच ओढीने
मात्र तुला त्याचे काहीच नाही
"काय हा कचरा ?" ही एक तुझी प्रतिक्रिया
माझ्या मनाला बोचणारी पण.........
तुझ्या दृष्टीने योग्यच
परवा मधूनच विचारलंस ,
"काय करतेस ग हे तुकडे जपून ?"
मी म्हटलं " ताळमेळ "
"कसला ?" प्रश्नाचं उत्तर माहित असताना
ते माझ्याकडून वदवण्याचा यशस्वी प्रयत्न
धुळीने भरलेले कपटे आहेत सांगायला की ,
"पुलाखालून बरच पाणी वाहून गेलंय
मनामधल्या संवेदनशीलतेवर
निबरपणाचं पुटं चढलंय "
दुमडलेल्या कपटाचं म्हणशील तर
ते सांगतायत " वेळोवेळी मनाला घातली गेलेली मुरड ,
संसारासाठी केलेली तडजोड , दोन टोकं दोन बाजूला
राहू नयेत म्हणून ती मिळवण्याचा केलेला प्रयत्न "
आणि आता रंग विटलेल्या तुकड्यांचं म्हणशील तर
" आधीचे रंग पक्के होते , गहिरेपणाने ,
दृढ विश्वासाने भरले होते
यांची जाणीव होते ".
बरचसे रंगीबेरंगी तुकडे
तुझ्या माझ्या भोवती पडलेले
वाऱ्याच्या हलक्याश्या
झोताशी झगडणारे
आपल्या सहजीवनाचे
अनेक रंग ल्यायलेले
या तुकड्या तुकड्यांपासून
एक चित्र तयार करण्याचा
माझा प्रयत्न गेले काही वर्षांपासूनचा
ते चित्र अपूर्ण राहिलेले
कदाचित तुझ्या मधल्या
अहं चा स्वीकार केलेले
त्यातले रंग हि फिके पडलेले
हं ! ते कपटे !!!
रंग विटलेले, कोपरे दुमडलेले
आणि धुळीचा हलकासा थर असणारे
हे तुकडे मी आजही जपून ठेवलेत
अगदी तेवढ्याच ओढीने
मात्र तुला त्याचे काहीच नाही
"काय हा कचरा ?" ही एक तुझी प्रतिक्रिया
माझ्या मनाला बोचणारी पण.........
तुझ्या दृष्टीने योग्यच
परवा मधूनच विचारलंस ,
"काय करतेस ग हे तुकडे जपून ?"
मी म्हटलं " ताळमेळ "
"कसला ?" प्रश्नाचं उत्तर माहित असताना
ते माझ्याकडून वदवण्याचा यशस्वी प्रयत्न
धुळीने भरलेले कपटे आहेत सांगायला की ,
"पुलाखालून बरच पाणी वाहून गेलंय
मनामधल्या संवेदनशीलतेवर
निबरपणाचं पुटं चढलंय "
दुमडलेल्या कपटाचं म्हणशील तर
ते सांगतायत " वेळोवेळी मनाला घातली गेलेली मुरड ,
संसारासाठी केलेली तडजोड , दोन टोकं दोन बाजूला
राहू नयेत म्हणून ती मिळवण्याचा केलेला प्रयत्न "
आणि आता रंग विटलेल्या तुकड्यांचं म्हणशील तर
" आधीचे रंग पक्के होते , गहिरेपणाने ,
दृढ विश्वासाने भरले होते
यांची जाणीव होते ".
Comments
Post a Comment