प्रियन
काल खूप दिवसांनी 
भेटलास  
पुस्तकात जपून 
ठेवलेल्या गुलाबाच्या 
पाकळीतुन 
आणि 
इतक्या दिवसांच्या 
विरहाची जाणीव
पुन्हा दरवळू लागली
मंदधुंद गंधातून   

मनाच्या गाभाऱ्यात 
दडपलेल्या स्मृतींचं  
बीज तरारलं आणि 
पाहता पाहता 
त्याने मला
पूर्णतः लपेटलं

त्या गुंत्यातून
स्वतःला सोडवता सोडवता
मी कधी झाड
होऊन गेले
तुझ्या स्मृतींचं
ते कळलंच नाही

बहरलेल्या झाडाला
इतकंच कळलं की
तुझ्या शिवाय
पूर्वीसारखा
वसंत आता
एकट्याने
फुलत नाही







Comments

Popular posts from this blog

बाग - कथुली

तारेवरच्या कसरती

मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक