Panch Pakwanna chi mejavani

पंचपक्वान्नाची  मेजवानी 
एखाद्या खादाड माणसाला जर पंचपक्व्वाने दिली तर काय होईल ? त्याला काय आणि किती खाऊ  असे वाटेल. तसेच गेले दोन दिवस २८ व  २९ फेब्रुवारी २०१६ ला  पुण्यातील साहित्य प्रेमीना झाले असेल.  महाराष्ट्र टाईम्स ने जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने साहित्य रसिकांना पंचपक्वान्नाची मेजवानी दिली.  अनुवाद लेखन, कथा लेखन,  नाटक , चित्रपट-पट- कथा लेखन या कार्यशाळा तसेच कवी कट्टा, कवितेच गाणं होताना, ऐतिहासिक लेखनाला मागणी कशाने, लय पश्चिमा,  राजकीय कविता, चर्चा सत्र  या सारखे सुंदर कार्यक्रम सादर केले.  खरोखरच अशा प्रकारे मराठी दिन साजरा करणे हे प्रशंसनीय आहे. नुसते मराठी बोला, मराठी वाचा अस म्हणून काही होत नाही त्यासाठी मराठी वर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र करून त्यांच्यात संवाद घडवणे हे मोठे काम मटा करत आहे, आणि ते हि कोणताही प्रकारचे शुल्क न आकारता.      

Comments