Surel Maitri 3
सुरेल मैत्री ३
जसा तो मुलगा त्याच्या आईला हाक मारत आला तेव्हा मला नर्स ने बोलावलं. बाबा शुद्धीत आल्याच सांगितलं त्यामुळे अगदी अत्यानंदाने मी पळतपळतच आयसीयूकडे गेले. बाबा शुद्धी वर आले होते आणि मुख्य म्हणजे त्यांनी मला ओळखल होत. आम्ही दोघे बोललो आणि त्यांना काहीतरी खायला द्या असे डॉक्टर ने मला सांगितले. तेव्हा घाईघाईने मी आईला तसं सांगून काहीतरी आणायला गेले. खायला घेऊन आल्यावर बाबांना ते दिले त्यांनी खाल्ल्यावर आम्हाला खूपच बरे वाटले. बाबांच्या जिवावरचा धोका टळला होता. ते आता लवकर बरे होणार होते. त्यामुळे आम्हालाही आनंद झाला होता. ते सांगण्यासाठी मी बाहेर येउन त्या काकूंना शोधत होते पण त्या काही दिसल्या नाहीत. मग मी म्हटलं इथे थोड्यावेळ बसुयात.
पाच दहा मिनट झाली असतील त्या काकू बोलत बोलत बाहेर आल्या त्या वेळी त्यांच्या सोबत तो मुलगा दिसला. पण तो हाच होता का आणखी कोणी हे काही कळेना कारण त्यांना भेटायला बरेच जण येत होते. मी समोर उभी पाहून त्या मला म्हंटल्या, " हा माझा मुलगा संदीप." आम्ही दोघांनी तेव्हा पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं. मला त्याच्या बद्दल जरा पूर्व कल्पना होती पण त्याला आमच्या बद्दल काहीच कल्पना नसल्याने त्याच्या चेहऱ्यावर जरा प्रश्नचिन्ह दिसले. मग काकूंनी त्याला थोडक्यात सांगितले.
तेवढ्या वेळात माझे निरीक्षण चालू होते. सावळा, शिडशिडीत बांधा, गोलसर हसरा चेहरा, डोळे स्वप्नाळू, थोडासा हळवा आणि बोलका असा मला तो वाटला. त्याला भरपूर सूचना सांगून त्याची आई लगबगीने कुठे तरी गेली. आता आम्ही दोघे समोरासमोर उभे होतो, आम्ही फ़क़्त हसलो आणि काय बोलाव ते आम्हाला कळेना. मी म्हंटल, " काकू खूपच धावपळ करतात, त्या फार टेन्शन मध्ये दिसत आहेत." त्यावर तो म्हणाला, "हो अजून पपांची रिकव्हरी हवी तशी होत नाहीये त्यामुळे असेल." त्याचा चेहरा थोडा मलूल झाला. मलाही वाईट वाटल मग विषय बदलण्यासाठी मी म्हंटल , " काल तूच गात होतास का रात्री ? " हा विषय निघाल्यावर मात्र तो थोडा खुलला, " हो ते मी माझ्या भावाला गाण समजावून सांगत होतो." छान गातोस तू ! गाण शिकतोस का ? " असे म्हंटल्यावर तो हो म्हणाला. मग त्याने माझ्या बद्दल विचारलं आम्ही इथे कसे आलो , तुझ्या बरोबर आई आणि कोण आहे वैगरे .
दिवसरात्र हॉस्पिटल मध्ये बाहेर बाकड्यावर नुसते बसून राहणे काय असते हे त्या वेळी मला कळले. कारण या अचानक धक्क्याने आई अगदी खचलीच होती. ती जास्त काही बोलायची नाही. मला तिलाही सांभाळणे आणि इतरही व्यवस्था करणे यात खूप दमायला व्हायचे. या आधी हॉस्पिटल मध्ये मी स्वतः इतक्या वेळ बसण्याचा प्रसंग आला नव्हता. एखाद्या माणसाला भेटायला जाणे वेगळे आणि स्वतःच्या माणसासाठी बसणे वेगळे. आजूबाजूला सगळीकडे तणावाच वातावरण. अश्यावेळी पेशंटला सावरणे आणि स्वताला सावरणे या गोष्टींचा मेळ जमणे अवघड वाटते . या अवघड वातावरणात आजूबाजूचा कुठलाही पेशंट सिरियस झाला कि मनात लगेच निराशेचे विचार यायचे. मग मी सरळ उठून काकूंकडे जायचे त्या सतत स्वामींची पोथी वाचत असायच्या . तिकडे गेल्यावर मला त्यांच्याकडे पाहून धीर यायचा. मग त्या मुद्दाम वेगवेगळे विषय काढून बोलायच्या. कधी कधी संदीपच्या गोष्टी सांगायच्या. त्याला वाटायचं आईने आराम करावा आणि आईला वाटायचं संदीप ने आराम करावा. असे सगळ्यांचे एकेमेकांना धीर देत दिवस चालले होते.

Comments
Post a Comment