Surel maitri 2

सुरेल मैत्री २       

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तर बाबा शुद्धीवर आलेच नव्हते,  त्यामुळे मी फार काळजीत  होते. आई सुद्धा उठून बसली होती मी घाई घाईने आयसीयू मध्ये गेले डॉक्टरांशी बोलले. ते म्हणाले अजून  काही तास तरी सांगता येत नाही. काय करावे कळेच ना ! बाहेर येउन आई शेजारी बसले तर ती जरा  फ्रेश वाटत होती. मी तिला म्हणाले, 'काय ग तुला चहा आणून देऊ का ? अजून बाबा शुद्धीवर आले नाहीत.' ती म्हणाली, 'माझा चहा झाला मी केव्हाच उठले. मला त्या गृहस्थांनी चहा आणून दिला. ते माझ्याशी बोलले तुम्ही काही काळजी करू नका, त्यांनी आपली विचारपूस केली ते पण स्वामीभक्त आहेत. हे बघ त्यांनी मला हे पुस्तक वाचायला दिले. आणि वर म्हणाले काही काळजी करू नका काही पैसे लागले तर मी देईन. अहो अशा वेळीच खरी माणुसकी दाखवायची असते.' हे ऐकून मला खूपच बर वाटल आणि आधार वाटला. 
          मग मी आईला विचारलं, 'काल आपण झोपल्यानंतर कोणी आल होत का ? आणि ते कुठे झोपले असतील आता ? ते  काका काही तुला बोलले  का ?  आई म्हणाली,  'अग आपण ज्यांच्या जागेवर झोपलो होतो न ते त्या काकांचे भाचे होते. काल जो मुलगा गाण म्हणत होता ना, आपण बोलत होतो त्याच्या विषयी तो त्यांचाच भाचा आहे, तो गातो. आता चालू असलेल्या सारेगामा मध्ये त्याने भाग घेतला आहे. त्याचे वडील खूप सिरियस आहेत.'  मला ते ऐकून खूप वाईट वाटल. मग मी आईला विचारलं, ' कुठे आहेत तो मुलगा ? ' आईने बोट दाखवलं तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन तो गाढ झोपला होता. आजुबाजुला इतकी गडबड होती तरीही शांत झोपला होता. मग माझ्यासाठी मी चहा घेऊन आले आणि आत जाऊन कालच्या जागेवर जाऊन बसले इतक्यात त्या मुलाची आई आली आणि त्याला हाक मारून  उठवू लागली . 'अरे संदीप ! उठ सकाळ झाली पपानां भेटून ये नाश्ता कर,  मामा चाललेत बाहेर.  अरे उठ रे !' आणि मला वाटल आता हा मुलगा उठेल आणि आपल्याला त्याला पाहता येईल. पण कसल काय ती आई बिचारी दमली तरी हा पट्ट्या उठायला तयार नाही. अस पाच दहा मिनिटे चालू होत मग मी चहा पिउन माझ आवरायला गेले.
          दुपारी परत आल्यावर मी त्या बाकड्यावर गेले आणि बसले थोड्यावेळाने माझी आई हि आली. आणि आम्ही दोघी डॉक्टरांची वाट पाहू लागलो. एवढ्यात त्या मुलाची आई आली आणि माझ्या  आईशी बोलू लागली.  'काय म्हणता तुम्ही  जेवलात का ? हि कोण?' अर्थात माझ्याकडे बघून त्यांनी विचारलं , 'मी हसून म्हणाल काकू मी तृप्ती  ह्यांची मुलगी. " त्याही हसल्या अस होय म्हणाल्या, काळजी करू नकोस,  बर वाटेल तुझ्या वडिलांना.  मला केवळ ते ऐकूनच बर वाटल. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही जेवलात का ? त्याही होय म्हणाल्या. मग जर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तुम्ही कधी आला आणि आम्ही कधी या हॉस्पिटल मध्ये आलो अस सगळा पूर्वेतिहास एकेमकांना सांगून झाला. आणि एवढ्यात आई आई अशा हाक मारत तो लांबून पळत येताना दिसला.  
 

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज