प्रियन !!!! कधी आणि कसे बंध तयार झाले आपल्यात ना हे तुला ठाऊक ना मला आठवणी तरी किती आणि कशा कशाच्या जपाव्यात मनाने ना तुझ्या हातात ना माझ्या कधी पारिजातकाच्या कधी चाफ्याच्या तर कधी सोनपिवळ्या उन्हाच्या रूपाने येतोस आणि सावरलेल्या माझ्या अंगणात पुन्हा ऐसपैस पसरतोस तुझं हे असं पसरणं ना मला आत सुखाने राहू देतं ना तुला ओलांडून बाहेर जाऊ देत
Posts
Showing posts from July, 2016
- Get link
- X
- Other Apps
प्रियन ! हे भिरभिरणारे केस आवरण्याचा ; किंवा तो गंधाळलेला हात लपवण्याचा प्रयत्न करायचा नाही , असं ठरवलंय मी आताशा ; जो जो विसरण्याचा प्रयत्न करते तो नकळत तुला आठवण्याचाच बहाणा होतोय , हे कळलंय मला मग म्हंटल जाऊ दे स्मृती-विस्मृतीच्या या खेळात ना तू सुखी ना मी सुखी आताशा दुःखाच्या धाग्यातलं हे समत्व ही छळतय मला
- Get link
- X
- Other Apps
प्रियन ! किती छळशील रे ? प्राजक्ताने गंधाळलेला तो हात रात्रभर उशाशी ठेवून मी झोपले घडले ते सारे स्वप्नच होते हे मनाला पटवण्यासाठी वाटलं पहाट होताच विरून जाईल तो गंध आणि ते स्वप्न ही वास्तवाच्या स्पर्शाने पण घडले काही भलतेच हाताचा गंध जरी लपला गेला तरी तू छळु लागलास मला भिरभिरणाऱ्या बटांतून आता त्यांना बांधायला जावं तरी पुन्हा हात सुगंधित होण्याचीच शक्यता अन मोकळेच राहू द्याव्यात तर आज दिवसभर वाऱ्याने मलाच कवेत घेण्याची शक्यता !!!
- Get link
- X
- Other Apps
पाऊस कधी काळ्याकुट्ट ढगातून कडकडाट करत बरसणारा, कधी श्रावणातल्या सोनं पिवळ्या उन्हातून हळुवार बरसणारा, कधी इंद्रधनू ची बरसात करणारा, कधी दरीतून झरा बनून वाहणारा, कधी कौलातून चंद्रमौळी झोपडीत बरसणारा, कधी दवबिंदूंतून वसुंधरेला सौंदर्य देणारा, कधी चातकाची तहान शमवणारा, कधी बळीराजाचं स्वप्न पेरणारा, कधी आतल्या पावसाला आळवणारा, कधी बाहेरच्या पावसाची ओल आत झिरपवणारा, कधी आठवणींच्या कळ्या उमलावणारा, कधी उमलल्या कळ्यांना सुगंध देणारा, कधी शिंपल्यातून मोती निर्माण करणारा, सृजनशील, समृद्धीचं प्रतीक आहेस तू, किती किती रूपात गवसतोस तू ??? बरसतोस तेव्हा रुक्ष कोऱ्या पाटीवरची कवितेची ओळ बनतोस तू !!!!
- Get link
- X
- Other Apps
प्रियन , असा कसा आहेस रे तू ?? शेजारच्या अंगणातल्या पारिजाताका सारखा, जिथे मूळ आहेत तिथे तर दरवळतोस पण शेजारच्या अंगणाशीही किती लगटतोस ? मला तुझं हे वागणं मुळीच पटत नाही प्रियन ! चाकोरीतलं आखीव रेखीव जगणं मान्य असताना, तुझं हे आगंतूका सारखं माझ्या अंगणात मध्येच डोकावणं आणि आपल्या मनमोहक सुगंधाने मनात घर करून राहणं मला नाही सोसत आता तुला काही कल्पना नाही रे माझ्या सीमित जगण्याची संस्कारात बांधलेल्या मनाची किती घालमेल करतोस तू? सगळं बंधन झुगारून तुला हातात घ्यावं मनसोक्त सुगंध अनुभवावा तर एक भीती त्याची सवय झाली तर ? एक क्षण मोहून मी तुला स्पर्श केला आणि लगेच विरक्तीन देवाच्या चरणी वाहील वाटलं चला बरं झालं ज्याचं देणं त्याला दिलं रिकामे हात घेऊन परत येताना मन काहीस हुरहुरलं खरं आपसूकच हात जवळ आला तो काय ? क्षणभराच्या सहवासानेही माझी ओंजळ सुगंधाने भरलेली प्रियन ! आता हा सुगंधी हात लपवावा तरी कुठे ????