प्रियन !

हे भिरभिरणारे केस
आवरण्याचा ;
किंवा
तो गंधाळलेला हात
लपवण्याचा
प्रयत्न करायचा नाही ,
असं ठरवलंय
मी आताशा ;

जो जो विसरण्याचा
प्रयत्न करते
तो नकळत तुला
आठवण्याचाच
बहाणा होतोय ,
हे कळलंय मला

मग म्हंटल
जाऊ दे
स्मृती-विस्मृतीच्या
या खेळात
ना  तू सुखी
ना मी सुखी
आताशा
दुःखाच्या
धाग्यातलं
हे समत्व ही
छळतय  मला 


Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज