प्रियन !
किती छळशील  रे ?
प्राजक्ताने गंधाळलेला  तो
हात रात्रभर उशाशी ठेवून
मी झोपले
घडले ते सारे स्वप्नच होते
हे मनाला पटवण्यासाठी
वाटलं पहाट होताच
विरून जाईल  तो गंध
आणि ते स्वप्न ही
वास्तवाच्या स्पर्शाने
पण घडले काही
भलतेच
हाताचा गंध जरी लपला गेला
तरी तू छळु लागलास
मला भिरभिरणाऱ्या
बटांतून
आता त्यांना
बांधायला जावं
तरी पुन्हा हात
सुगंधित  होण्याचीच
शक्यता  अन
मोकळेच राहू द्याव्यात
तर आज दिवसभर
वाऱ्याने मलाच
कवेत घेण्याची शक्यता !!!


Comments

Popular posts from this blog

बाग - कथुली

तारेवरच्या कसरती

मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक