प्रियन !!!!

कधी आणि कसे
बंध तयार झाले
आपल्यात
ना हे तुला ठाऊक
ना मला

आठवणी तरी
किती आणि
कशा कशाच्या
जपाव्यात
मनाने
ना तुझ्या हातात
ना माझ्या

कधी पारिजातकाच्या
कधी चाफ्याच्या
तर कधी
सोनपिवळ्या
उन्हाच्या
रूपाने येतोस

आणि
सावरलेल्या
माझ्या अंगणात
पुन्हा
ऐसपैस पसरतोस

तुझं हे असं पसरणं
ना मला
आत सुखाने राहू देतं
ना तुला
ओलांडून बाहेर जाऊ देत



























Comments

Popular posts from this blog

बाग - कथुली

तारेवरच्या कसरती

मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक