पाऊस


कधी काळ्याकुट्ट ढगातून
कडकडाट करत बरसणारा,
कधी श्रावणातल्या सोनं पिवळ्या
उन्हातून हळुवार बरसणारा,
कधी इंद्रधनू ची बरसात करणारा,
कधी दरीतून झरा बनून वाहणारा,
कधी कौलातून चंद्रमौळी झोपडीत बरसणारा,
कधी दवबिंदूंतून वसुंधरेला सौंदर्य देणारा,
कधी चातकाची तहान शमवणारा,
कधी बळीराजाचं स्वप्न पेरणारा,

कधी आतल्या पावसाला आळवणारा,
कधी बाहेरच्या पावसाची ओल आत झिरपवणारा,
कधी आठवणींच्या कळ्या उमलावणारा,
कधी उमलल्या कळ्यांना सुगंध देणारा,
कधी शिंपल्यातून मोती निर्माण करणारा,
सृजनशील,  समृद्धीचं प्रतीक आहेस तू,
किती किती रूपात गवसतोस तू ???
बरसतोस तेव्हा रुक्ष कोऱ्या पाटीवरची
कवितेची ओळ बनतोस तू  !!!!


Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज