We can talk election , we can walk election , we can laugh el ection कारण निवडणूक आणि जाहिरात यांचं अतूट नातं आहे सगळं कसं शांत निवांत वाटतंय. गेले काही दिवस निवडणुकीच्या वातावरणाची जी धामधूम चालली होती ती आता एकदम बंद झाली. बहुमताने अपेक्षित सरकार निवडून आलं. रणरणत्या उन्हात, नावनोंदणीचे, मतदान केंद्राचे अनेक गोंधळ झाले असूनही ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांना आपलं मत वाया गेलं नाही याचा आनंद झाला असेल. खरोखरच आपल्याकडच्या निवडणुका हा जसा चर्चेचा (गंभीर) विषय आहे तसाच तो करमणुकीचा विषयही झाला आहे. गल्लीतल्या मुलापासून दिल्लीतल्या साहेबापर्यंत सगळे कसे आळस झटकून कामाला लागतात. आता तर काय इलेक्ट्रिक मीडियामुळे फेसबुक, ट्विटर, ई-मेल, व्हाट्सअप या सगळ्यावर जोरदार प्रचार चालू होता. सिनेमातल्या वेगवेगळ्या गाण्यांच्या चालीवर प्रचार करण्याची जी कल्पना होती ती निव्वळ मनोरंजनात्मक होती. सोशल मीडियावरच्या विनोदात देखील निवडणूका अग्रभागी होत्या. याबाबतीत आपण असं म्हणू शकतो,...
Posts
Showing posts from 2017
- Get link
- X
- Other Apps
जगण्याचे पुस्तक काही रंगीत, काही कृष्ण धवल, काही सुका सुगंध जपलेली , काही सुंदर लेखन असलेली , काही शाईचे डाग असलेली , काही गिचमिड्या हस्ताक्षराने भरलेली , काही लाल रंगातल्या शेऱ्यानी भरलेली , तर काही पैकीच्या पैकी मार्क देणारी , पाने सहज चाळून पहिली असता जीवनपट उलगडू लागतात ! अन पाहतापाहता डोळ्यांमधूनी आठवणींच्या तिजोरीतले अनमोल हिरे चमकू लागतात ! तरी देखील जगण्याच्या पुस्तकातील काही पाने कोरीच राहतात अनुभवाच्या अमर्यादतेची अन मनाच्या कोऱ्या पाटीची सखोल जाणीव करून देतात
- Get link
- X
- Other Apps
कुपी तसा तुझा माझा सहवास थोडाच तरीही तुझं मिस्कील हसणं तुझं निश्चयानं बोलणं तुझं हळुवार बघणं समजावून सांगणं तुझं रुसणं रागावणं सर कसं एखाद्या सुगंधी स्मृतीच्या कुपीत जपून ठेवल्यासारखं मनाला ओढ लावणारं हुरहूर लावणारं परवा अगदी अनवधानानं ती कुपी उघडली गेली आणि त्यातून असंख्य सुगंधी आठवणी दरवळल्या तू थट्टा करणार माझ्या हहळवेपणची प्रेमाची ! पण मी प्रेमवेडी राधा होऊन ती कुपी जपली म्हणून तर आज केवळ माझ्यासाठीच नव्हे तर तुलाही पूर्वीच अस्तित्व सापडण्यासाठी उपयोगी पडली तेव्हाचे तुझे बोल अजून माझ्या मनात रेंगाळतात पप्रत्येक आठवणी जपशील तर त्याच निर्माल्य होईल तेव्हा मी म्हटलं झाड जसं प्रत्येक फुलाचं उमलण , फुलणं , गळणं बघतं बाहेर येताच पुन्हा नव्याने बहरतं तसच तुझ्या माझ्या आठवणीचं नातं सहवासाचा सुगंध दरवाळताच मनाला उभारी देणारं...
- Get link
- X
- Other Apps
ताळमेळ बरचसे रंगीबेरंगी तुकडे तुझ्या माझ्या भोवती पडलेले वाऱ्याच्या हलक्याश्या झोताशी झगडणारे आपल्या सहजीवनाचे अनेक रंग ल्यायलेले या तुकड्या तुकड्यांपासून एक चित्र तयार करण्याचा माझा प्रयत्न गेले काही वर्षांपासूनचा ते चित्र अपूर्ण राहिलेले कदाचित तुझ्या मधल्या अहं चा स्वीकार केलेले त्यातले रंग हि फिके पडलेले हं ! ते कपटे !!! रंग विटलेले, कोपरे दुमडलेले आणि धुळीचा हलकासा थर असणारे हे तुकडे मी आजही जपून ठेवलेत अगदी तेवढ्याच ओढीने मात्र तुला त्याचे काहीच नाही "काय हा कचरा ?" ही एक तुझी प्रतिक्रिया माझ्या मनाला बोचणारी पण......... तुझ्या दृष्टीने योग्यच परवा मधूनच विचारलंस , "काय करतेस ग हे तुकडे जपून ?" मी म्हटलं " ताळमेळ " "कसला ?" प्रश्नाचं उत्तर माहित असताना ते माझ्याकडून वदवण्याचा यशस्वी प्रयत्न धुळीने भरलेले कपटे आहेत सांगायला की , "पुलाखालून बरच पाणी वाहून गेलंय मनामधल्या संवेदनशीलतेवर निबरपणाचं पुटं चढलंय " दुमडलेल्या कपटाचं म्हणशील तर ते सांगतायत " वेळोवेळी मनाला घातली गेलेली मुरड , संसार...
- Get link
- X
- Other Apps
प्रियन काल खूप दिवसांनी भेटलास पुस्तकात जपून ठेवलेल्या गुलाबाच्या पाकळीतुन आणि इतक्या दिवसांच्या विरहाची जाणीव पुन्हा दरवळू लागली मंदधुंद गंधातून मनाच्या गाभाऱ्यात दडपलेल्या स्मृतींचं बीज तरारलं आणि पाहता पाहता त्याने मला पूर्णतः लपेटलं त्या गुंत्यातून स्वतःला सोडवता सोडवता मी कधी झाड होऊन गेले तुझ्या स्मृतींचं ते कळलंच नाही बहरलेल्या झाडाला इतकंच कळलं की तुझ्या शिवाय पूर्वीसारखा वसंत आता एकट्याने फुलत नाही