Posts

Showing posts from April, 2018

दुसरी बाजू

                                                                                                   credit :- sahitysuchi magzine/ rasik sahitya दुसरी बाजू  (लेखक - हृषीकेश जोशी) छाप आणि काटा असा खेळ लहानपणी आपण प्रत्येकाने कधी ना कधी निर्णय घेताना खेळलेला असेलच. हा प्रसंग तेव्हाच  उद्भवतो जेव्हा दोनही व्यक्तींना आपलेच मुद्दे योग्य आहेत असं वाटतं असत. आणि कोणीही मागे हटायला तयार नसत. मग अशावेळी नाणं टाकून येईल तो कौल स्वीकारून पुढं जायचं आपण मान्य करतो. त्यावेळी आपण निवडतो की तु...

आणि चिंटू थांबला . . .

                                                                                                     credit :- sahitysuchi magzine/ rasik sahity आणि चिंटू थांबला  . . .  (लेखक चारुहास पंडित - शब्दांकन तृप्ती कुलकर्णी / व्यंगचित्र  दिवाळी विशेषांक)   अजूनही आठवतो तो काळा दिवस ज्याच्या उगवण्याने, सर्वांची सकाळ प्रसन्न करणारा चिंटू अचानक निःशब्द, अन एकाकी  झाला. ११ जूनची ती सकाळ, अचानक प्रभाकरचा फोन येतो काय आणि त्यानंतर विचारांच्या ही पलीकडे असे...
स्मृतीला पालवी फुटली काल रात्री आईच कपाट आवरताना एक जुना फोटोंचा अल्बम सापडला. बघावा की न बघावा या विचारत असतानाच चुकून त्यात न मावणारा एक फोटो खाली पडला त्याला उचलायला गेलं तर अल्बम उघडला गेला आणि क्षणार्धात गत स्मृतीला पालवी फुटली. आठवणींच्या पालवीचं  एक वैशिष्ट्य तिला तुम्ही स्वीकारलं किंवा दुर्लक्षलं तरी तिला फारसा फरक पडत नाही. ती येतानाच  तिच्या  सामर्थ्यासह येते आणि पाहता पाहत वृक्षाएवढी होऊन आपल्याला तिच्या सावली खाली घेते. तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तिच्यापेक्षा उंच होऊच शकत नाही. माझंही अगदी तसंच  झालं तिने मला आपल्या सावली खाली घेतलं आणि एकेक आठवणी पिकल्या पानांसारख्या  गळून पडायला सुरवात झाली.  आता पाऊल उचलून पुढं जण शक्यच नव्हतं कारण आजूबाजूला असंख्य आठवणी पानांच्या स्वरूपात पडल्या होत्या. त्यावरून जावं तर त्या कायमच्याच संपणार होत्या. त्यामुळं तिथेच उभा राहून त्या आठवणींना पुन्हा गोळा करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. या सगळ्या पानात एक कोवळ्या आठवणीच नुकतंच  पालवले...

पारुल एक प्रेम कहाणी

                                                                                                    credit :- sahitysuchi magzine/ rasik sahitya पारुल एक प्रेम कहाणी (मूळ लेखक : हर्ष देहेजिया , मराठी अनुवाद : सविता दामले) प्रणयरम्य प्रेमकहाणी आहे. ज्यात भारतीय तत्वज्ञान, शृंगार यांचा सुवर्णमध्य आढळतो. वरपांगी ही प्रणयरम्य कथा वाटत असली तरी त्या प्रणयाचा दर्जा उच्च कोटीचा आहे. आणि त्यात वैषयिक भावनानांबरोबरच मधुरा भक्तीच दर्शनही घडत. दोन भिन्न भिन्न संस्कृतीत, वातावरणात वाढलेले, अत्यंत ...

दोन स्पेशल

Late's Talk थिएटर, अथर्व थिएटर्स आणि मिश्री थिएटर्स  निर्मित  दोन स्पेशल  यातील कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा आणि चर्चा   दिनांक : २४.११. २०१६, गुरुवार, स्थळ :  टिळक स्मारक मंदिर, वेळ : सायंकाळी ६. ३० काही गोष्टी घडायला योग यावे लागतात तर काही गोष्टी सहजगत्या जुळून येतात आणि अर्थातच जुळून आलेल्या गोष्टी जास्त आनंद देतात. तसंच काल माझ्याबाबतीत घडलं. झालं असं की संध्याकाळी भेटल्यावर आरतीने मला सहज विचारलं दोन स्पेशल नाटकाचा  Talk थिएटर कार्यक्रम आहे येणार आहेस का? सुरुवातीला मी नाहीच म्हटलं इतर कामाच्या गडबडीत नाही जमणार शिवाय आपण ते नाटकही पाहिलं नाही तर जाऊन काय कळणार ? असे सगळॆ उदासीन विचार माझ्या मनात आले. पण नंतर तिचा एकंदरीत उत्साह पाहून मलाही वाटलं की  जावं आपण तिच्या सोबत, काय हरकत आहे? आधी कार्यक्रम बघू मग आवडलं तर नाटकही बघू. मग लगेच तिला जाऊन म्हटलं, "चल, येते." आणि आम्ही टिळकस्मारक मंदिरात गेलो. तिथे आधी पासच बुकिंग केलेले असल्याने बाकी कसलं टेन्शन नव्हतं. पास घेऊन नियोजित जागी बसलो. सहज पाहिलं...

आपले सण आपली संस्कृती, निसर्गचित्रे

                                                                                                   credit :- sahitysuchi magzine/ rasik sahity आपले सण आपली संस्कृती, निसर्गचित्रे समुद्रे वसने देवि  पर्वत स्तन मंडीते  विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्वमे प्रातः काळी जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिची क्षमा मागणारा, तिला देवत्व देणारा हा श्लोक आजही कित्येक घरात हात जोडून मनोभावे म्हणला जातो.  सध्या जरी याचे प्रमाण कमी असले तरी ह्या श्लोकाचा अर्थ माहित नाही किंवा हा श्लोक माहित ना...

युगवाणीचे तीन संपादक

                                                                                                      credit- sahitysuchi magzine/rasik sahitya   युगवाणीचे तीन संपादक (डॉक्टर विलास चिंतामण देशपांडे ) काव्यशास्त्र विनोदेन  कालोगच्छति धीमताम्।  व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा  । ।  असं जे म्हंटल जातं ते खरं आहे. हा संस्कृत श्लोक मनुष्याच्या जीवनातील साहित्याचे महत्व अधोरेखित करत आहे. जे लोक   काव्य, शास्त्र, विनोद अशा सर्वांगाने परिपूर्ण साहित्याचा रसास्वाद घेतात त्यांचा काळ चांगला व्यतीत होतो. तसेच अनेक अनुभवांनी त्यांचे आयुष्य समृद्ध होते. जाणिवांचा विकास होतो. पण जे लोक तो रसास्वाद न घेता  आपला विश्राम काळ   निव्वळ  वादविवाद किंवा निद्रेत व्यतीत करत...

पशुवैद्याची रोजनिशी

काल आपण सर्वानी जागतिक चिमणी दिन साजरा केला. त्यानिमित्ताने राजहंस प्रकाशनाचे पशुवैद्याची रोजनिशी हे अरुण जोशी लिखित पुस्तक हे खरोखर वाचनीय आहे. ज्यांना पशुपक्ष्यांची आवड आहे त्यांनी आवर्जून संग्रही ठेवावे असे पुस्तक.  पशुवैद्याची रोजनिशी Reviewed By : तृप्ती अमोल कुलकर्णी Book Name : पशुवैद्याची रोजनिशी Book Author : अरुण जोशी Publisher : राजहंस प्रकाशन , पुणे Page Size : 130 Price :  Rs. 160 Buy पक्ष्यांच्या रंजक गोष्टी अन् वैशिष्ट्यांचे अनोखे जग ‘पशुवैद्याची रोजनिशी !’ हे पुस्तक वाचले आणि नकळत नुकत्याच येऊन गेलेल्या ‘भो भो’ या मराठी चित्रपटाची आठवण झाली . या चित्रपटाचा खरा हिरो होता एक कुत्रा . आपल्या मालकिणीच्या खुनाच्या आरोपात अडकलेल्या ह्या कुत्र्याची , एका प्राणीप्रेमी इन्स्पेक्टरला खरा खुनी शोधण्यात कशी मदत होते , ते यात दाखवलं आहे . डॉ . अरुण जोशी यांनी देखील या प...
Image
चॉकलेट खायला वयाचं बंधन नसतं असं म्हणत आपण सगळे अगदी आवडीने चॉकलेट खातो. तसंच चिंटू हास्यमालिकेचा आनंद लुटायला ही  वयाचं बंधन नसतं. कारण चिंटू हा पण एका गोड  चॉकलेट सारखाच आहे. चॉकलेट कसं  केव्हाही खा पोट भरलेलं असो व रिकाम, मन शांत असो  व व्यग्र असो तीच चव आणि तितकाच आनंद देतं. तसंच चिंटू ही कधीही आणि कितीही वेळा वाचला तरी तितकाच आनंद देतो.  त्यामुळे २५ वर्षे झाली तरी अजूनही  "चॉकलेट बॉय " राहणाऱ्या चिंटूला खूपखूप शुभेच्छा !!!!
दिवाळी अंक एक दृष्टिक्षेप ! ऑक्टोबर महिन्यात रणरणत्या उन्हात निवांत न बसता खरेदीला जेव्हा  झुंबड उडते तेव्हा जाणवतं की, दिवाळी आली, आणि मग याचे पडघम आपल्या आजूबाजूलाही वाजायला लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे कपड्यांचे सेल, अमुकतमुक खरेदीवर इतकी टक्के खास सूट असे घोषणा फलक जेव्हा दिसू लागतात तेव्हा बाजारपेठां इतकीच माणसांची मनेही आनंदाने फुलू लागतात. खरंच हा सण ' सर्जनशील ' आहे. तो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तना-मनाला चालना देतो. फराळाचे विविध प्रकार बनवणे, रांगोळ्या रेखाटन, वेगवेगळ्या भेटवस्तू बनवणे, आकाशकंदील, रंगीबेरंगी पणत्या, सुगंधी उटणं-तेलं, शुभेच्छा कार्ड तसेच किल्ले बनवणे या प्रकारात शरीराइतकीच बुध्दीलाही चालना मिळते. या व्यतिरिक्त दिवाळीच एक खास मराठमोळं वैशिष्ट्य म्हणजे नियमितपणे वाचकांना वैचारिक दृष्ट्या संपन्न करणारा 'दिवाळी अंक' होय.  केवळ बाह्य सजावटीलाच महत्व न देता वैचारिक सौंदर्य खुलवायला वेगवेगळे विषय घेऊन येणारा, बौद्धिक रंजन करणारा  ' ...
डिअर जिंदगी आजकाल सत्तेच्या स्पर्धेच्या काळात खुर्चीच महत्व काय ? हे कोणाला वेगळं सांगायलाच नको. पण कालच पाहिलेल्या डिअर जिंदगीने मात्र खुर्चीचा एक वेगळाच अर्थ सांगितला. खुर्ची हे केवळ बसण्याचं साधन नाही ती आपल्याला मान सन्मान तसेच काही निवांत निश्चिन्त  क्षणही देते. पण जर ती योग्य प्रकारे निवडली नाही तरी तणावाला करणीभूतही ठरू शकते.  हे  जाणून घ्यायला  तरी हा सिनेमा पाहायलाच हवा.  केवळ चांगला आशय  आणि चांगले कलाकार या पेक्षाही उत्तम सिनेमॅटोग्राफी  आणि  आर्ट डिरेक्शन  या दृष्टीने हा सिनेमा खूपच चांगला ठरतो.  सिनेमाची स्टोरी मी मुद्दाम सांगणार नाही पण एक मानसोपचार तज्ञाच घर, एका मनस्वी कलाकाराचं घर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी इतकं सुसंगत आहे की कमी संवादात पण नेमकी सिच्युएशन समजते. एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था आणि तीच वर्तन, तिचा जगाकडे, स्वतः कडे बघण्याचा दृष्टिकोन याचा खोलवर अभ्यास या सिनेमातून जाणवतो. वेगवेगळ्या प्रतिमांमधून आशय अधिक प्रभावीपणे मांडण्यात आलाय याच उत्तम उदाहरण म्हणजे मानसोपचारतज्ञान ...