पारुल एक प्रेम कहाणी
credit :- sahitysuchi magzine/ rasik sahitya
पारुल एक प्रेम कहाणी
(मूळ लेखक : हर्ष देहेजिया , मराठी अनुवाद : सविता दामले)
प्रणयरम्य प्रेमकहाणी आहे. ज्यात भारतीय तत्वज्ञान, शृंगार यांचा
सुवर्णमध्य आढळतो. वरपांगी ही प्रणयरम्य कथा वाटत असली तरी त्या प्रणयाचा
दर्जा उच्च कोटीचा आहे. आणि त्यात वैषयिक भावनानांबरोबरच मधुरा भक्तीच
दर्शनही घडत. दोन भिन्न भिन्न संस्कृतीत, वातावरणात वाढलेले, अत्यंत
संवेदनशील, तरल बुद्धिमत्ता असणारे प्रेमीजीव इथे एकत्र आले आहेत. हे
दोन्ही जीव म्हणजे एकाच ध्येयाकडे जाणार्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या दोन
स्वतंत्र विचारधारा आहेत असे वाटते. त्यातील एक आहे अद्वैतवादी
शंकराचार्यांच्या विचारांनी प्रेरित वेदांत, कर्मकांड, त्याग यांना
अग्रक्रम देणारी तर दुसरी आहे मधुराभक्तीत रुजलेली इंद्रियभोगिनी चराचराचा
उपभोग घेणारी.
दोन परस्पर विरोधी
विचारधारा परस्परांकडे आकर्षिल्या जातात तेव्हा सुरवातीला घडणारा वैचारिक
संघर्ष, त्यातून एकमेकांवर केल्या जाणार्या कुरघोडी या सार्यातून
दोन्हीचं मंंथन होत होत, परस्परांना समजावून घेत त्या एकमेकात मिसळून
जातात. पण हा सुंदर मिलाफ घडणं वाटतं तितकं सोपं नाही. ह्यासाठी परस्परांना
समर्पण करणं फार महत्वाचं आहे. ह्या समर्पणाचं सुंदर वर्णन इथे कबीराच्या
दोह्यात पाहायला मिळत जे त्या दोघांना अगदी समर्पक आहे.
प्रेम की गली इती संकडी जहाँ दो नहीया समाई
जहाँ मै हू वहा हरी नाहीं, जहा हरी है वहा मैं नाहीं
खऱ्या
प्रेमाचा मार्ग इतका छोटा आहे अरुंद आहे की तिथे द्वैताला दोघानां जागाच
नाही तिथे एकरूपच व्हावं लागत. मी असेन तर तुला जागा नाही (कारण तु
माझ्यातच सामावला आहेस) आणि तू असशील तर मला जागा नाही (कारण मी तुझ्यातच
सामावली आहे). इतकं अद्वैत असल्याशिवाय मिलाफ शक्य नाही.
असा
मिलाफ घडणं हे एका क्षणात होत नाही. त्यासाठी निश्चितच काही काळ जावा
लागतो आणि या काळातही अनेक परिवर्तने घडत असतात. ऋतुचक्र बदलते त्याचा
परिणाम निर्सग आणि मानव या दोघांवरही होतो. त्यामुळे या कथेत चंद्र, सूर्य,
तारे, नदी, नाले, वृक्ष, वेली, पक्षी या साऱ्यांचे अस्तित्व एकमेकांशी
संलग्न आहे. त्या सर्वांमध्ये एक प्रकारचा सुसंवाद आहे. याची प्रचिती या
कथेत वारंवार येते. प्रणयाची विविध रूप या कथेत पाहायला मिळतात. केवळ
स्त्री आणि पुरुष यांच्या प्रणयाला प्राधान्य नसून सृष्टीतील परिवर्तनाची
रहस्यं येथे सापडतात. या कथेतील नायक आणि नायिका यांच्यातील संवादात
तात्विक चर्चेच्या वेळी तसेच त्यांची भावस्थिती दर्शवण्यासाठी प्रतीकात्मक
स्वरूपात निसर्गाचा वापर फारच सुंदररित्या केला गेला आहे. जसे पारिजातक
फुलाची प्रेमकथा असो किंवा संस्कृत काव्यात स्त्रीच वृक्षांशी जोडलं गेलंल
नातं, यक्षिणींचा वृक्षातील वास असो. अशा अनेक सृष्टीच्या सोहळ्याचे
वर्णन हे अगदी चित्रमय शैलीत वाचायला मिळते.
जीवनाचं
अंतिम ध्येय मुक्ती असले तरी त्यासाठी विरक्तीनं, दैहिक उपभोग त्याज्य
मानून किंवा त्याला दुय्य्मत्व देवूनच ते साध्य होतं असं नाही तर जीवनाचा
सृष्टीच्या अनेकविध रूपांचा आस्वाद घेतही मुक्ती सध्या करता येते आणि ती
कदाचित जास्त आनंददायी , नैसर्गिक असू शकते .
अंतिमतः या दोन्ही विचारधारांचे ध्येय एकच असले तरी मार्ग भिन्न आहेत.
पण प्रेम या अत्यंत सुंदर, उदात्त भावनेनं ते एकरूप झाले आहेत. त्यामुळे
या कथेतील शेवट जरी विरह आहे असे वाटलं तरी ते एकमेकांच्या अस्तित्वात
विलीन होऊन पुन्हा नव्याने जीवनाची सुरवात करण्यासारखे आहे. हा द्वैताकडून
अद्वैताकडे जाणारा प्रवास वाचताना प्रवाही भाषेने उत्कंठा वाढवत जातो. आणि
एका निर्मल, सात्विक आणि तरल प्रेमाची अनुभूती देणारं प्रवास ठरतो.
| वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध http://rasiksahitya.com/#/home |
|
|
Comments
Post a Comment