हरवलेल्या मंदिराचे रहस्य
पुस्तक वाचण्याची आवड असलेला माणुस कोणतंही पुस्तक वाचतो मग ते बालवाङ्मय
का असेना. उलट त्यामुळं प्रसंगी लहान-मोठं होण्यातली मजाही तो अनुभवू
शकतो. मला अशीच मजा अनुभवायला मिळाली ती सुधा मूर्तींच्या "हरवलेल्या
मंदिराचे रहस्य" या अनुवादीत पुस्तकामुळं. मेहता पब्लिशिंगचं हे पुस्तक
येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी आर्वजून वाचावं असं आहे. यातल्या
अनुष्काच्या करामती वाचताना आपण आपल्या लहानपणी वाचलेल्या "चिंगी" ची आठवण
होते. क्वचित प्रसंगी ही आधुनिक चिंगीच आहे की काय असंही वाटून जातं.
त्यामुळं आपल्या मनात बालपण जपून असलेल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला
हरकत नाही. किंबहुना ज्यांच्या लहानपणीच्या सुट्टया आजोळी गेल्या आहेत
त्यांना तर ते बालपणीचे दिवस नक्की आठवतील.
याशिवायही या पुस्तकात अजुन खुप गमती जमती आहेत, काही उल्लेखनीय गोष्टीही आहेत. पुस्तकाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्याची प्रस्तावना. फारच सुंदर आणि योग्य पद्धतीनं लिहली आहे. शिवाय हे पुस्तक सुधा मूर्तींनी त्यांच्या नातीला म्हणजेच अनुष्काला अर्पण केलं आहे. तर अशा या धाडसी अनुष्काच्या करामती सांगणाऱ्या एकुण तेरा कथा आहेत. या कथाप्रकांरांच वैशिष्ट्य म्हणजे त्या म्हणल्या तर प्रत्येक स्वतंत्र कथा आहेत आणि म्हणलं तर ती एक छोट्यांची छोटीशी कादंबरिकाही आहे.
बंगळूर सारख्या शहरात सीबीएसर्इ बोर्डाच्या शाळेत शिकणारी अनुष्का सुट्टी निमित्त "सोमनहळ्ळी" सारख्या लहानशा खेड्यात आपल्या आजीआजोबांकडे रहायला येते. तीचे आर्इवडील कामानिमित्त परगावीच राहतात. आणि मग अनुष्काच्या आयुष्यात ज्या ज्या धमाल गोष्टी घडतात त्या वाचताना आपण रंगुन जातो. तिला निर्सगाची अद्भुत रहस्यं, चमत्कार पहायला आणि अनुभवायला मिळतात. अशीच एकदा आजी आजोबांकडुन ऐकलेल्या कथति गोष्टीच्या रहस्यानं अनुष्का भारावलेली असते आणि तिच्याही नकळत त्या रहस्यमय गोष्टीचा ती एक मोठा भाग होते. म्हणजे नक्की काय घडतं? ते जाणण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.
आता ही कथा वाचताना मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या बाबतीतही काही लोककथा असतात. ज्याला कोणी सांगोवांगीच्या गोष्टी म्हणतो तर कोणी कपोलकल्पित कथा म्हणतं. तशीच त्या गावच्या हजारो वर्षांपुर्वीच्या सोमनायक नावाच्या सद्शील राजाची कथा सगळ्यांना ऐकीव माहित असते. पण तीच कथा सांगण्याची आजीची पद्धत निराळी, आजोबांची निराळी, शिवाय गावातले इतर गावकरीही ती निराळ्या पद्धतीनं सांगत असतात. इथं कानगोष्टीच्या खेळाची आठवण आल्यावाचुन रहात नाही. आणि शेवटी घडतंही तसंच अगदी कानगोष्टी सारखं. मुळ कथा काही वेगळीच असते. पण एक मात्र आहे ती सत्यकथा असते. आणि त्या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी, रहस्यांचा शोध लावण्यासाठी सगळे गावकरी एकत्र येऊन जे सहकार्य करतात ते तर वाखाणण्याजोगं आहे. या सगळ्या धमालीत अजुनही काही गोष्टी आवर्जून जाणवतात. ते म्हणजे आजीआजोबा आणि नातवंड यांच्यातलं नातं, दोन पिढ्यातलं अंतर, शहरी आणि ग्रामीण जीवनातला फरक. शिक्षण पद्धतीतला फरक. मुलांच्या नैसर्गिक क्षमतांचा वापर कसा होऊ शकतो याची जाणीव. अशा अनेक लपलेल्या वाटा सापडतात.
खरंतर हे पुस्तक केवळ मुद्रित माध्यमापुरतंच मर्यादित न राहता याचं दृकश्राव्य माध्यमात माध्यमांतर झालं तर अधिक चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेता येईल आणि ते अधिकाधिक परिणामकारक ठरेल.
मूळ लेखिका - सुधा मूर्ती अनुवाद - लीना सोहोनी प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस मुखपृष्ठ - चंद्रमोहन कुलकर्णी
तृप्ती

Comments
Post a Comment