नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य
छत्री घेतली म्हणजे पाऊस नाहीसा होतं नाही
पण पावसात आपण स्थिरतेनं उभं राहू शकतो.
स्वतःला कोरडं ठेवू शकतो. हे सत्य निरनिराळ्या व्यक्तिरेखांतून, भुमिकांतून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे 'नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हा कथा संग्रह. या कथा वाचत वाचत आपण सहजगत्या विषयाच्या मूळापाशी जाऊन पोहोचतो.

मनुष्याच्या जन्मापासूनच त्याच्याशरीराचा भाग असणारी
नाभि त्याच्या काही समस्यांशीही नकळतपणे जोडली गेली आहे. त्या समस्यांची
मुळं तीच्या पोटात दडली आहेत.
या
समस्या जुन्यापुराण्या आहेत. कित्येकदा त्या आपापल्यापरीनं सोडवण्याचा
प्रयत्नही माणसानं केला आहे. पण त्याच्या मुळापर्यंत न जाता वरवरच्या इतर
गोष्टींनाच महत्त्व दिल्यानं त्या अधिकाधिक जटील झाल्या आहेत. जगण्याच्या
संघर्षाचं प्रमुख कारण ठरल्या आहेत.
मानवी नात्यांवर, जगण्याच्या बदलत चाललेल्या मुल्यांवर ,एकूणच माणसांच्या आणि मनुष्येतर जीवांच्याही सहजीवनावर पुर्नविचार करायला लावणार्या या 'नाभि'कथा आहेत. त्यामुळं प्रणवच्या या कथांतून तुटलेली छत्री आणि बदनाम झालेला काळा तलावही आपलं मन 'मोकळं' करतात.
स्त्रीपुरुषाचं सहजीवन हे तर कथांतून जाणवतंच अगदी सहजगत्या मानवी नात्यांच्या निरनिराळ्या धाग्यांशी ते जोडलं गेलं आहे. काळाच्या ओघात त्याची बदलत जाणारी मुल्यं, त्याला हिंदकळत ठेवणार्या ऐहिकतेच्या लाटा नकळतच आपल्याला विचार प्रवृत्त करतात.
तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली तरी मानवी भावभावना, माणसाच्या मुलभूत गरजा तो बदलु शकला नाही किंवा त्याला अन्य पर्यायही देऊ शकलेला नाही. ही जाणीव या आठही कथांतून होत जाते.
एकंदरीत सहजीवनात एकटं राहू इच्छिणारा माणूस आणि एकटेपणात सहजीवन शोधणारा माणूस अश्या द्वंद्वात सापडलेला माणूस आपल्या समोर ठळकपणं उभा राहतो. आजच्या आधुनिक माणसाचं प्रतिनिधीत्व करतो.
तृप्ती

Comments
Post a Comment