Posts

Showing posts from 2016
परवा अचानक तुझं कपाट आवरताना एक बिल सापडलं आणि ते पाहताना मन पटकन भूतकाळात गेलं. विस्मृतीच्या कोशात गुरफटलेल्या सुरांनी आजूबाजूचं वातावरण भारून टाकायला सुरवात केली.  एकेक सूर काळाच्या मर्यादा ओलांडून मला तुझ्यासोबत कुठे तरी दूर घेऊन गेला.   ती इवलीशी पावले दुडूदुडू धावणारी आणि त्याच्या मागे पळताना तुझी होणारी धावपळ. ते मागे पुढे अंगण असलेले दोन खोल्यांचं घर, आणि एका कोपऱ्यात जाणाऱ्या-येणाऱ्याच स्वागत करायलाच जणू उभी असलेली सतार. सारं काही क्षणार्धात आठवलं. आज मन सुरात न्हाहून निघत होत.  आठवणींत  चिंब करत होत. सगळ्या आठवणींना हट्टाने मागे टाकून पुढे निघून जावं असा प्रयत्न करत होते खरं; पण ते काही जमेना. नुकत्याच संपलेल्या मैफिलीच्या भैरवीचे सूर जसे आसमंतात भरून राहतात आणि मैफिलीच्या स्वराविष्काराची आठवण करून देतात तसं या आठवणींचं झालं.   अगदी कालपरवा घडल्यासारखं सगळं नकळत आठवू लागलं. आपल्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या वेळी एक मांजर आपल्या त्या जुन्या घरात अडकलं आणि स्वतःची सुटका करून घेण्याच्या न...
प्रियन !!!! कधी आणि कसे बंध तयार झाले आपल्यात ना हे तुला ठाऊक ना मला आठवणी तरी किती आणि कशा कशाच्या जपाव्यात मनाने ना तुझ्या हातात ना माझ्या कधी पारिजातकाच्या कधी चाफ्याच्या तर कधी सोनपिवळ्या उन्हाच्या रूपाने येतोस आणि सावरलेल्या माझ्या अंगणात पुन्हा ऐसपैस पसरतोस तुझं हे असं पसरणं ना मला आत सुखाने राहू देतं ना तुला ओलांडून बाहेर जाऊ देत
प्रियन ! हे भिरभिरणारे केस आवरण्याचा ; किंवा तो गंधाळलेला हात लपवण्याचा प्रयत्न करायचा नाही , असं ठरवलंय मी आताशा ; जो जो विसरण्याचा प्रयत्न करते तो नकळत तुला आठवण्याचाच बहाणा होतोय , हे कळलंय मला मग म्हंटल जाऊ दे स्मृती-विस्मृतीच्या या खेळात ना  तू सुखी ना मी सुखी आताशा दुःखाच्या धाग्यातलं हे समत्व ही छळतय  मला 
प्रियन ! किती छळशील  रे ? प्राजक्ताने गंधाळलेला  तो हात रात्रभर उशाशी ठेवून मी झोपले घडले ते सारे स्वप्नच होते हे मनाला पटवण्यासाठी वाटलं पहाट होताच विरून जाईल  तो गंध आणि ते स्वप्न ही वास्तवाच्या स्पर्शाने पण घडले काही भलतेच हाताचा गंध जरी लपला गेला तरी तू छळु लागलास मला भिरभिरणाऱ्या बटांतून आता त्यांना बांधायला जावं तरी पुन्हा हात सुगंधित  होण्याचीच शक्यता  अन मोकळेच राहू द्याव्यात तर आज दिवसभर वाऱ्याने मलाच कवेत घेण्याची शक्यता !!!
पाऊस कधी काळ्याकुट्ट ढगातून कडकडाट करत बरसणारा, कधी श्रावणातल्या सोनं पिवळ्या उन्हातून हळुवार बरसणारा, कधी इंद्रधनू ची बरसात करणारा, कधी दरीतून झरा बनून वाहणारा, कधी कौलातून चंद्रमौळी झोपडीत बरसणारा, कधी दवबिंदूंतून वसुंधरेला सौंदर्य देणारा, कधी चातकाची तहान शमवणारा, कधी बळीराजाचं स्वप्न पेरणारा, कधी आतल्या पावसाला आळवणारा, कधी बाहेरच्या पावसाची ओल आत झिरपवणारा, कधी आठवणींच्या कळ्या उमलावणारा, कधी उमलल्या कळ्यांना सुगंध देणारा, कधी शिंपल्यातून मोती निर्माण करणारा, सृजनशील,  समृद्धीचं प्रतीक आहेस तू, किती किती रूपात गवसतोस तू ??? बरसतोस तेव्हा रुक्ष कोऱ्या पाटीवरची कवितेची ओळ बनतोस तू  !!!!
प्रियन , असा कसा आहेस रे तू ?? शेजारच्या अंगणातल्या पारिजाताका सारखा, जिथे मूळ आहेत तिथे तर दरवळतोस  पण शेजारच्या अंगणाशीही किती लगटतोस ? मला तुझं हे वागणं मुळीच पटत नाही प्रियन ! चाकोरीतलं आखीव रेखीव जगणं मान्य असताना, तुझं हे आगंतूका सारखं माझ्या अंगणात मध्येच डोकावणं आणि आपल्या मनमोहक सुगंधाने मनात घर करून राहणं मला नाही सोसत आता तुला काही कल्पना नाही रे माझ्या सीमित जगण्याची संस्कारात बांधलेल्या मनाची किती घालमेल करतोस तू? सगळं बंधन झुगारून तुला हातात घ्यावं मनसोक्त सुगंध अनुभवावा तर एक भीती त्याची सवय झाली तर ? एक क्षण मोहून मी तुला स्पर्श केला आणि लगेच विरक्तीन देवाच्या चरणी वाहील वाटलं चला बरं झालं ज्याचं देणं त्याला दिलं रिकामे हात घेऊन परत येताना मन काहीस हुरहुरलं खरं आपसूकच हात जवळ आला तो काय ? क्षणभराच्या सहवासानेही माझी ओंजळ सुगंधाने भरलेली प्रियन ! आता हा सुगंधी हात लपवावा तरी कुठे ????
अवघा रंग एकाची झाला निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला शक्तीचे स्वर लेऊनि सावळ्या हा आला रंगांची दुनिया ही बदलते क्षणोक्षणी रंग चढाओढीच्या दुनियेत होतो असंगाशी संग मनाचे मनाशी नाते साधण्या हा आला निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला चराचरात रूप तुझे हे विश्व त्वांचि निर्मिले विसरुनी तुज मूळ स्वरूपा मन पार्थिवताचं गुंगले अमूर्त तुझे रूप हे सुरांतुनी साकारण्यास आला निराशेचे मळभ दूर करुनि कान्हा आला कधी कृष्ण रंग  भीतीचा , कधी  हरित रंग समृद्धीचा कधी केसरी रंग  क्रांतीचा , कधी लाल रंग  क्रोधाचा , कधी जांभळा ऐश्वर्याचा , कधी श्वेत वैराग्याचा हा रंगाचा अनुपम सोहळाच जनरूपी जमा झाला अखेर शांतीचा नवा रंग उधळीत  हा कान्हा आला त्याच्या सवे पाहता पाहता अवघा रंग एकचि  झाला अवघा रंग एकचि  झाला

Aziz be chi shokantika

अझिझ  बे ची शोकांतिका  ........ तुझ्यासाठी अश्रू ढाळून आता हृदय थकलं आहे अश्रू गोठले आहेत आणि मनही गोठलं  आहे ........... असे आयुष्यातील विफलतेचे सूर आपल्या तंबोऱ्यावर आळवणाऱ्या 'अझिझ बे' या मनस्वी कलाकाराची  ही एक शोकान्तिका . " अझिझ  बे ची शोकान्तिका " हा तुर्की भाषेतील प्रसिद्ध लेखिका आयफर टंक यांच्या ' अझिझ  बे इंसीडन्ट ' या कादंबरी चा अरुणा दुभाषी यांनी मराठीत केलेला उत्कृष्ट अनुवाद होय. तुर्की भाषेतील महत्वपूर्ण व सर्वाधिक विक्री होणारी कादंबरी म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. एका कलाकारावरच्या जीवनावर आधारित असल्याने ही अतिशय उत्कट, थेट मनाला स्पर्श करणारा आणि व्यामिश्र अनुभव वाचकाला देते. तुर्की या संस्कृतीचा तेथील सामाजिक परिस्थितीचा परिचय ही कादंबरी आपल्याला करून देते. अझिझ  बे या कलाकाराच्या एकाकीपणात ओढवलेल्या मृत्यूपासून या कादंबरीची सुरवात होते. या दुःखी शेवटाची कारणमीमांसा करताना, गतकाळातील आठवणींच्या कथनातून अझिझ चा जीवनपट वाचका पुढे उलगडत जातो. अझिझ चे अ...

History

इतिहास  शाळेत बऱ्याच जणांना न आवडणारा विषय. पण मला मात्र इतिहास विषय बद्दल कुतूहल वाटायचे आणि त्याबद्दल बरेच प्रश्न हि पडायचे. पहिला प्रश्न हा कि ह्या इतिहासातल्या गोष्टी कोणी लिहिल्या ? कारण त्या सर्व  गोष्टींना  इसवीसन शके  अमुक अमुक साली लिहित. हे इतक कोणी आणि का लिहित असेल ? बर ते सांभाळून का ठेवत असतील आणि कुठे ठेवत असतील ? लिहिणाऱ्या माणसाचं अक्षर छान असेल का ? तो कुठल्या पेनने लिहित असेल ? आमच्या पेपर वर पाणी पडल कि त्याची अक्षर पुसट  होतात त्यांची कशी  इतकी दीर्घकाळ चांगली राहतात ?  शिवाय त्याने ते जाड पानांच्या वहीत लिहील असेल का ? तेव्हा बाईडिंग ची सोय नसताना ते सुरक्षित कस राहील ? आमची पुस्तक तर पुढच्या वर्षा पर्यंत हि टिकत नाहीत ह्यांचीच कशी टिकतात ? आणि लिहील तर  लिहू दे ना !  पण आम्हाला  का ते शिकवावं ? ह्यातून  काय फायदा ?  हे आणि  असे किती तरी प्रश्न मला पडत. जसे जसे वरच्या इयत्ता मध्ये गेले तस तशी इतिहासाची गोडी लागली. एक सनावळ्या सोडल्या तर बाकी कशाचा त्रास ...

Pustak Mitra

पुस्तकाची  कैफियत   किती दिवस झाले तुझी चाहूल नाही हळुवार मायेचा स्पर्श  हरवलाच जणू काही अजून किती वेळ  ओठ मुडपून राहायचं  संवादाच्या विरहाने आत आत झुरायचं आता कंटाळा आलाय या बंदिस्त जगण्याचा आठवतो तो  दिवस तुझ्या हातात झुलण्याचा कितीदा तू तेव्हा  मला प्रेमाने कुरवाळलस  मला  गमवण्याच्या भीतीने तुझ  नाव लिहिलंस तुझ्या उपेक्षेचं ओझं आता कुठवर पेलायचं गत स्मृतीनेच आता माझ्या मनाला रमवायच तुला आवडलेल्या ओळीं वरती हळुवार खुणा करताना मी मनोमन आनंदलो होतो तो अर्थ जाणून घेताना आपल्या मैत्रीच्या सुरांच कसं एकच गाणं बनायचं तुझ्या संदर्भ खुणेलाही (बुकमार्क ) मी उरी जपायचं आठवतात का ते दिवस, तु मला कुशीत घेऊन निजताना वाचता वाचता मिटल्या  डोळ्यांनी पुढली  पाने भिजताना कधी चहा पिता पिता ,तर कधी जेवताना सोबत असायचो तुझ्या पहिल्या वहिल्या प्रेमपत्राला हळूच मिठीत घ्यायचो कधी जपलेल्या मोरपिसाला, तर कधी सुकलेल्या फुलांचा सुगन्ध मी दडवायचो तू माझा नि...

Kavita Manogat

कवितेशी मनोगत  प्रिय कविते , तू माझ्या आयुष्यात असणं ह्यान माझं आयुष्य  अर्थपूर्ण झालय खरं पण तू नसताना  हि  ते अर्थहीन अस नव्हतंच . तू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मनाचा गाभारा बराच मोकळा होता. तू आल्यावर तो भरू लागला, त्यातले स्नेहाचे , आपुलकीचे दीप उजळू लागले आणि त्याने अनेक  वाटा  उजळल्या . हे हि खरं त्यामुळेच कि काय तू माझा प्राण बनलीस, श्वास बनलीस, ध्यास बनलीस, सशरीर आत्मा बनलीस. चकोराने पौर्णिमेच  चांदण जस मनमुराद  प्राशन करावं, तसं तुझ्या अनेक छटांचा आनंद मी  मनमुराद लुटला. तुझ्या एकावर एक कोसळणाऱ्या सरी माझ्या दृष्टीने लाखमोलाच्या होत्या आणि अचानक . . . . . . .  तू निघून गेलीस मग मला जाणवल, कि जस तुझ येण अचानक नव्हत तस तुझ जाण ही. त्या मागे कितीतरी जाणिवांचा , अनुभवांचा स्पर्श होता , एका चिरंतन तपश्चर्येची साथ होती. त्यामुळेच जरी तू माझ्यावर  रूसलीस , तरी जाताना आपलं बी मात्र पेरून गेलीस. आज  तू माझ्या जवळ नाहीस पण तू असतानाचे  तुझे संदर्भ , तुझ अस्तित्...
कविता कविता करावीशी वाटतानाच ती एकदम सुचेनाशी होते . शब्द अडखळतात , भावना ओथंबतात आणि मन भरून येते, हुंदका दाटून येतो पण शब्द काही सुचत नाहीत. शब्दांचे अर्थ दूरवर असतात कुठेतरी धुक्यात हरवलेले अस्पष्ट, अंधुक दिसणारे प्रकाशमान न होणारे पण जाणवणारे.  हळूच डोकावणारे  आणि लगेच लपणारे. हा शब्दांचा आणि माझा लपंडाव नेहमीचाच आहे. ते खट्याळ शब्द मग  कधी तरी अचानक झाडावरून  पानं  अलगदपणे  गळाव ना तसेच गळू लागतात आणि या कागदावर उतरतात. उतरताना ते असतात वेगळे आणि उतरल्यावर तर त्याचं संपूर्ण स्वरूपच बदलले असत. भावनेत समरसून ते आपल अस्तित्वच बदलवून टाकतात. कधी त्यात मोहकता असते,  कधी नाद तर कधी आनंद, वेदना तर कधी क्रांती अन शांती हि. कधी चैतन्य तर कधी उदासीनताही असते.                

Dear Ink Pen

प्रिय शाई पेन यासं ,       तब्बल २० वर्षानंतर तुला हातात घेतले आणि लिहायला लागल्यावर आठवले ते दहावीचे पेपर्स  बोर्डाची परीक्षा. टिपिकल शाईचा वास, एकाच वेळी २-३ पेन्स जवळ ठेवणे, एकातील शाई संपली तर दुसर हव म्हणून तयारी आणि त्यावरून शाळेची आठवण झाली. शाळा संपली आणि तुझे महत्व कमी कमी होत गेले. बहुदा मनाला आणि हाताला वळण लावण्याचे दिवस संपले म्हणून असावे .       काही काळ तुझी जागा स्टायलिश बॉलपेन आणि जेलपेन यांनी घेतली. आणि मग संगणकाच्या वापरानंतर तर लिखाणाची गरज राहिली नाही. त्यामुळे एके काळी आमच्याशी घनिष्ट नात असणारा तू आता तर  कित्येकांच्या आठवणीत देखील राहिला नाहीस.  काळाचा महिमा दुसर काय .               खरोखर काही गोष्टी अशा असतात कि विशिष्ट परिस्थितीशी वा प्रसंगाशी त्याचं नात जोडलेलं असत.  ड्रेसला पडलेले शाईच्या पेनाचे डाग, शाई निट यावी म्हणून झटकताना वह्या पुस्तकांवर नकळतपणे पडलेला शाईचा शिंतोडा. त्यामुळे नेमकी महत्त्...

Panch Pakwanna chi mejavani

पंचपक्वान्नाची  मेजवानी  एखाद्या खादाड माणसाला जर पंचपक्व्वाने दिली तर काय होईल ? त्याला काय आणि किती खाऊ  असे वाटेल. तसेच गेले दोन दिवस  २८ व  २९ फेब्रुवारी २०१६ ला   पुण्यातील साहित्य प्रेमीना झाले असेल.  महाराष्ट्र टाईम्स ने जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने साहित्य रसिकांना पंचपक्वान्नाची मेजवानी दिली.  अनुवाद लेखन, कथा लेखन,  नाटक , चित्रपट-पट- कथा लेखन या कार्यशाळा तसेच  कवी कट्टा, कवितेच गाणं होताना, ऐतिहासिक लेखनाला मागणी कशाने, लय पश्चिमा,  राजकीय कविता, चर्चा सत्र  या सारखे सुंदर कार्यक्रम सादर केले.  खरोखरच अशा प्रकारे मराठी दिन साजरा करणे हे प्रशंसनीय आहे. नुसते मराठी बोला, मराठी वाचा अस म्हणून काही होत नाही त्यासाठी मराठी वर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र करून त्यांच्यात संवाद घडवणे हे मोठे काम मटा करत आहे, आणि ते हि कोणताही प्रकारचे शुल्क न आकारता.      
सुरेल मैत्री ४       वाऱ्याच्या गतीने दिवस पळत होते सुदैवाने बाबंची तब्येत सुधारत होती. आता आयसीयू मधून बाबांना बाहेर आणायचा दिवस उजाडला. त्या दिवशी सगळे खूप आनंदात होतो. संदीप , त्याचे घरचे यांना देखील खूप आनंद झाला होता. चार दिवस सतत काळजीत असलेले आम्ही सारे जणू काही एक कुटुंबीय झालो होतो.  माणुसकीच्या एक धाग्याने सगळा परकेपणा  पुसला होता. ज्या दिवशी आम्ही दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट झालो त्या दिवशी आमचे हॉस्पिटल मधले सर्व सोबती बाबांना येउन भेटून गेले.  त्यामुळे बाबांना  देखील खूप फ्रेश वाटत होते. हळू हळू  रूम बाहेर पडून चालायला त्यांनी सुरवात केली होती.    संदीप च्या बाबांची तब्येत देखील सुधारली होती त्यानाही आता आयसीयू मधून बाहेर आणले होते. आमच्या खालच्या मजल्यावर ते शिफ्ट झाले होते. आम्ही रूम बदलली तरी वेळ मिळाला कि त्यांना भेटायला जात असू. असे करता करता आमचे जाण्याचा दिवस आला. सर्वांचे निरोप घेऊन आम्ही घरी निघालो तेव्हा आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू  होते ते दोन अर्थाने एक म्हणजे खूप मोठ्या संकटा...

Surel Mitri 1

सुरेल मैत्री - भाग १        रविवारची रात्र,  साधारण बारा वाजून गेले होते.  कुठे एखादा दुसरा आवाज जर सोडला तर हॉस्पिटल मध्ये सगळी शांतता होती. अचानक आलेल्या या प्रसंगाने मी आणि माझी आई जरा बावरून गेलो होतो. आयसीयुमध्ये असलेल्या वडिलांच्या काळजीने मन अस्वथ होत. झोपायला पुरेशी जागा नव्हती , म्हणून एका बाकड्यावर आम्ही दोघी विसावलो होतो. डोळे मिटून त्याही परिस्थिती आम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असताना, अचानक कानावर कोणी तरी हळूच गाणं गुणगुणत आहे असा भास झाला. या अशा  वेळी,  अशा  ठिकाणी कोण बर गाणं म्हणत असेल ? म्हणून डोळे उघडून इकडे तिकडे पाहिल. कोणी दिसेना जो तो झोपलेला किंवा पेंगुळलेला दिसत होता. भास झाला जाऊ दे ! म्हणून मी परत डोळे मिटले. परत तोच आवाज ऐकू आला. आता त्या आवाजाने आई हि जागी झाली होती याचा अर्थ तो भास नक्कीच नव्हता.  मग मात्र मी उठले आणि आवाजाच्या दिशेने थोडी पुढे चालत गेले. चालता चालता एका ठिकाणी लाईट च्या प्रकाशात एक पाठमोरा मुलगा दुसऱ्या  एका मुलाला एका  गाण्याचे...
प्रिय आजीसं ,           निळशार आकाश,  गर्द हिरवी झाडी ,  छोटे छोटे आणि  वळणावळणाचे रस्ते लाल माती आणि जोडीला निवांतपणा  अशा  वातावरणात  आमची मस्त  भटकंती चालू होती.  आणि अशातच एका पाऊलवाटेवर  तू  आम्हाला दिसलीस . अगदी  सहज आपली नजरानजर झाली आणि  आपण एकमेकांकडे पाहून हसलो. नऊवार साडी, डोक्यावरून घेतलेला पदर , कमरेतून वाकलेली, चेहराभर दुधाच्यासाई  सारख्या सुरकुत्या , छोटा अंबाडा , हातात दोन काचेच्या बांगड्या , गळ्यात कसला तरी धागा आणि  अनवाणी  अशी तू दिसलीस. चालता चालता  दम लागला कि तू कमरेवर हात ठेवून चालायचीस.  जवळपास  ५-१० मी. तरी आपण चाललो सोबत. तुझ्या चेहऱ्यावरचे दमलेले भाव मी कधीच टिपले होते. मनातून तुझ्या बाबत विचार करत होते,  आणि तेवढ्यात  तू माझ्या समोर आलीस आणि मला म्हणालीस, " ताई सामान आहे का काही ? मी येते सोबत  ते घेऊन, मला हमाली द्या. " मी फ़क़्त तुझ्याकडे पाहिलं मला खूप  अपराध्या सारखं वाटलं. मी तुला म्हंटल, " आजी ...

Priya Namu

प्रिय नमू ,       खंर तर मनीषा या तुझ्या नावाचा शॉर्टफॉर्म  मी केला ते खास तुझ्या वर माझा वेगळा हक्क असावा या भावनेतून. पण जस तुझ नाव मी छोट केल तू तशी छोटीच झालीस. तुझ्या मध्ये एकदम बालपणीचा खोडकरपणा आला. तुझ्या सोबत मलापण पुन्हा लहान होण्याचा आनंद मिळाला. आपल्याला एखादी लहान बहिण असावी असे मला नेहमी वाटे तुझ्यामुळे मला ती मिळाली. तस तुझ्या लहानपणीची गोष्ट तू जेव्हा  सांगितलीस तेव्हा जाणवल तुला कस अकालीच मोठ व्हाव लागल. आणि तेव्हा पासून आपल्यात मधल हे नात अधिक दृढ झालं. एकमेकांचा लहानपण जपण्याचा जणू आपण वसाच घेतला. मग काय तू धड्पडलीस किंवा एखादी चुक केलीस कि तुझी चेष्टा करायला मला मोकळीक मिळाली आणि गाल फुगवून लटक रुसायला तुला मिळाली. मैत्रीच हे नात बहिण्याच्या नात्यात बदलण्याची हि प्रोसेस खूपच छान चालू आहे.        मी तुझ्यापेक्षा मोठी असल्याचा फायदा नेहमीच घेतला, ताईगिरी केली पण तू ती खपवून घेतलीस म्हणून. माझ्यावरच्या संकटाच्या प्रसंगात तू माझ्यापेक्षा हि मोठी होऊन माझ्यासाठी लढलीस.  तो बदल खरच...

Surel Maitri 3

सुरेल मैत्री ३          जसा तो मुलगा त्याच्या आईला हाक मारत आला तेव्हा मला नर्स ने बोलावलं. बाबा शुद्धीत आल्याच सांगितलं त्यामुळे अगदी अत्यानंदाने मी पळतपळतच आयसीयूकडे गेले. बाबा शुद्धी वर आले होते आणि मुख्य म्हणजे त्यांनी मला ओळखल होत. आम्ही दोघे बोललो आणि त्यांना काहीतरी खायला द्या असे डॉक्टर ने मला सांगितले. तेव्हा घाईघाईने मी आईला तसं सांगून काहीतरी आणायला गेले. खायला घेऊन आल्यावर बाबांना ते दिले त्यांनी खाल्ल्यावर आम्हाला  खूपच बरे  वाटले. बाबांच्या जिवावरचा धोका टळला होता. ते आता लवकर बरे होणार होते. त्यामुळे आम्हालाही आनंद झाला होता. ते सांगण्यासाठी मी बाहेर येउन त्या काकूंना शोधत होते पण त्या काही दिसल्या नाहीत. मग मी म्हटलं इथे थोड्यावेळ बसुयात.         पाच दहा मिनट झाली असतील त्या काकू बोलत बोलत बाहेर आल्या त्या वेळी  त्यांच्या सोबत तो मुलगा दिसला. पण तो हाच होता का आणखी कोणी हे काही कळेना कारण त्यांना भेटायला बरेच जण येत होते. मी समोर  उभी पाहून  त्या  मला म्हंटल्या, " हा माझा मुल...

Surel maitri 2

सुरेल मैत्री २        दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तर बाबा शुद्धीवर आलेच नव्हते,  त्यामुळे मी फार काळजीत  होते. आई सुद्धा उठून बसली होती मी घाई घाईने आयसीयू मध्ये गेले डॉक्टरांशी बोलले. ते म्हणाले अजून  काही तास तरी सांगता येत नाही. काय करावे कळेच ना ! बाहेर येउन आई शेजारी बसले तर ती जरा  फ्रेश वाटत होती. मी तिला म्हणाले, 'काय ग तुला चहा आणून देऊ का ? अजून बाबा शुद्धीवर आले नाहीत.' ती म्हणाली, 'माझा चहा झाला मी केव्हाच उठले. मला त्या गृहस्थांनी चहा आणून दिला. ते माझ्याशी बोलले तुम्ही काही काळजी करू नका, त्यांनी आपली विचारपूस केली ते पण स्वामीभक्त आहेत. हे बघ त्यांनी मला हे पुस्तक वाचायला दिले. आणि वर म्हणाले काही काळजी करू नका काही पैसे लागले तर मी देईन. अहो अशा वेळीच खरी माणुसकी दाखवायची असते.' हे ऐकून मला खूपच बर वाटल आणि आधार वाटला.            मग मी आईला विचारलं, 'काल आपण झोपल्यानंतर कोणी आल होत का ? आणि ते कुठे झोपले असतील आता ? ते  काका काही तुला बोलले  का ?  आई म्हणाली,...

प्रिय इतिहास

प्रिय इतिहास , तूला  साष्टांग नमस्कार ! खर म्हणजे तुला माझ पत्र पाहून आश्चर्य वाटेल कारण इतक्या वर्षांनी तुझ्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण काय करू शाळेत तुझ्या बद्दल जो अभिमान वाटत होता , तुझ्या कर्तृत्वाने जे मन भरून येत होते त्यातले आता काही सुद्धा शिल्लक राहिले नाही की  काय ? असे वाटते. इतिहासातल्या व्यक्तींच्या नावाने शिमगा करण्याची एकही संधी सध्या वर्तमानातले लोक सोडत नाहीत. आणि हे असच चालू राहील तर भविष्यात डोकावण्याच धाडस ही  उरणार नाही.  ज्यांनी ज्यांनी तुझ्या नावाला मोठ केल इतक, की  जरी तू इतिहास असलास तरी इतिहास जमा होऊ नये, कायम लक्षात राहावा , त्यांना त्यांना आज शरम वाटत असेल रे या सगळ्याची .     खरच तुला तोंड हव होत रे,  तुझ्या हातात माईक हवा होता. म्हणजे काय  तुझ्या काळात घडलेल्या घटना या खरच आम्हाला जशाच्या तश्या आणि योग्य स्वरूपात कळाल्या असत्या. अमुक अमुक अस म्हणाले, तमुक तमुक तस म्हणाले अस काही घडलं नसत आणि चुकीच्या पद्धतीने ते सांगितल गेले नसत. अरे किती बिनधास्तपणे...

Selfi

Image
एक सेल्फी हवाच , पण 'ति'च्या साठी ! सध्या सगळीकडे आपण पाहतो कि स्मार्टफोन मुळे सेल्फी काढण्याच प्रमाण वाढलय. अगदी त्याच फ्याड  आलाय अस म्हणल तरी चालेल. पण ह्या साऱ्या मध्ये सामजिक जाणिवेपासून आपण थोडे दूर चालले आहोत. केवळ मी आणि माझ कुटुंब अशा मनोप्रवृत्ती मधून समाजात घडणाऱ्या अपप्रवृत्ती कडे डोळेझाक केली जात आहे. आणि ह्याच उदाहरण म्हणजे निर्भया बलात्कार प्रकरण. सबंध भारत भर ह्या घटनेचे पडसाद उमटले तरी देखील नंतर अशाच प्रकारच्या अनेक घटना  घडल्या आणि घडत आहेत हि खरोखरच शरमेची बाब आहे.     ह्या साऱ्याचा विचार करता केवळ कायदे आणि पोलिस यंत्रणा सक्षम करून फार काही बदल घडणार नाही. जर स्त्रियांची  सुरक्षितता हा प्रश्न अजूनही बिकट होत असेल तर मात्र आता वेळ आली आहे ती समाजाच्या मानसिकतेत बदल घडण्याची, वैचारिक क्रांतीची. सार काही सरकारवर विसंबून राहण्याची वृत्ती बदलायला हवी आहे. आणि आनंदाची गोष्ट हि, कि आपल्या युवा पिढीला याची जाणीव होऊन त्यांनी त्यांच्या परीने पाऊले उचलली आहेत. गरज आहे ती आपल्या प्रतिसादाची.  पुण्यात...

Don't Worry Be Happy

Image
Don't Worry Be Happy   काल  अचानक  एक उत्तम नाटक पाहण्याचा योग जुळून आला . Don't Worry Be Happy हे त्या नाटकाचे नाव. उमेश कामत आणि स्पृहा जोशी हि छोट्या पडद्यावर गाजलेली जोडी  प्रत्यक्षात काम करताना बघायला मिळणार म्हणून आनंद झाला . नाटकाच्या नावावरून  हे एक गमतीदार  नाटक असेल अस वाटल होत . परंतू  ह्या नाटकाने आमचा सुंदर अपेक्षाभंग केला. सुंदर अशासाठी कि  अपेक्षाभंगाच वाईट वाटल नाही. कारण नाटक हे विनोदी  अंगाने असले तरी विषय हा नाजूक आणि म्हंटल तर गंभीर  आणि सत्य परिस्थिती वर आधारित  होता .   हे नाटक पाहताना आपण नकळत गुंगून जातो. हसता हसता कधी आपल्या डोळ्याच्या कडा ओलावतात ते देखील समजत नाही.  पण यातील सत्यता आपण नाकारू शकत नाही.  करियर , लग्न आणि इतरांशी आणि आपल्या साथीदाराशी असलेले संबंध हे कसे बदलत जातात ते यातून फारच प्रभावीपणे मांडल आहे.  सोशल साईट चा आपल्या नात्यावर होणार कळत नकळत परिणाम पण यातून जाणवत रहतो.  संसार यशस्वी होण यासाठी केवळ ...
एक सत्य कथा मी अनुभवलेली  . . . . .  ती ……… भाग १  नेहमी प्रमाणे कामावर जात असताना मला ती भेटली . उंच आणि रेखीव बांध्याची, सावळ्या  रंगाची , नीट -नेटकी राहणारी, आत्मविश्वास आणि गोड हसू चेहऱ्यावर असणारी ,   नजर    चौकस आणि धीट अशी असणारी .  मी बसला उशीर होतोय म्हणून वैतागले होते. आजूबाजूला बघत होते तेव्हाच खर तर मी तिला पाहिलं होत , तिच्या व्यक्तिमत्वामध्ये काही खास आहे असा एका नजरेत जाणवत होतच पण  वैतागले   असल्याने,   असेल कोणी तरी म्हणून मी दुर्लक्ष  केल.  "दीदी बस इधर कब आयेगी ?  कितनी देर  हुई  है ."  अस म्हणत ती माझ्या जवळ आली. आवाजातला गोडवा जाणवून मी पाहिले तर तीच होती ती ! तिला कसलही  उत्तर देण्याच्या फंदात न पडता मी सरळ २-३ मिनिटे तिच्याकडे पाहून घेतल. तशी तीही मला बघत असावी असा मला वाटलं आणि माझा कयास खरा ठरला. मी काहीच बोलत नाही अस पाहून ती म्हणाली ' " में कब से आपको देख रहि हु . आप इधर से रोज जाती है ना  !" आता आश्...

Shir Salamat To Pagadi Pachas !!!!

शीर सम्राट   !!!!        पु ण्यामध्ये नुकताच हेल्मेट सक्ती नावाच वादळ येऊ  घातले आहे . जुन्या इंग्लिश नाटक 'Hamlet ' मध्ये जगावं कि मरावं असा जो ज्वलंत प्रश्न गाजला  होता  त्याप्रमाणे  आता पुण्यात हेल्मेट घालाव कि न घालाव हा गाजत आहे. बहुतेक नुकत्याच गाजत असलेल्या ' नटसम्राट '  चा परिणाम असावा.  हि सक्ती जर खरोखरच यशस्वी झाली तर  ' शीर सम्राट ' नावच नवीनच नाटक पुण्यात निर्माण होऊ शकत. ज्याचा परिणाम पुण्यात सर्वत्र दिसून येईल. यामध्ये  हेल्मेट न घालणारे सर्व लोक  एका बाजूला आणि  घालणारे  अगदीच तुरळक  नगण्य !  एक बाजूला असे २ गट पडतील.  मधला गट  असणे  पुण्याच्या लौकिकाला साजेसे नाही.  कारण आमची मत  ठाम असतात.            हे नाटक  कोणत्याही  थेटर मध्ये न  दिसता पदपथावर दिसेल . हेल्मेट न  घालणारे लोक हे रस्त्यावर  आंदोलनकार्य  करतील. त्यांच्या  मते  पुणे...

Mitrancha Mitra tu la khas patra

मित्रांच्या प्रिय मित्रा  फेसबुक यांस , तू  नुकतच १२ व्या वर्षात पदार्पण केलस म्हणून तुला सप्रेम शुभेच्छा ! माझ हे आगंतुका सारख पत्र पाहून तुला आश्चर्य  वाटेल पण त्याच कारण वर सांगितलेले  आहेच. असो , तर तू खुप जणांना आवडतोस. अनेक जण तुझ्याद्वारे इतरांशी बोलतात. एकमेकांच्या संपर्कात येतात . तुझ्या इथे अकौंट ओपन केल रे केलं कि संपर्काला सुरवातच होते. मग  विनोद, प्रश्नोत्तरे , टीका टिप्पणी चालू होते . ह्याच्या  फोटोला  कॉमेंट्स कर , तिला लाईक कर, त्याच्या प्रश्नाला उत्तर दे , त्याचे मित्र किती, माझे किती ? कोण ? आता कुठे आहे ? काय करत आहे ? इ इ.  हे पाहण्यात वेळ छान  निघून जातो .   तरी मला  एक प्रश्न पडतो  तुझ नाव चाटिंग बुक / मिटींग बुक असे न ठेवता फेसबुक का  ठेवलं असावं ?  फेस म्हणजे चेहरा आणि  बुक म्हणजे पुस्तक . चेहऱ्यांच पुस्तक का पुस्तकी चेहरे ?? स्वतः  बद्दल ची  सर्व माहिती कुणीही न विचारता सांगणे आणि दुसऱ्याची हि जाणून घेणे हे...

ग्रंथ संवाद !

ग्रंथ संवाद !            काल म्हणजेच ३१ जानेवारीला २०१६ ला  निवारा सभागृहात ग्रंथ संवाद चा प्रकाशन सोहळा साजरा झाला. तो माझ्या आयुष्यातील पहिला वाहिला प्रकाशन सोहळा  होता. त्यामुळे नक्की काय काय असणार आहे ?  या बाबत मला प्रचंड उत्सुकता होती. डॉक्टर  न . म . जोशी आणि डॉक्टर अनिल अवचट यांना प्रत्यक्षात पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली. त्याबाबत संगीता कुलकर्णी यांचे आणि बापट सरांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला गोखले सरांमुळे मिळाली त्यामुळे त्यांचे हि आभार .          डॉक्टर अनिल अवचट यांनी  साहित्यात नव्याने शिरू पाहणाऱ्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे विपुल साहित्य वाचावे, जीवनात आलेले  अनुभव स्वताचे आणि इतरांचे ह्यानेच लेखनाला स्फूर्ती मिळते. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या जवळ देखील जीवन जगण्याची कला असते. त्यांचे आयुष्य अनुभव समृद्ध असते. साहित्य हे केवळ अनुभव व त्यामुळे आलेले शहाणपण व्...

Jatan Karu Ya Sanskrutichya Paul Khuna

जतन करू या संस्कृतीच्या पाउल खुणा  वाई म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव. अगदी वाहवा ! काय हि ईश्वरी लीला ! अस म्हणावं इतकं  छान. हे गाव दोन गोष्टींसाठी  खूप प्रसिद्ध आहे. एक म्हणजे निसर्ग सौंदर्य व दुसर म्हणजे तिथली प्राचीन देवालय . इथे आल्यावर अंतर्बाह्य सौंदर्याचा अनुभव आल्यासारखं वाटत. मनात विचार येतो, बाहेरील नैसर्गिक सौंदर्याचा प्रभाव मंदिरातील वातावरणावर, भाविकतेवर पडला आहे कि मंदिरातील पवित्रतेचा , शांततेचा प्रभाव इथल्या निसर्गावर पडला आहे. हिरवेगार , निळशार यांसारखे शब्द आपण इथे अनभवू शकतो . प्रमाणबद्धता, सुबकता, रेखीवता हे शब्द देखील मंदिराच्या, शिल्पाकृतीच्या कडे निरखून पाहताना अनुभवायला येतात. इतकी येथील मंदिरे सुंदर, रेखीव आहेत. पण खटकणारी गोष्ट मात्र अशी आहे की  या मंदिराची तेथील शिल्पकृतींची देखभाल , जपणूक  हवी तशी केली जात नाही. खरतर मंदिर म्हंटल की आपल्याकडे त्याबाबत वेगळ्या नजरेने पहिले जाते.  त्यात धार्मिकता व भावनिकता जोडली जाते. असे असतानाही ह्या मंदिरांची काही शिल्पे हि तुटलेली, भग्नावस्थेत तर काही नामशेष होण्...

Eka Prem Vedya Mushafirala Salam !! Salam!! Salam!!

एका प्रेमवेड्या मुशाफिराला                                   सलाम ! सलाम ! सलाम !        जीवनाचे गाणे आनंदाने गात गात मजेत जगावे असे सांगणारे आणि  प्रत्यक्षात स्वत : तसे जगणारे आपले लाडके कवी मंगेश पाडगावकर हे आता आपल्यात नाही हि खंत कायमच मनात राहणार आहे. तरी देखील त्याचं शब्दातून आपल्याशी संवाद साधण  हे चालूच राहणार आहे ते केवळ त्यांनी केलेल्या त्यांच्या अजरामर कवितां मुळेच.          एखादा कलाकार हा नेहमीच त्याच्या रसिकांशी  त्याच्या कलाकृतीद्वारे संवाद साधत असतो . त्याच्या मध्ये आणि आपल्या मध्ये नकळत एक ऋणानुबंध तयार होत असतो . आणि त्यासाठी प्रत्येकवेळी त्याच्याशी भेटण्याची च गरज आहे अस नसत. कवी मंगेश पाडगावकर यांच्या बाबतीत तसेच आहे. प्रत्यक्षात त्यांना कधी भेटण्याचा योग आला नाही तरीही त्यांच्या कवितां मधून ते नेहमीच  भेटत गेले.   लहानपणी "सांग सांग भोला नाथ पाउस पडेल काय ?" हे गाण म...