'यक्षनगरी'
credit- sahitysuchi magzine/rasik sahitya
'यक्षनगरी'
लेखक- श्रीपाद ब्रह्मे
लहानपणापासून आपल्याला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला आवडतात. मग त्या पुराणातल्या असोत किंवा गोष्टीच्या पुस्तकातल्या असोत किंवा आणखीन कुठल्या, त्या वाचताना आपण गुंग होऊन जातो हे मात्र खरंच. अशाच गुंग करणाऱ्या कहाण्या जेव्हा संगीत, वेगवेगळे स्पेशल इफेक्ट वापरून सिनेमाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर आपल्या समोर येतात, तेव्हा साहाजिकच त्या आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे सिनेमा या गोष्टीबद्दल आपल्याला खूप अप्रूप आहे. त्यातल्या नट, नट्या, दिग्दर्शक, गायक, गीतकार ह्या साऱ्यांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. अशा कहाण्या आपल्याला का आवडतात ? याचा विचार केला तर असं जाणवत की त्या कहाण्या आपल्या जीवनाशी एकतर मिळत्या जुळत्या असतात किंवा एका अद्भुत अनोख्या विश्वाची सफर आपल्याला घडवून आणणाऱ्या असतात.
लहानपणापासून आपल्याला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला आवडतात. मग त्या पुराणातल्या असोत किंवा गोष्टीच्या पुस्तकातल्या असोत किंवा आणखीन कुठल्या, त्या वाचताना आपण गुंग होऊन जातो हे मात्र खरंच. अशाच गुंग करणाऱ्या कहाण्या जेव्हा संगीत, वेगवेगळे स्पेशल इफेक्ट वापरून सिनेमाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर आपल्या समोर येतात, तेव्हा साहाजिकच त्या आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे सिनेमा या गोष्टीबद्दल आपल्याला खूप अप्रूप आहे. त्यातल्या नट, नट्या, दिग्दर्शक, गायक, गीतकार ह्या साऱ्यांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. अशा कहाण्या आपल्याला का आवडतात ? याचा विचार केला तर असं जाणवत की त्या कहाण्या आपल्या जीवनाशी एकतर मिळत्या जुळत्या असतात किंवा एका अद्भुत अनोख्या विश्वाची सफर आपल्याला घडवून आणणाऱ्या असतात.
जेव्हा केव्हा आपण अनोख्या ठिकाणी
फिरायला जातो तेव्हा आपल्याला एखादा मार्गदर्शक लागतोच. त्या ठिकाणची माहिती, त्यातील सौंदर्यस्थळे, महत्त्वाच्या गोष्टी, तिथे घडणाऱ्या हकिगती त्यानं आपल्याला सांगितल्या, की तो अनोखा प्रदेश एकदम आपल्या परिचयाचा वाटू लागतो. त्याच्याकडं आपण लक्षपूर्वक
आणि आस्थेनं पाहतो. त्यामुळे त्या स्थळाचा मनापासून आस्वाद घेता येतो. अगदी
त्याचप्रमाणं या यक्षनगरीची सफर श्रीपाद ब्रह्मे घडवून आणतात. आपल्याकडे दर शुक्रवारी नवनवीन चित्रपट येतात. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या
चित्रपटांमधले नेमके कोणते सिनेमे बघावेत, काय दृष्टीनं ते बघावेत, असे प्रश्न आपल्याला पडतात. त्याबाबत खूप छान मार्गदर्शन आपल्याला या 'यक्षनगरी'त मिळतं. अगदी
सिनेमा बघावा कसा यापासून ते या 'यक्षनगरी'ची जडणघडण कशी
झाली, कोणकोणते चित्रपट या काळात बनले, ते का बनले, त्या काळात सामाजिक परिस्थिती कशी होती, नट-नट्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता अशा सगळ्या हकिगती तर
आहेतच, शिवाय काही अजरामर झालेल्या चित्रपट तारे-तारकांचा व्यक्तिगत
परिचयही यात दिला आहे.
'यक्षनगरी'ची निर्मिती ची कहाणी सांगताना लेखक म्हणतात, 'युरोपियन औद्योगिक क्रांतीमुळे
तंत्रज्ञानाने झालेल्या बदलात सिनेमा नावाच्या
तंत्रज्ञानाधारित कलेचा जन्म झाला. त्यामुळं माणसाचं जगणं पहिल्यासारखं राहिलं नाही. ल्यूमिए बंधूंनी पॅरिसमध्ये १८९६ साली जगातला पहिला सिनेमा दाखवला.
त्यानंतर १९१३ साली दादासाहेब फाळके
यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट बनवून मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. यानंतर
बदल होत होत बोलपट, रंगीत चित्रं असं करता करता सिनेमानं भरपूर प्रगती केली आणि
अजूनही नवं नवं तंत्रज्ञान येत आहेच. चित्रपटाच्या बदलत जाणाऱ्या
यशापयशाच्या टप्प्यांचा एक आलेखच या नगरीद्वारे
आपल्याला पाहायला मिळतो.
सिनेसृष्टीनं म्हणजेच 'यक्षनगरी'नं आपलं वर्चस्व काळाच्या
ओघात कायम राखण्यासाठी जे काही व्रत अंगीकारलं आहे, त्यात काळाप्रमाणे कसे बदल केले आहेत ते लेखकानं सोदाहरण सांगितलं आहे. त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीची जाणीव
ठेवून, समाजमनाचा कल ओळखून चित्रपटांची निर्मिती
झाली, असं लेखकाचं सांगणं आहे. उदाहरणार्थ, 'बिनधास्त' या सिनेमानं मराठी सिनेमाकडे बघण्याची पारंपरिक दृष्टी बदलवून टाकली. या सिनेमात एकही महत्त्वाचं पुरुष पात्र
नव्हतं. ही मर्डर मिस्ट्री होती. यातील नायिका
महाविद्यालयीन मुली होत्या, त्या आधुनिक होत्या, 'तुझी नि माझी खुन्नस...' म्हणणाऱ्या, नवीन पेहराव, फॅशन करणाऱ्या होत्या, 'दोन मित्रांची मैत्री जशी अतूट राहते तशी
मैत्रिणींची का नाही राहत,' असं विचारणाऱ्या होत्या. त्या काळात आर्थिक सुधारणांमुळं शहरांत जे बदल घडत होते, त्याचं प्रतिबिंब या सिनेमात पडलं होतं.
तसंच 'सातच्या आत घरात' या चित्रपटाबाबतही घडलं. या दोन्ही
चित्रपटांनी तेव्हाची बदलती आर्थिक आणि
सामाजिक परिस्थिती अचूकपणे दाखविली. त्यामुळं या सिनेमांना लोकाश्रय मिळाला आणि मराठी सिनेमानं कात टाकली.
जसे चित्रपटाबाबत झालं, तसंच कलाकारांच्या आयुष्यातही या 'नगरी'नं खूप बदल घडविले. याच उत्तम उदाहरण म्हणजे राजा
गोसावी. चौथीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबईला मास्टर विनायक यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून त्यांनी काम केलं. पुढे
सुतारकाम, मेकअपमन, प्रकाशयोजना, नंतर एक्स्ट्रा नट म्हणून काम केलं. नंतर त्यांना 'लाखाची गोष्ट'मध्ये काम मिळून ते नायक म्हणून खऱ्या अर्थाने काम करू
लागले.
याचप्रमाणे सुपरस्टार अभिताभ बच्चन
यांच्या कारकिर्दीचाही आढावा घेण्यात आला
आहे. ज्या वेळेस अभिताभ बच्चन सिनेक्षेत्रात आले तेव्हाची परिस्थिती कशी होती, अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतला महत्त्वपूर्ण टप्पा कोणता ते विस्तारपूर्वक सांगितले आहे.
बच्चन यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा काळ म्हणजे सत्तरीच दशक हे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात नवनिर्माणाचं दशक म्हणून ओळखलं
जातं. त्या काळात देशाची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती चांगली सुखी, समाधानकारक म्हणावी अशी होती. महानगरातलं जीवन हे रसिलं असावं, असं दाखवणारे चित्रपट येत होते, त्यांना लोकप्रियता लाभत होती. परंतु १९७२ च्या दुष्काळाच्या
तडाख्यानंतर मात्र देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीला
वेगळीच कलाटणी मिळाली. एक असंतोषाचं, उद्वेगाचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा त्या परिस्थितीला
पोषक अशा 'अँग्री यंग मॅन'चा उदय होणं, हे अपरिहार्यच होतं. प्रत्यक्षात जरी
नाही, तरी चित्रपट क्षेत्रात का होईना, असा अन्यायाविरुद्ध लढणारा, आत्मविश्वास असणारा, गुंडांना शासन करणारा नायक प्रेक्षकांना
हवाच होता. अमिताभनं तो संतप्त तरुण नायक साकारल्यानं चित्रपटाच्या पडद्यावर तो यशस्वी ठरला. या साऱ्या कारकिर्दीत अमिताभ यांचा कसलेला अभिनय
आणि देशातील स्थिती या साऱ्याचा परिणाम चित्रपट क्षेत्रावर झाला. याचप्रमाणे बदलणाऱ्या काळात निरनिराळे चेहरे आपल्या उत्तुंग अभिनयाने या 'यक्षनगरी'त चमकू लागले, त्यापैकी हिंदीतील अनिल कपूर, माधुरी दीक्षित, तर मराठीतील निळू फुले यांच्या कारकिर्दीचा आढावाही यात घेतला आहे.
'यक्षनगरी' ही अशी नगरी आहे, की जिथे तुमच्या कलागुणांची कदर केली जाते. अल्पावधीतच तुम्ही
कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकता. समाजात तुमची एक प्रतिमा तयार होते. तुम्ही इथे किती काळ काम करता, हे केवळ महत्त्वाचे ठरत नाही, तर तुम्ही काय दर्जाचे काम करता त्याला महत्त्व मिळते. त्यामुळे काही काळ काम करून
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार जे आजही
या 'नगरी'त असते, तर त्यांनी प्रेक्षकांना आनंद दिला असता, अशा अकाली निघून जाणाऱ्या कलाकारांच्या कारकिर्दीचाही वेध या पुस्तकात घेण्याचा प्रयत्न
केला आहे. त्यात मधुबाला, गुरुदत्त, मीनाकुमारी, संजीवकुमार, स्मिता पाटील यांचा समावेश आहे.
तसेच या पुस्तकाची आणखीनही वैशिष्ट्य सांगता येतील की, यातील सर्वच शीर्षके ही वेगवेगळी आणि
आकर्षक आहेत. शिवाय हे पुस्तक श्रीपाद ब्रह्मे
यांनी चक्क सिटी प्राईड आणि प्रभात चित्रपटगृह यांना अर्पण केले आहे. याचे मुखपृष्ठ ही बोलके आहे, सोनेरी बॅकग्राऊंड म्हणजे जणू तेजस्वी, चमचमती सोनेरी दुनिया, व्हिडिओ शूटिंग चा कॅमेरा चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्व करतो. हाताने लिहिल्या प्रमाणे यक्षनगरी ही जाड स्वरूपातली लांब दांड्यांची
अक्षरे जणू काही यक्षनगरी चा उंचावलेला स्तर दाखवतात. त्यातील अक्षरांच्या गाठी मध्ये भरलेले रंग हे विषय वॆविध्य दाखवतात नगरी या शब्दाखाली असलेले रंगीबेरंगी
चौकोन म्हणजे तांत्रिक दृष्ट्या झालेले बदल दाखवतात.
समदा प्रकाशनाने अतिशय उत्तम मांडणी केलेले हे पुस्तक सर्व सिनेप्रेमी लोकांना नक्कीच आवडेल असे आहे. आणि चित्रपटक्षेत्र हे केवळ मनोरंजाचे साधन नसून ते बदलत्या काळाचे, सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब असते, ह्याची पुरेशी जाण आपल्याला करून देण्यात यशस्वी ठरलेले आहे.
वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
http://rasiksahitya.com/#/home
Comments
Post a Comment