' आय हॅव अँन आयडिया ! '


                                                                     credit- sahitysuchi magzine/rasik sahitya
' आय हॅव  अँन आयडिया ! '  
 (पराग गोरे)
लहानपणी आपण एक गोष्ट वाचलेली आठवते का ? कावळ्याला लागलेली तहान !! एक तहानलेला कावळा जंगलात पाण्याच्या शोधात वणवण भटकतो पण कुठेच पाणी मिळत नाही, नंतर एका  मोठया रांजणाकडे त्याच लक्ष जात त्यात अगदी खोल त्याच्या तळ्याशी पाणी असतं. ते कसं प्यावं ? हा प्रश्न त्याला पडतो आणि मग त्यालाच युक्ती सुचते तो जंगलातले खडे गोळा करून टाकतो हळू हळू पाणी वर येत आणि मग तो ते पाणी पितो. ही गोष्ट आठवण्याचं कारण  नुकतेच वाचण्यात आलेले , पराग गोरे यांनी बिझनेस मंत्रा तर्फे संपादन केलले  ' आय हॅव  अँन आयडिया ! '  हे पुस्तक.

लहानपणी शिकवण्यात आलेल्या गोष्टींचं महत्व आपण मोठे होतो तसं कमी कमी होत जातं. खरतरं या सारख्या गोष्टी आपल्यात काही मूल्य, काही नियम यांची जाणीव करून देण्यासाठी शिकवलेल्या असतात. मला वाटतं व्यवसाय यशस्वी करण्यासाठी या गोष्टींचं तात्पर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि तेच या पुस्तकातुन पुन्हा पुन्हा मांडण्यात आल आहे.

या पुस्तकात अशा अनेक यशस्वी उद्योजकांची यशोगाथा आपल्याला वाचायला मिळते. त्यांचे अनुभव, त्यांचे विचार, कल्पना  वाचायला मिळतात. थोडक्यात काय तर आपली वणवण कमी करण्यास आणि योग्य ते खडे सापडवण्यास हे पुस्तक मदत करू शकेल हे नक्की.   

या पुस्तकात एकोणतीस उद्योजकांचा सहभाग आहे. त्यात जाहिरात तज्ञ,  लेखक, व्यवस्थापनविषयक सल्लागार, सीए, वकील यांचा समावेश आहे तसेच चितळे बंधू, देसाई आंबेवाले, मनोहर सुगंधी, गणेश भेळ, रसिक साहित्यघरपोच वैद्यकी सेवा देणारे, अशा वेगवेगळ्या उद्योजकांनी वर्णी लावली आहे. त्यांची व्यवसायामागची प्रेरणा, त्याच्यासाठी वापरलेल्या योजना या बाबत सविस्तर माहिती मिळते. 
पुस्तकाचे दोन भाग आहेत त्यात पैकी पहिल्या भागात यशस्वीतेसाठीचे व्यवस्थापन, गुणवत्ता, विक्री, विपणन, ग्राहकांचे समाधान, नवनिर्मिती, व्यवसायातल्या होणाऱ्या चुका, बॅलन्स शीटच महत्व, विक्री पश्चात सेवा,  सोशल मीडियाचा वापर, जाहिराती, शासकीय योजना, ब्रँडिंग, प्रमोशन , मूलभूत कौशल्य- गुण, व्यावसायिकाचे आरोग्य  इत्यादी गोष्टींचा उहापोह केला आहे. 

जसे उदारहणादाखल प्रकाश बंग जे जाहिरात तज्ञ्  व विपणन व्यावसायिक आहेत, त्यांनी त्यांचा मोलाचा सल्ला दिला आहे.  आपली खासियत शोधा. सर्वांसाठी सर्व काही बनण्यापेक्षा कोणासाठी तरी काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा. स्त्री - पुरुष, तरुण, मध्यमवयीन, भारतीय, पाश्चिमात्य असे वर्गीकरण करून खासियत शोधली पाहिजे. त्याचे बरेच फायदे आहेत. जरी आसपास मॅकडोनाल्ड असले तरी जोशी वडेवाल्यांच्या व्यवसायात काहीच फरक पडणार नाही. कारण ते फक्त तोंडाला पाणी सुटेल असे वडे तळत असतात. पण त्यांनी अँपल पाय आणि नगेट विकायचे ठरवले तर मात्र त्यांना मुश्किल होईल.

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
 http://rasiksahitya.com/#/home

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज