एका सेलिब्रेटी डेंटिस्टची बत्तीशी

                                                                                                      credit- sahitysuchi magzine/ rasik sahitya 

एका सेलिब्रेटी डेंटिस्टची बत्तीशी 
(डॉ. संदेश मयेकर, रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठ्ये- २७२, मुल्य – २००)
  
“दात आहे तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत” अशी म्हण आपण सगळे सर्रास वापरतो. लाक्षणिक अर्थाने इथे विचार केला असता ही म्हण डॉ. संदेश मयेकर यांच्या एका सेलिब्रेटी डेनटीस्टची बत्तीशी या पुस्तकाला लागू पडते. कारण दातांचे महत्व देखील आपल्याला त्यांच्या समस्येनंतरच कळते. चंदेरी दुनियेतील कलाकार, बडे बडे उद्योगपती, खेळाडू, मिस वर्ल्ड वैगरेंच्या दातांना सौदर्य देणारे, त्यांच्या चेहऱ्यावर मोहक हसू खेळवणारे डॉ. मयेकर केवळ दंत चिकित्सक नसून ते दातांचे शिल्पकार आहेत असे म्हणावेसे वाटते. 

या निष्णात शिल्पकाराच्या अनुभवातील 'दंत'कथांचा आस्वाद इथे घेता येतो. आस्वाद अशासाठी की भल्याभल्यांना घाबरवणारे दाताचे निरनिराळे आजार आणि त्याचे उपचार यांचे नेमके स्वरूप कसे असते ते आपल्याला हसतखेळत समजते. यात केवळ दातांच्या निरनिराळ्या समस्यांचे निराकरण, दाताची निगा राखण्याबाबत सूचना, अशी औपचारिक भाषा नसून दात आणि आपले शारीरिक मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्व यांचे परस्परावलंबीत्व एका मित्रत्वाच्या नात्याने सांगितले आहे. 

चेहऱ्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या, आपले हसू खुलवणाऱ्या, अन्नपचनास सहाय्य करणाऱ्या दातांची अंतर्बाह्य रचना आपल्याला समजते. निरनिराळे आजार, औषधे, आपल्या चित्रविचित्र सवयी जसे नखे कुरतडणे, अंगठा चोखणे, तंबाखू खाणे या साऱ्यांचा दातांवर, हिरड्यांवर होणारे दुष्परिणाम समजतात. दंत चिकित्सक आणि त्याचा रुग्ण यातील नाते कसे असावे? दातांच्या समस्यांबद्दल लोकांच्या मनातील भीती कशी नाहीशी करावी ? वेळच्यावेळी केलेल्या उपचारांनी दातांचे आरोग्य सुधारण्यास कशी मदत होते ? रूट कानाल, इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय ? वार्ध्यक, तारुण्य आणि बाल्यावास्थेतील निरनिराळ्या दातांच्या समस्या आणि त्याचे उपाय याबाबतही माहिती कळते. 

दातांच्या या कथाव्यथा ऐकताना डॉ. मयेकर यांच्या व्यक्तिमत्वाचाही व्यवसायाप्रती, माणुसकीप्रती असलेली बांधिलकी, निष्ठा यांचा परिचय आपल्याला होत जातो. दंत चिकित्सेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर  असणारे हे पुस्तक दाताच्या समस्येला घाबरणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आश्वासक हसू फुलवण्यात यशस्वी ठरेल यात शंका नाही.     

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध 
 http://rasiksahitya.com/#/home
    

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज