'खिडक्या अर्ध्या उघड्या'
'खिडक्या अर्ध्या उघड्या'
(गणेश मतकरी )
तर दिसतं असं की उंची वरच्या माणसांनाही दरीची खोली
भिववतेच. कारण स्वतःच्या
जगण्याचा ते केंद्रबिंदू झालेले असतात. निसर्ग नियमाप्रमाणे जेव्हा
चढ येतो तेव्हा उतारही असतोच मात्र याची
जाणीव होईस्तोवर बऱ्याचदा उशीर झालेला
असतो. म्हणजे घडतं असं की माणसं आपल्या जगण्यातुन
स्वतःच स्वतःसाठी समस्या निर्माण करतात आणि त्यात अधिकाधिक अडकत जातात. गणेश
मतकरींच्या
'खिडक्या अर्ध्या उघड्या' या कादंबरी वजा कथासंग्रहातून ही गोष्ट
प्रकर्षानं जाणवते.
या कथांमधल्या व्यक्तिरेखा या उच्चभ्रु समाजातल्या आहेत.
रोजच्या रोजोरोटीच्या, जातिभेदाच्या समस्या त्यांच्या आयुष्यावर
फारशा परिणाम करू शकत नाहीत. मात्र वरती म्हणल्या प्रमाणे आपल्याच जगण्याच्या
उंचीचचं आता त्यांना भय वाटू लागलं आहे. ही उंची काही कायम राहू शकणार नाही याची
जाणीव झाल्यावर त्या या उंचीच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना
जगण्यासाठी केवळ उंचीच आवश्यक नसून खोली ही तितकीच आवश्यक आहे हे त्यांना जाणवू
लागतं.
मग अर्ध्या का होईना उघड्या खिडकीतून
आपल्यापेक्षा वेगळ बाहेरचं जग पाहू लागतात आणि समस्यांच्या मुळाशी पोहोचतात.
त्यावेळीस त्यांना उमगलेलं सत्य म्हणजे त्यांचा संघर्ष कुणा बाहेरच्या व्यक्तींशी
नसून त्यांच्या 'स्व' शी आहे. या अस्सल जाणीवे नंतरचा त्यांचा वैचारिक प्रवास फारच महत्त्वाचा
आहे. वाचक म्हणून आपल्यालाही विचारप्रवृत्त करणारा... तो अनुभवण्यासाठी आपणही या
उघड्या खिडकीतून एकदा डोकवायला हवं.
http://rasiksahitya.com/#/home
Comments
Post a Comment