उदरस्थ पुरस्कार मनोगत
उदरस्थ पुरस्कार मनोगत
पहिल्यावहिल्या गोष्टीची मजाच काही और असते. तिचं
अप्रुपच असतं... जरी ती थोडी कच्चीपक्की असली तरी. कारण तिच्यातनं आपण शिकत असतो, आनंद
घेत असतो. त्यात ती गोष्ट जर तज्ज्ञ व्यक्तीकडून आणि संस्थेकडून प्रशंसेला पात्र ठरली तर मनात कितीतरी भावना दाटून
येतात.
उदरस्थला पुरस्कार मिळाला तेव्हा कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. हे माझं पहिलंच पुस्तक ज्याच्यासाठी मी संपादन साहाय्य केलं. त्यामुळं त्याचं अप्रुप वाटणं साहजिकच पण ते इतकंच मर्यादित नाही बरं का !
एखाद्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला की लेखकाला होणारा आनंद, त्याची उल्लसीत भावना जशी तीव्र असते तशीच त्या पुस्तकाचे प्रकाशक, संपादक आणि त्यांचे संबंधित सहकारी या सर्वांचीही असते. कारण ते पुस्तक सर्वांच्या सहकार्यातून, प्रयत्नांतून उभं राहत असतं.
पुस्तक तयार करताना सर्वच जण एकदिलानं काम करत असतात. एखादं मंगलकार्य जसं अनेकांच्या सहभागानं उत्तमरीत्या पार पडतं तसंच पुस्तकाच्या बाबतीतही घडतं. कार्य उरकल्यावर कशी एक शांतता असते आणि मग त्या वेळी या कार्यातल्या गमतीजमती, अडीअडचणीचे काही प्रसंग आपल्याला आठवत राहतात; तसंच काहीसं पुस्तकाच्या प्रकाशनानंतरही होतं. जेव्हा एखाद्या पुस्तकाची योग्य प्रकारे दखल घेतली जाते तेव्हा होणारा आनंद तर अवर्णनीय असाच असतो. हाच आनंद ‘उदरस्थ’नं आम्हाला दिला.
खरंतर खाद्यपदार्थांची अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय इंटरनेट, व्हॉट्सॅप, निरनिराळी नियतकालिकं, टीव्हीवरचे कार्यक्रम या सगळ्यांतून आपल्यावर सूचनांचा मारा सतत होत असतो. अगदी जाहिरातीतलं एखादं शेंबडं पोरसुद्धा टाॅनिकचं, एनर्जी ड्रिंकचं आणि आणखीन कशाकशाचं महत्त्व आपल्याला सांगत असतं. अशा सततच्या मारा केल्या जाणाऱ्या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणं, तशी संपादकीय दृष्टी ठेवून ती लेखकाला समजावणं, त्या प्रकारे विषयाचं लेखन करवून घेणं, त्यावर पुन्हापुन्हा संपादकीय संस्कार करणं, सगळे संदर्भ तपासून घेणं, आर्टिस्ट, प्रुफरीडर, प्रिंटर या साऱ्याची मोट बांधणं अशी एक-ना-अनेक कामं संपादन मंडळ करत असतं.
प्रकाशकाचंही तसंच... मार्केटचा अंदाज घेऊन पुस्तकाची पूर्वप्रसिद्धी करणं, उत्तम वितरण व्यवस्था वापरणं, वितरण व्यवस्थेचा प्रभावी उपयोग करून पुस्तक वाचकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं, विषयाचा विचार करून प्रकाशन सोहळा आयोजित करणं, पार पाडणं हे कष्ट असतातच. या साऱ्याचं फलित म्हणजे हे यश असतं. ते मिळालं की होणारा आनंद म्हणूनच विशेष....

उदरस्थसाठी रसिकच्या संपूर्ण टीमनं मनापासून काम केलं
आणि अजूनही करत आहेत. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन!
लेखिका वैद्य रूपाली पानसे; प्रकाशक शैलेश नांदुरकर; संपादक योगेश नांदुरकर; मुद्रितशोधक आरती देवगांवकर, सुनीला गोंधळेकर; अक्षरजुळणीकार सायली जोशी; मुखपृष्ठकार आणि मांडणीकार अक्षय कुलकर्णी; सुलेखनकार बी. जी. लिमये; प्रस्तावना लिहून देणाऱ्या डॉ. ऋता कुलकर्णी, मुद्रक अमोल असोसिएट्स; पूर्वप्रसिद्धीची जबाबदारी पार पाडणारे स्वानंद जावडेकर; पोस्टर्स करणारे आशुतोष तांबेकर; प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे विष्णू मनोहर तसेच उपस्थित प्रेक्षक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

Comments
Post a Comment