'वय'

'वय' 
बालगंधर्व कलादालनात वय हे चित्र पाहिल्यावर मनात सर्वात पहिलं काय आलं असेल तर पझल. चित्राचे भाग योग्य त्या ठिकाणी आणून चित्र पूर्ण करा असा जो एक पझलचा प्रकार असतो त्याची मला आठवण झाली. हे चित्र ब्लॅक ऍण्ड व्हाईट मध्ये आहे. एकाच व्यक्तीचा चेहरा वेगेवेगळ्या वयात कसा दिसेल हे यातून दिसतं. तसच वेगवेगळ्या व्यक्ती एक ठराविक काळात आल्यावर कशा एक सारख्या दिसू शकतील असंहि वाटतं. तारुण्याला वेगवेगळी रुपं असतात पण वार्ध्यक्याचं रूप मात्र एकसारखंच असतं ब्लॅक ऍण्ड व्हाईट हेही हे चित्र दाखवतं.
वेगवेगळ्या तुकड्यातुन हे जे वयाचे टप्पे दाखवले आहेत. ते आपल्या आयुष्यातील त्यात्या काळातील आपल्या शरीर  आणि मनावर उमटणारे पडसाद तर दर्शवतातच शिवाय  त्या त्या काळाची लांबीरुंदी देखील. या साऱ्यातून निवृत्त होत चाललेलं आपलं वय आणि मनही दिसू लागतं.

पानगळीत जसं पान अन पान गळून पडणाऱ्या झाडाकडे पाहून आपल्याला त्याचं पूर्वीच बहरलेपण आठवतं तसंच काहीसं या चित्रातूनही  जाणवतं. हळूहळू आपल्या शरीरातील क्षमता कशा कमी कमी होत जातात. पाहण्याची क्षमता, ऐकण्याची, आठवण्याची त्याची जाणीव हे चित्र करून देतं. शिवाय वयाचा परिणाम मनावर होतो आणि मनाचाही वयावर. त्यामुळं ठराविक वयाचा आणि अनुभवाचा परिणाम शरीराच्या ठराविक भागांवर विशिष्ट पद्धतीनं होत असतो. निसर्गाचा कुंचला व्यक्तीच्या वयावर वेगवेगळे ऋतू उमटवत असतो हे मात्र खरं. या चित्रात हे ऋतूही सुंदर दिसतात.           

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज