लायब्ररी फ्रेंड
|
लायब्ररी फ्रेंड
(सागर कळसाईत)
लायब्ररी
फ्रेंड म्हणजे भूतकाळातील कॉलेज जीवनाची अनुभूती आहे. सागर कळसाईत या
युवा लेखकाची ही अल्पावधीतच प्रसिद्ध होणारी दुसरी कादंबरी आहे.
कॉलेज संपवून बाहेर पडलेल्या 'मानव' नावाच्या एक संवेदनशील युवकाची कॉलेज
जीवनावर पुस्तक काढण्याची धडपड यात सांगितली आहे. एमबीए झालेला हा तरुण
कॉलेज संपल्यानंतर देखील तिथल्या वातावरणाला विसरू शकत नाही. होस्टेलचे
जीवन, कॉलेज, कॅन्टीन आणि लायब्ररी ही ठिकाणे,
त्याचे दुरावलेले जिवलग मित्र , त्यांच्या आठवणी या साऱ्या ओढीने तो पुन्हा
कॉलेजकडे वळतो. वास्तवाच्या दुनियादारीत पाऊल टाकण्यापूर्वी काहीतरी वेगळी
धडपड त्याला करावीशी वाटते. आपल्या आयुष्यातल्या अत्यंत सुंदर क्षण
देणाऱ्या, हव्या हव्याश्या वाटणाऱ्या कॉलेज जीवनावर पुस्तक काढण्याच
स्वप्न तो उराशी बाळगतो. यासाठी त्याला हवी असते ते त्याच्या कॉलेज मधील
जिवलग मित्रांची साथ. हे दुरावलेले मित्र पुन्हा एकत्र आणण्यासाठी तो खूप
काही युक्त्या करतो, व्यवसाय चालू करतो.
त्यात एक पाठोपाठ एक अपयश मिळत गेल्यावर पुन्हा दुरावणाऱ्या मित्रांना
एकत्र करण्याच्या प्रयत्न करतो यात त्याला असंख्य अडथळे येतात. त्याच्या
पुस्तकाचं स्वप्न अधुरं राहणार अशी परिस्थिती निर्माण होते. असे अनेक
निराशेचे क्षण आल्याने तो पूर्णतः खचतो आणि हे स्वप्न सोडून द्याव असा
विचार करतो. परंतु
उम्मीदों से बंधा एक जिद्दी परिंदा है इन्सान
घायाळ भी उम्मीदों से है ,
जिंदा
भी उम्मीदों पर है ! या शेर नुसार परत उभं राहून परिस्थीतीशी दोन हात
करण्याची त्याची इच्छा बळावते आणि परत त्याचा नव्या उमेदीने संघर्ष चालू
होतो. त्या संघर्षच अखेर विजयात रूपांतर होत का नाही ते जाणण्यासाठी ही
कादंबरी वाचली पाहिजे.
सागर
हा युवा लेखक असल्यामुळे ह्यातील भाषेवर महाविद्यालयातील बोली भाषेचा
प्रभाव पडलेला जाणवतो, आणि ती जशीच्या तशी वापरल्यानेच जसे झप्पी देणे,
लाईक करणे, मित्रांचा उल्लेख शॉर्टकटने करणे, त्यांचा सत्कार करणे
मुलींसाठी दोस्तीत कुस्ती नाय अशी वाक्ये या साऱ्याने कादंबरीला जिवंतपणा
प्राप्त झाला आहे. कथेतील
मूळ नायक हा जरी मानव असला तरी ही कथा कॉलेज मधील अनेक इतर घडामोडींचे
दर्शन ही करवते. रूमवर राहणाऱ्या मुलांची जीवन शैली, फ्रेंड्स फॅमिली असे
रूम चे नाव, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, पार्ट टाइम
मार्केटिंग चे जॉब ,जास्त पैशाचे आमिष दाखून घडणारे सायबर गुन्हे,
महाविद्यालयातील प्रेमप्रकरणे,
त्याला होणारा जातीचा अडथळा, घरच्यांचा विरोध, अशावेळी मित्रांनी एकमेकांना
समजून घेऊन केलेली मदत अशा अनेक घटना आपल्याला वाचायला मिळतात. मैत्रीचं,
विश्वासाचं एक अनोखं जग यातून जाणवत. कथेमधली ही सर्वपात्र कॉलेज जीवनात
आपण आजूबाजूला पाहिलेली असल्याने ती जास्त जवळची वाटतात.
या पुस्तकाचे महत्वाचे वैशिट्य म्हणजे लायब्ररीचा कथा लेखनासाठी केलेला वापर. अलीकडे
ग्रंथालय हा तसा महाविद्यालयातील उपेक्षीत भाग आहे. परीक्षेचा काळ वगळता
याचे महत्व सहसा आढळत नाही पण सागरने त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने
केला आहे. लायब्ररी मधील न पाळले जाणारे नियम, तिथला खडूस ग्रंथपाल, तिथला
काटेकोरपणा , शिस्त , शांतता , वेळेचे बंधन , आणि मुख्यत्वे तिथले
त्याचे अव्यक्त प्रेम जे त्याच्या आयुष्याला अप्रत्यक्षरित्या दिशा दर्शक
ठरते तेही यातून जाणवते.
एकंदरीत प्रेम, कुटुंब आणि स्वप्न यांचा ताळमेळ घालतानाची आजच्या युवा पिढीची होणारी तारांबळ, जिद्द यातून सखोल जाणवते.
वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
http://rasiksahitya.com/#/home
वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
http://rasiksahitya.com/#/home
Comments
Post a Comment