ऑपेराच्या गोष्टी
credit - sahitysuchi magzine / rasik sahitya
ऑपेराच्या गोष्टी
(अनुवाद : श्रीकृष्ण पंडित)
संगीत
नाटक हा जसा महाराष्ट्रातील शे-दीडशे वर्षार्ंपासूनचा प्रचलित लोकप्रिय
कलाप्रकार आहे. तद्वतच ‘ऑपेरा’ हा पाश्चिमात्य देशातील शंभर वर्षांपासून
चालत आलेला लोकप्रिय कलाप्रकार आहे. या कलाप्रकाराची सुरुवात इटलीमध्ये
झाली आणि त्यानंतर इंग्लंड, जर्मन, फ्रान्स इ. देशांत तो हळूहळू पसरत गेला
आणि लोकप्रिय झाला. या कलाप्रकाराचे वैशिष्टय म्हणजे यातील निवेदन आणि
संवाद हे दोन्हीही पद्य रूपात सादर केले जातात. यात नाट्य, काव्य, संगीत,
नृत्य, निवेदन अशा सर्वच कलाप्रकारांचा समावेश असतो. भव्य आकाराचे आणि
प्रसंगी हलू शकणारे स्टेज, स्टेजवरची आर्कषक सजावट, उत्कृष्ट नेपथ्य,
उत्तमोत्तम पोशाख आणि मेकअप या सार्याने या कलाप्रकाराची दृश्यात्मकता
अधिक परिणामकारक ठरून तो लक्षवेधी ठरतो.
या
पुस्तकात समाविष्ट असलेल्या तीनही कलाकृती 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात
प्रथमच रंगभूमीवर सादर केल्या गेल्या आणि त्यांनी लोकप्रियतेचा इतका
उच्चांक गाठला की, ही लोकप्रियता आजही टिकून राहिली आहे. मुळातच कादंबरीका
म्हणून लिहिल्या गेलेेल्या या कलाकृतींच्या आधारावरच नंतर त्यांचे ऑपेरा व
बॅलेमध्ये रुपांतर झाले आहे. या तीनही कथा अतिशय उत्तम आहेत.
यातील
ट्रिस्टन-इसोल्डा या कादंबरीचा मूळ लेखक गॉटफ्रीड या जर्मन लेखकाने मूळ
पद्यरूपात लिहिलेल्या रचनेवरुन प्रसिद्ध जर्मन संगीत रचनाकार रिर्चड वाग्नर
याने ढीळीींरप र्ीपव खीेश्रवश या संगीतिकेची संहिता रचली आणि संगीतबद्ध
केली. उत्कट प्रेम पण दुर्दैवी शोकांत असलेली ही कथा वाग्नरच्या
स्वानुभवावर आधारित आहे असे त्याने म्हटले आहे. ही कथा वाचकाला एक
प्रकारच्या विषण्णतेचा अनुभव देते. असे असले तरीही उत्कट प्रेम काय असते?
प्रेमाची परिपुर्ती म्हणजे काय? ती न झाल्यास प्रेमिकांची होणारी तडफड या
सार्याची जाणीवही करुन देते. प्रेमिकांच्या विरहातील मृत्यूनंतर त्यांचे
परलोकी होणारे मिलन असे याच्या शेवटाचे स्वरूप दर्शविले असले तरीही मूळ
कथेच्या गांभीर्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. ‘सुंदर सुवासिक फुले
कुस्करुन त्यापासून बनविलेले अत्तर’ अशी उपमा या कथेला देता येईल. यात काही
गोष्टी मात्र जादुई आणि खूपच काल्पनिक वाटतात जसे विशिष्ट प्रकारचे पेय
प्यायल्याने पती-पत्नी मधील प्रेमसंबंध वाढतात आणि चिरकाल टिकतात. किंवा
सोनेरी घंटा असलेल्या कुत्र्याच्या गळ्यातील घंटानादाने मनुष्य तणाव, दु:ख
विसरतो. तरीही या कथेला वेगळे वळण देण्यासाठी याच गोष्टींचा आधार घेतला
आहे.
‘तीन टोकी हॅटची कथा’ या कादंबरीचा मूळ लेखक
स्पॅनिश असून पेद्रो अन्तोनीओ दि अलार्कोन इ अरीझा हे त्याचे नाव आहे.
हूगो वोल्फ या ऑस्ट्रियन संगीतकाराने या कादंबरिकेवरुन ‘डेर कॉर्रेगिडोर’
ही चार अंकी संगीतिका लिहिली. गव्हर्नरसाहेब आणि चक्कीवाल्याची बायको असे
तिचे मूळ नाव आहे. परंतु प्रस्तुत पुस्तकात ‘तीन टोकी हॅटची कथा’ हे
भारदस्त नाव दिले आहे. ही कथा वाचताना यातील काही परभाषिक संदर्भ जसे
पेहराव, चालीरीती इ. सोडल्यास आपल्याच भागात एखाद्या खेडेगावात घडणारी कथा
असावी इतके साधर्म्य वाटते. मराठी नावावरुन या कथेचा आशय समजणे सोपे जाते.
यातील सर्व पात्रांचे वर्तवणुकीवरुन जाणवते की, स्त्री-पुरुष संबंध,
स्त्रीला असणारे दुय्यमत्त्व, सामाजिक मानसिकता ह्यात आजपावेतो फार काही
बदल झालेला नाही. धर्म, अंधश्रद्धा, हुजरेगिरी, गॉसिप, दुसर्याच्या
गोष्टीत नाक खुपसणे अशा मूलभूत प्रवृत्ती इथेही जाणवतात. मात्र
मनोरंजनात्मक पातळीवर ही कथा आपल्याला भरपूर समाधान देते. अनुवादातही कथेचा
खुसखुशीतपणा, संवादातील चटकदारपणा आणण्यात अनुवादकर्त्याला यश आले आहे.
कथेचा शेवट सर्वमान्य असा गोड गोड झाला आहे.
यानंतरची
तिसरी आणि शेवटची कथा म्हणजे ‘कारमेन’ ही होय. ही मूळ कथा फ्रेंच
इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ता, नाटककार व कथालेखक प्रॉस्पर मेरिमी याने
लिहिली आहे. स्पेनमध्ये काउंटेस मारीया मॅन्युएलाची तिसरी, धाकटी मुलगी
युजेनी जिचा विवाह तिसर्या नेपोलियनशी झाला होता. ती फ्रान्सची सम्राज्ञी
होती. तिच्याकडून या कथेचे बीज मेरिमीला मिळाले असे म्हणतात आणि या कथेला
लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय जातं ते या कथेचं रूपांतर ऑपेरामध्ये
करणार्या फ्रेंच संगीतकार बिझे यांना. मुळात कारमेनची कथा ही प्रस्थापित
मूल्यांविरूद्ध जाणारी कथा आहे. जिप्सी या भटक्या व बंधनमुक्त जीवन
जगणार्या लोकांवर आधारित अशी ही कथा आहे. ही कथा सर्वसामान्य वाचकाला पचनी
पडेल अशी नाही. या कथेचा शेवटही दुख:द आहे. या कथेचे मला जाणवलेले
वैशिष्ट्य म्हणजे यात एक प्रकारचा वेग जाणवतो. आशय देखील वेगळा असल्याने,
गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जोश, मारामारी, तस्करी अशा वेगवान घटना
यात आहेत. या पात्रांची जीवनशैली ही सर्वसामान्यांपेक्षा खूपच निराळी आहे.
इथे मानवी मूल्ये झाकोळली गेली आहेत असे जाणवते. कारमेन या मुलीचे मुक्त,
स्वच्छंद व्यक्तिमत्व, आचार विचार, डॉन होसे याचा सुरुवातीचा मानवी
मूल्यांचा आदर करणारा साधा भोळा स्वभाव व पुढे कारमेन त्याच्या आयुष्यात
आल्यावर बदलून जाणारा स्वभाव आपल्याला अस्वस्थ करतो. कारमेन ही स्त्री
व्यक्तीरेखा नकारात्मक दाखवून आणि होसे ही पुरुष व्यक्तीरेखा सकारात्मक
दाखवून स्त्री आणि पुरुष यांच्या सामाजिक चौकटीला जबरदस्त तडा देण्याचं काम
ही कथा करते.
या तीनही कथा वाचल्यानंतर जाणवते
की, देश पुढारलेला किंवा मागासलेला कोणताही असो गूढ-अनाकलनीय गोष्टींचे
आकर्षण, तसेच स्त्री-पुरुष संबंध, श्रद्धा-अंधश्रद्धा या गोष्टींचा पगडा
जनमानसावर सारख्याच प्रमाणात जाणवतो. या तीनही कथांची निवड आणि क्रम ही
वाचकांची मानसिकता लक्षात घेऊन केली आहे. आणि अनुवाद शैलीतही मूळ
लेखकांप्रमाणे वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. ऑपेरा या संगीत
प्रकाराची ओळख निर्माण करण्यात आणि औत्सुक्य वाढवण्यात हे पुस्तक यशस्वी
ठरेल यात मात्र शंका नाही.
वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
http://rasiksahitya.com/#/home
वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
http://rasiksahitya.com/#/home
Comments
Post a Comment