रेल्वेची रंजक सफर

                                                          credit - sahityasuchi magzine/rasik sahitya 
 
रेल्वेची रंजक सफर
(डॉ. अविनाश वैद्य, मनोविकास प्रकाशन,*पृ. २१०, मुल्य २३०/-)

मानवी आयुष्यात प्रवासाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण तो एक उत्क्रांती घडवतो त्याने आयुष्य प्रवाही राहत. अशाच एका यांत्रिक उत्क्रांती ठरणाऱ्या "रेल्वेची रंजक सफर" हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाचे पुस्तक डॉ. अविनाश वैद्य यांनी लिहिले आहे.  

या पुस्तकाने रेल्वे म्हणजे केवळ वाफेच्या इंजिनावर चालणारी आणि रुळांवरून धावणारी एक गाडी हा दृष्टिकोन मोडीत काढला आहे. यातील रेल्वे ही एखाद्या कादंबरीतल्या रणझुंजार नायिके समान भासते. कधी तिला राजाश्रय मिळाला तर कधी तिला लोकाश्रय मिळाला. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला, तिच्या अंतर्बाह्य स्वरूपात होणारा बदल स्वीकारावा लागला. तिला वेगवेगळ्या नावांनी संबोधले गेले, अनेक चढ-उतार असलेल्या रस्त्यांवरून धावावे लागले. तिने हे विश्वची माझे घर असे मानून अनेक घरे, गावे एकमेकांना जोडण्याचा, जातीधर्माच्या भिंती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. तिने अनेकजणांना रोजीरोटीचा मार्ग उपलब्ध करून दिला. तिच्या अथक धावण्याने आपले जीवनही गतिमान झाले, काळ आणि वेग यांची गणितं बदलली. अनेक ऐतिहासिक घटनांची ती साक्षीदार ठरली. महान व्यक्तींच्या स्पर्शाने ती पावन झाली तर कधी निर्दयी वर्तनाने शरमिंदा ही झाली मालगाडीच्या रूपात अन्न,धान्य पुरवून कधी अन्नपूर्णा तर खेडोपाडीच्या रुग्णांसाठी मदतीला धावणारी जीवन वाहिनी बनली. प्रवासी रूपात निरनिराळ्या प्रवाशांना धार्मिक, ऐतिहासिक, प्रेक्षणीय ठिकाणाची सहल घडवून आणली.

अशी सर्वांचं जीवन गतिमान करणारी, देशाच्या प्रगतीतला महत्वपुर्ण घटक रेल्वे घडवताना, तिच्या मार्गाची आखणी करताना, अनेकांनी आपला जीव गमावला. कित्येक रेल्वे कर्मचारी आजही आपला जीव धोक्यात घालून तिची रक्षा करत आहेत. कोळसा, वीज यावर चालणारी रेल्वे आज मेट्रो सारख्या रूपातहि धावू लागली आहे. सर्वांना सामावून घेणं आणि एका ध्येयानं प्रवास करत राहणं हा तिचा जीवनधर्म आहे. तिच्या असिधारा व्रताची हि कथा सोपी सहज नाही त्यात व्यामिश्रता आहे, साहसी-रोमांचकारी क्षणही आहेत. तिच्या आगमनाने आपल्या विचारात, संस्कृतीत, नकळत परिवर्तन सुरू झाले. हे सारे कसे घडले ते कळण्यासाठी हे एकदा तरी या झुंजार नायिकेचा प्रवास या पुस्तकाच्या रूपातून अनुभवणं आवश्यक आहे. 

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध 
 http://rasiksahitya.com/#/home

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज