युगवाणीचे तीन संपादक

                                                                                                      credit - sahitysuchi magzine/rasik sahitya
 युगवाणीचे तीन संपादक
 (डॉक्टर विलास चिंतामण देशपांडे)

काव्यशास्त्र विनोदेन कालोगच्छति धीमताम्। 
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा । 
असं जे म्हंटल जातं ते खरं आहे. हा संस्कृत श्लोक मनुष्याच्या जीवनातील साहित्याचे महत्व अधोरेखित करत आहे. जे लोक काव्य, शास्त्र, विनोद अशा सर्वांगाने परिपूर्ण साहित्याचा रसास्वाद घेतात त्यांचा काळ चांगला व्यतीत होतो. तसेच अनेक अनुभवांनी त्यांचे आयुष्य समृद्ध होते. जाणिवांचा विकास होतो. पण जे लोक तो रसास्वाद न घेता आपला विश्राम काळ निव्वळ वादविवाद किंवा निद्रेत व्यतीत करतात त्यांची गणना या श्लोकाद्वारे मुर्खात केली आहे. कारण त्यांना इतर कोणतेही ज्ञान नसते. त्यांचे जीवन प्रवाही नसते. जीवनानुभवाची कमतरता असते. कला, साहित्य या गोष्टी माणसाला 'पशु'पेक्षा वेगळा मनुष्यत्वाचा दर्जा देतात. सुसंस्कृत जीवनाचा आनंद घ्यायला शिकवतात. याद्वारे मनुष्य स्वतःची आत्मिक उन्नती करून घेऊ शकतो. अखेर उत्तम विचारच माणसाला प्रगतीकडे नेऊ शकतात. उत्तम विचार हे उत्तम साहित्यातून निर्माण होतात. 
फारपूर्वीच्या काळी अनेक ऋषीमुनींनी अभ्यासपूर्ण, साहित्याची निर्मिती ग्रंथ स्वरूपात केली आहे. परंतु जसजसे सुष्टीत परिवर्तन होते त्यानुसार मनुष्यजीवनातही अनेक बदल घडत आहेत. जगण्याचा स्तर हा कधी उंचावतो तर कधी खालवतो आहे. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ह्या तीनही अवस्था साऱ्या विश्वाला व्यापून उरल्या आहेत. तशा त्या साहित्यालाही लागू आहेत. यासाठीच साहित्यिक मूल्ये असणाऱ्या उत्तोमोत्तम साहित्याचे निर्मिती सातत्याने होत राहणे देखील आवश्यक आहे. याची जाणीव होऊन  असे साहित्यिक दर्जा उंचावणारे, उत्तम अभिरुची जोपासणारे, काळातील बदलांना सामोरे जात असताना त्यातील घडामोडींकडे दूरदृष्टीने पाहणारे जुन्या काळातील 'युगवाणी' हे एक आघाडीचे नियतकालिक होते. युगवाणी या नियकालिकाने उत्तोमोत्तम साहित्य निर्मितीची हि परंपरा ७० वर्षे अबाधित राखिली आणि ७१ व्या वर्षात पदार्पण केले. या सत्तर वर्षांच्या काळात या नियतकालिकात एकूण २५ संपादकांचा वाटा आहे परंतु त्यातील तीन संपादकांनी याच्या निर्मितीमध्ये ऊत्तमरित्या भर घातली आहे त्यांच्या सहभाग मह्त्वपूर्ण आणि याचा दर्जा उंचावण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे हे तीनही संपादक मुळातच उत्तम कवी होते. "जे ना देखे रवी ते देखे कवी "  असे कवीबाबत बोलले जाते  या  द्रष्टेपणाचा प्रत्यय त्यांच्या या संपादन कौशल्यात दिसून येतो.  या तीनही संपादकांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.  तसेच या साऱ्यात एक कवी, लेखक , वाचक आणि माणूस म्हणून साहित्याशी त्यांची नाळ कशी जोडलेली होती ते स्पष्टपणे जाणवते.  आपल्या साहित्याचा स्वान्त  सुखाय व्यतिरिक्त समाज घडणीत मोलाचा सहभाग असावा असे वाटणाऱ्या या त्रयीचे महत्व एखाद्या समाजसुधारकापेक्षा कमी लेखून चालणार नाही.  

यातील पहिले संपादक होते वा. ना. देशपांडे. कवी आणि लेखक यांचा परिचय देण्याची रीत यांनी सुरु केली. यातील चोखंदळ निवडीमुले युगवाणीच्या अंकातून कवींना तसेच वाङ्मय प्रेमींना मार्गदर्शन मिळेल हे नक्की. महाकाव्य , कवितेचे मर्म , गेय कविता इत्यादी अंगाने कवितेचा विचार येथे केला आहे. कवितेविषयक चर्चा आहेत. कथाकाव्य या विषयावरही चर्चा आहे. 'ओझरते दर्शन' या सदरातून त्यांनी परभाषेतील उत्तोमोत्तम कलाकृतींचे दर्शन घडविले. लघुकथांना प्राधान्य दिले. ललित बंधांचा परिचय करून दिला.  'गुप्त  सरस्वती ' सदरातून साहित्यिकांची व साहित्यिकांचा संबंध असलेली खाजगी पत्रे वाचकांपर्यंत पोहोचवली. साहित्याखेरीज इतर सार्वजनिक महत्वाच्या विषयांवरील पत्रे प्रसिद्ध करण्यात येतील असे आवाहन त्यांनी केले होते.  वामनराव हे स्वतः इंग्रजी हिंदी आणि संस्कृत ह्या भाषा  होते त्यामुळे त्यातील नियतकालिकांचे वाचन ते आवर्जून करीत. जगातील विविध भाषांमधील लक्षणीय साहित्य व त्यावरील परामर्श इंग्रजीमध्ये अनुवादित होऊन आल्यास त्याचीही हि ते दाखल घेत व मराठी साहित्यातील संबंधित प्रवृत्तीनशी त्याची सांगोपांग तुलना करीत.  अंकांची मांडणीती त्याकाळात उत्तम होती. तसेच वाटी विशेषांक , संपूर्ण कला कृतीला वाहिलेला अंक हि त्यानी काढला. संशोधकाचे पण नावाचे सदरही त्यांनी चालू केले.  तसेच त्यांनी प्रबंधनात्मक लेखनही चालू केले. मुलाखतीचे रूपांतर लेखात करण्याची नवी रीत त्यांनी पाडली.   

यानंतरचा  म्हणून आपल्या सर्वांचे लाडके कवी ग्रेस म्हणजेच माणिक गोडघाटे यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी युगवाणीचे संपूर्ण रूपच पालटले. त्याकाळात सत्यकथा हे वाङ्मयीन नियतकालिकं आघाडणीवर होते त्याचा प्रभाव माणिक गोडघाटे  यांच्यावर होता. वांड्मयीन निर्मितीला व सर्जनशील प्रतिभावंतांना चेतन देणारे वाडमयीन तसेच दृश्य कलाकृतीकचं वस्तुपाठ देणारे रसिक आणि गंभीर वाचकांची एकाच वेळी मने  जिंकणारे राजाची विषयांपासून फारकत घेणारे निखळ वाङ्मतीं स्वरूप युगवाणीला प्राप्त झाले. मुखपृष्ठावरील रंगीत चित्रे, कथांवरील चित्रे , रेखाटने , छायाचित्रे, नाटकातील दृश्य प्रसंग,, व्यक्तिचित्र, निसर्ग चित्र, शिल्पचित्र इत्यादी चित्रांगचा समावेश मोठ्या प्रमाणावर केला  गेला. भौमितिक, अमूर्तीकारणाचे वैशिष्ट्य लाभलेली चित्रे, डुच चित्रकाराचा छाप असणारी चित्रे हे देखील याचे वेगळेपण म्हणावे लागेल.   साहित्यिकांची सूची. लेखकांची वर्गवारी तसेच चित्रकार, मुखपृष्टकार रेखाटणकर यांचा उल्लेख, संघवार्ता, संस्थांचा वृत्तांत, शाखा वृत्त, संस्थेचे वार्षिक हिशेब व अहवाल हे देखील युगवाणीत आढळतात. तात्विक, धार्मिक सामाजिक असे वेगवेगळ्या विषयांवरील लेखही आढळतात.  सामाजिक लेखात वर्णव्यवस्था, पावित्र्य, मानवी उत्क्रांती यावर लक्ष केंद्रित केलेले आढळते. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांची लक्षणीय दाखल घेतलेली आढळते. ऐतिहासिक पत्रे, बखरी , व्याकरणाची गरज असे लेखन आढळते . तसेच लघुनियत्कालिक कडणाऱ्यांच्या जन्मपत्रिका छापल्या साहित्य व कला यायचा परामर्श घेतला . कादंबरीतीवर परीक्षणे आणि त्यावर विचार करणारे लेखन आहे. कथेच्या स्वरूपात होणारे बदल रूपक कथा, बोधकथा, प्रतीक  कथा   यांचे दर्शन झाले. पत्रसंवाद रूपातील कथा, अनिवडीत कथा, चित्रपटांवरील समीक्षणे,  नाट्यकलावंतांवरील टिपणे आढळतात. आधुनिक कला, प्रचीन कला , पौर्वात्य कला , आणि पाश्चात्य कला यांचा स्वरसंगम साधण्याचा पराकोटीचा पर्यटन ग्रेस ह्यांनी युगवाणीतून केला.    

यानंतर तिसरे उल्लेखनीय संपादक म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी . युगवाणीच्या कालखंडातील सर्वात अधिक काळ सलग संपादक राहण्याचा मान मिळवणारे एकमेव संपादक होय. त्यांच्या काळात कार्मिक नैतिक , तत्वज्ञानात्मक, सामाजिक, प्राचीन, वैज्ञानिक, संवादशास्त्र, पुरातत्व, भाषाशास्त्र अशा विविध विषयांवर वैचारिक निबंध वाङ्मय प्रकाशित झाले आहे. कलावंतांनी साहित्यिकांच्या समोरील प्रश्नाचा उहापोह ही केला आहे. साहित्य व्यवहाराच्या संदर्भात साहित्यसंस्थांना हलवून जागे करणारे निर्भीड लेखन केले गेले आहे.  आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या भाषाशात्राला मोठे स्थान दीले आहे. नव्या नव्या विषयांची ओळख, प्रभावी कल्पना व बौद्धिक आकृतिबंध, सर्जन प्रेरणा, वांड्मयीन परंपर, समाज भोवतालची माणसे, त्यांच्या आवडीनिवडी वाचकांना एकाद्या विषयात रस नसल्यास तो जाणीवपूर्वक निर्माण करणे अशा अनेक गोष्टी श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी युगधर्म ओळखून परिश्रमपूर्वक साध्य केल्या आहेत.  साहित्योपासकांच्या कलानिर्मितीची तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख युगवाणीतून केली आहे. अनेक साहित्यविषयक चळवळींचा उहापोह केला आहे. ग्रन्थिकी सादर चालू केले. चर्चेच्या माध्यमातून साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न जोशींच्याच कारकिर्दीत युगवाणीत केला आहे. मराठी भाषा शुद्धलेखन तिचा पोषक विकास या साऱ्याचा विचार इथे जाणवतो. मान्यवरांच्या प्रतिक्रिया, पत्रव्यवहार, यालाही स्थान आहे. स्त्रीवादी, जनवादी, दलित, मार्क्सवादी, गांधीवादी, समाजवादी यांच्या साहित्यप्रवाह देखील यातुन जाणवतात.  या प्रकारे वाङ्मयीन संस्कृतीला आलेली अवकाळी दूर करण्याचा आणि दर्जा मुख पात्र करण्याचा ध्यास या तिन्ही त्रयींनी घटेल असून संध्याकाळात आदर्शवत ठरेल असेच युगवाणीचे स्थान आहे. 

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध 
 http://rasiksahitya.com/#/home

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज