Posts

Showing posts from March, 2019

सतार

सतार  परवा अचानक तुझं कपाट आवरताना एक बिल सापडलं आणि ते पाहताना मन पटकन भूतकाळात गेलं. विस्मृतीच्या कोशात गुरफटलेल्या सुरांनी आजूबाजूचं वातावरण भारून टाकायला सुरवात केली.  एकेक सूर काळाच्या मर्यादा ओलांडून मला तुझ्यासोबत कुठे तरी दूर घेऊन गेला.   ती इवलीशी पावले दुडूदुडू धावणारी आणि त्याच्या मागे पळताना तुझी होणारी धावपळ. ते मागे पुढे अंगण असलेले दोन खोल्यांचं घर, आणि एका कोपऱ्यात जाणाऱ्या-येणाऱ्याच स्वागत करायलाच जणू उभी असलेली सतार. सारं काही क्षणार्धात आठवलं. आज मन सुरात न्हाहून निघत होत.  आठवणींत  चिंब करत होत. सगळ्या आठवणींना हट्टाने मागे टाकून पुढे निघून जावं असा प्रयत्न करत होते खरं; पण ते काही जमेना. नुकत्याच संपलेल्या मैफिलीच्या भैरवीचे सूर जसे आसमंतात भरून राहतात आणि मैफिलीच्या स्वराविष्काराची आठवण करून देतात तसं या आठवणींचं झालं.   अगदी कालपरवा घडल्यासारखं सगळं नकळत आठवू लागलं. आपल्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या वेळी एक मांजर आपल्या त्या जुन्या घरात अडकलं...

' आय हॅव अँन आयडिया ! '

                                                                     credit- sahitysuchi magzine/rasik sahitya ' आय हॅव  अँन आयडिया ! '    ( पराग गोरे) लहानपणी आपण एक गोष्ट वाचलेली आठवते का ? कावळ्याला लागलेली तहान !! एक तहानलेला कावळा जंगलात पाण्याच्या शोधात वणवण भटकतो पण कुठेच पाणी मिळत नाही , नंतर एका  मोठया रांजणाकडे त्याच लक्ष जात त्यात अगदी खोल त्याच्या तळ्याशी पाणी असतं. ते कसं प्यावं ? हा प्रश्न त्याला पडतो आणि मग त्यालाच युक्ती सुचते तो जंगलातले खडे गोळा करून टाकतो हळू हळू पाणी वर येत आणि मग तो ते पाणी पितो. ही गोष्ट आठवण्याचं कारण  नुकतेच वाचण्यात आलेले  , पराग गोरे यांनी बिझनेस मंत्रा तर्फे...

शोध मनाच्या विकासाच्या बोर्नव्हिटाचा !!! आधुनिक प्रवचने बालमित्रांसाठी

Image
शोध मनाच्या विकासाच्या बोर्नव्हिटाचा  !!! आधुनिक प्रवचने  बालमित्रांसाठी  "९० % दिमाग का विकास बच्चे कि पाच साल तक होता है " हे काजोलच  बोर्नव्हिटाच्या जाहिरातीतलं वाक्य आपण नेहमीच टीव्ही वर पाहतो. कुठल्याही गोष्टीची जाहिरात करून ती सतत मनावर बिंबवली की  ती खरी वाटते, त्यात आता काजोलने हे वाक्य म्हंटल्यावर तर कित्येक आया, आणि टीव्ही ने प्रभावित मुले लगेच बोर्नव्हिटा म्हणत तिकडे धाव घेणार आणि काजोल महिमा म्हणून वडीलही त्याला संमती देणार हे ओघाने आलंच. आपलं मूल हुशार कर्तबगार  व्हावं असं कोणाला नाही वाटणार ? आणि ते योग्यही आहेच. पण  जेवढ  महत्व मुलाच्या बाह्य विकासाला ,शैक्षणिक विकासाला देतो तितकंच महत्व आपण त्याच्या मानसिक विकासाला, मानसिक आरोग्याला देतो का ? हा विचारही  करायला हवा.  दुर्दैवाने  तसं  घडत नाही हे खरं. ह्या मागे असं एक कारण असू शकत की त्याची जाहिरात केली जात नाही आणि त्याचा ' कमी वेळात लवकर परिणाम करणारा यशस्वी फॉर्म्युला ' अजून तरी सापडला नाही .  यासाठी केवळ एकच उपाय ...

रोपाला बहरू देणारी गोष्ट .....

रोपाला बहरू देणारी गोष्ट  ..... पुस्तकांवरून नजर फिरवताना सहजच लहानमुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांकडे लक्ष गेलं. अतिशय सुंदर मुखपृष्ठ आणि आतील चित्रे   असलेली पुस्तक पाहून मनातल्या लहान मुलीने टणकन उडी मारली आणि नकळत पुस्तकं  वाचायला सुरवातही केली. डोक्यातले सगळॆ व्यवहारी विचार क्षणात बाजूला जाऊन मन कधी गाय-वासरापाशी गेले आणि कधी फुगे विकणाऱ्या मुलापाशी गेले ते कळलंच नाही. पुस्तकं वाचून संपली पण मनातली लहान मुलगी मात्र बाहेर येता येईना. तिला बहुदा मला मोठं करूनच यायचं होतं.   संध्याकाळी शिवरात्रीच्या जत्रेत मन रमवायला बाहेर पडले तर समोर फुगेवाला आला आणि परत बाहेर आली   माझ्यातली लहानमुलगी आणि गोष्ट !   मग काय जत्रा राहिली दूर , मन फुग्यासारखं तरंगत राहिलं रात्रभर डोक्यात ठेवून गोष्ट ! सकाळी उठून मस्त चहा घ्यायला  गेलं तर वाफाळलेल्या दुधाचं भाडं पाहून परत बाहेर आली   माझ्यातली लहानमुलगी आणि   साई सारखी दाटून आली गोष्ट !   म्हंटल हे काय खरं नाही , ही  मुलगी आणि गोष्ट आपला पिच्छा काही केल्या सॊडत नाही.   काय ...